आनंदी आणि समृध्द गाव_२३.४.२०२०

गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता. पण राज्यकर्त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे पुर्ण टाळले. आता ७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात झोपडपट्ट्यांमध्ये रहायला धाडण्यात आले आणि करोनाच्या तावडीत अडकवण्यात आले. ह्याचे परिणाम जगभर दिसत आहेत. सर्वात पुढारलेला देश आज सर्वात भयाण अवस्थेत आहेत. अमेरिकेत लाखो लोकांना करोना लागण झाली. ९ लाख पेक्षा जास्त लोक बाधित आहेत. त्यात ५०००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती होतील हे माहीत नाही. पण ज्या देशात सर्वच काही आहे, त्या देशात ते करोनावर निर्बंध घालू शकले नाहीत. त्या पाठोपाठ, स्पेन, इटली, फ्रान्स आणि इंग्लंड Corona बाधित देशामध्ये प्रथम येण