अमेरिकन अश्वमेध 27.10.2011

अखेर 42 वर्षांनंतर गद्दाफी गेला.जो तलवारीच्या जोरावर जगतो तो तलवारीनेच मरतो’. प्रत्येक हुकमशहाबद्दल हे खरे आहे. हिटलर, मुसोलिनीने जग जिंकायचे मनसुबे रचले. त्या हिटलरला आत्महत्या करावी लागली तर मुसोलिनीला लोकांनी भररस्त्यावर फासावर लटकावले. सद्दाम हुसेन आणि गद्दाफी ही त्याची अलिकडच्या काळातील उदाहरणे. या हुकूमशहांच्या अस्तासाठी रोटी, कपडा और मकानयांची महागार्इ व महागार्इमधून निर्माण झालेला प्रक्षोभ ही प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर जगातला एकमेव शहेनशहा असलेल्या अमेरिकेचे दुटप्पी धोरण देखिल कारणीभुत आहेत.

            अमेरिका लोकशाहीला मानतो असे दखवतो, पण त्याचवेळी पुर्ण जगामध्ये हुकूमशाही निर्माण करतो. कारण हुकूमशहांना विकत घेणे वा ताब्यात ठेवणे सोपे असते. पाकिस्तानमध्ये तर अमेरिकेने लोकशाही रूजूच दिली नाही. उलट तेथे लष्करी हुकूमशाही जिवंत ठेवली. त्यासाठी आयएसआयचा एक हत्यार म्हणून वापर केला. 1954 पासून आजतागायत पाकिस्तानी हुकूमशहांची पाठराखण करीत भारतामध्ये कलह माजवण्यासाठी अमेरिकेने त्यांचा वापर केला. पुढे अफगाणिस्तानमध्ये हल्ला करून ड्रग्ज माफियाला सत्तेवर आणले. तेथील राष्ट्रपती करझार्इचा भाऊ हा जागतिक स्तरावरील अफुचा स्मगलर नुकताच मारला गेला. इराकमध्ये हल्ला करून शिया-सुन्नी आणि कुर्दीश लोकांमध्ये कायमचा कलह निर्माण केला व अल कैदाला मानर्णाया लोकांच्या हाती तेथील सत्ता गेली.

            इंटरनेटमुळे पुर्ण जगात क्रांतीचे वारे वाहू लागले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत अनेक अरब राष्ट्रांमधील अमेरिकाधार्जिण्या हुकूमशहांविरोधात बंड झाले. आफ्रिकेतील टयुनेशिया, इजिप्त आणि लिबिया ही राष्ट्रे एकमेकांलगत आहेत. तेथील हुकूमशाही नष्ट करण्यात आली, परंतु पुढे काय होर्इल हे सांगता येत नाही. उलट अमेरिकेचे शत्रु असलेले धार्मिक क+रवादी गट अल कैदा आणि मुस्लिम ब्रदरहूड यांनी तेथील क्रांतीवर नियंत्रण मिLवलेे आहे. आता पुढे काय होणार हे तेथील सैन्यावर अवलंबून आहे. हे सर्व सैन्य अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणात काम करते. म्हणजे अंतिमत: तेथील परिस्थितीत बदल काहीच झालेला नाही. या क्रांतीच्या अगोदर देखिल या राष्ट्रांमध्ये अमेरिकन भांडवलशाहीच होती व सैन्य दलही अमेरिकेच्याच नियंत्रणात होते. तेथील हुकूमशहा तर अमेरिकेचेच चमचे होते. त्या राष्ट्रांमधील 3र्040 वर्षांच्या हुकूमशाही राजवटीने लोक हवालदील झाले होते. त्यांनी बंड करताच अमेरिकेने आपला पवित्रा बदलला व बंडखोरांना साथ दिली. लिबियामध्ये अमेरिकेने हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी 110 टा^म हा^क क्षेपणास्त्रांचा मारा केला. या एका क्षेपणास्त्राची किंमत 4 कोटी रूपये आहे. तसेच 45 एक हजार किलोचे बा^म्ब टाकले. असे अनेक हल्ले लिबियावर अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी केले. परिणामी गद्दाफी मारला गेला. अमेरिकेने लिबियन सैन्यात फुट पाडून हे यश मिLवले.

            अमेरिकेवर 2001मध्ये अल कैदाचा दहशतवादी हल्ला झाल्यावर गद्दाफीने अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांशी समझोता केला आणि अल कैदा व मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनांविरोधात अमेरिकेची साथ दिली. परंतु गद्दाफीने पश्चिमी राष्ट्रांकडून विमाने व हत्यारे विकत घेतली नाहीत. त्यामुLे ही पश्चिमी राष्ट्रे गद्दाफीच्या विरोधात गेली. पश्चिमी राष्ट्रांनी अरब तेलावर पुर्ण नियंत्रण मिLवण्यासाठी बंडखोरांना साथ दिली. त्या बंडखोरांमध्ये बंडखोर लष्करी सैनिकांबरोबर अल कैदा आणि मुस्लिम ब्रदरहूडसुध्दा मोठया संख्येने असल्याचे अमेरिकेला निश्चितपणे माहित होते. आता लिबियामध्ये कुणाची राजवट येते हे आपण बघायचे आहे. उत्तर आफ्रिकेत हत्यारांचा प्रचंड साठा झाल्याने लिबिया शेजारील चाड, अल्जेरीया, मोरोक्को या राष्ट्रांनी देखिल चिंता व्यक्त केली आहे. अल कैदा आणि दहशतवादी गटांच्या कारवाया त्यामुLे आणखी वाढतील आणि त्यापासून सर्वच राष्ट्रांना धोका निर्माण होर्इल, अशी त्यांना भिती वाटत आहे.

            10 वर्षांपासून अफगाणिस्तानवर हल्ला करून तेथे पाकिस्तानचे नियंत्रण आणण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे. दुसरीकडे बहूसंख्य अरब राष्ट्रांवर आपली हुकूमत स्थापन करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झाली आहे. याचाच अर्थ 9्र11 च्या न्युया^र्कवरील दहशतवादी हल्ल्याचा उपयोग अमेरिकेने पुर्ण जगावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी यशस्वीपणे केला आहे. यात अमेरिकन लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे व फायदा फक्त अमेरिकेतील लष्करी औद्योगिक समूहांचा झाला. 9्र11चे कारस्थान करर्णाया लोकांना कधीच न्यायालयात शिक्षा झाली नाही. 9्र11चा सूत्रधार खालीद शेख महंमदवर गेल्या वर्षी न्यायालयात खटला चालणार होता तो देखिल हो} देण्यात आला नाही. अमेरिकेने कधीही 9्र11 च्या हल्ल्याची कारणे, घटनाक्रम न्यायालयासमोर म्हणजेच पर्यायाने लोकांसमोर ये} दिली नाहीत. याचाच अर्थ 9्र11च्या पाठीमागील सत्य लपवण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.

            अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षातील उजव्या गटाने जगावर र्गोया लोकांचे प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी लष्कराचा उपयोग करावा, अशाप्रकारचा दबाव तत्कालिन राष्ट्रपती क्लिंटन यांच्यावर आणला. त्यांच्यानंतर बुश हे राष्ट्रपती झाल्यावर अमेरिकन सरकारने 9्र11 चा दहशतवादी हल्ला न्युया^र्कमध्ये घडवल्याचा आरोप अनेक अमेरिकन संघटनांनी व नोबेल पारितोषिक विजेत्या मान्यवरांनी केला आहे. असा आरोप विचित्र वाटू शकतो, पण सत्य नेहेमीच कथाकादंर्बयांपेक्षा विचित्र असते. 9्र11च्या हल्ल्यानंतर एकापाठोपाठ एक तेलात श्रीमंत असणारी अरब राष्ट्रे अमेरिकेच्या षडयंत्राची शिकार झाली. अरब राष्ट्रांमध्ये शेवटचा अमेरिका विरोधक असलेला सिरीया आता तर अखेरचा श्वास घेत आहे. जागतिक तेलसाठयावर अमेरिकन मगरमिठी यामुLे पक्की झाली आहे. आता भारताला तेल हवे असेल तर अमेरिकेच्या पाया पडल्याशिवाय ते मिLणार नाही. गेल्या 10 वर्षांच्या अमेरिकन लढायांमुLे तेलाच्या किंमती दसपट वाढल्या. पुर्ण जगात गरीब माणूस महागार्इमुLे होरपLून निघत आहे. सामान्य माणसाच्या चुलीवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किती भयानक परिणाम होत आहे, हे यावरून स्पष्ट होते.

अंतिमत: हुकूमशाही असो वा लोकशाही असो, या जगाच्या अर्थकारणावर अमेरिकन काLया भांडवलशाहीचा पुर्ण प्रभाव आहेव्याजावर आधारीत असलेली ही भांडवलशाही व्यवस्था म्हणजेच पाश्चिमात्य अर्थव्यवस्था होय. ह्मा व्यवस्थेत तेंदूच्या पानावर जगणारा आदिवासी व रखरखत्या उन्हात राबणारा शेतकरी नगण्य ठरतो. तेव्हा भारत सरकारला षंढ बनवण्यापासून ते लिबिर्यासिरीयात बंड घडवण्यापर्यंत अमेरिकन सैतानी अश्वमेध बिनबोभाट जागतिक दमनकार्यामध्ये पुढे सरकत आहे. याला मित्रांनो, भारतवासियांनो, नागरीकांनो वेLीच रोखा. मानवता वाद जिवंत ठेवण्यासाठी इतिहासाने भारताला दिलेली ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे.

लेखक: ब्रिगेडीयर सुधीर सावंत मो.नं.: 9987714929

Please follow and like us:
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a7-27-10-2011/

ब्रिगेडियर सुधीर सावंत

  • Call – 998 771 4929

For Appointment – Amit Tawade (80878 77539)

You can send him message by clicking here

शून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस

केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते.  .. Read More

छ शिवाजी म कृषी विद्यालय

छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

संयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ

या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते

मुंबई फेस्टिव्हल फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे

बाल शिवाजी हायस्कूल

कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष

मिलिटरी स्कूलअंबोली

Demo Content

Brig. Sudhir Sawant Says…

We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.

We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj

My Facebook Page

Unable to display Facebook posts.
Show error

Error: The 'manage_pages' permission must be granted before impersonating a user's page.
Type: OAuthException
Code: 190
Please refer to our Error Message Reference.
Copyright © 2019 Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A7-27-10-2011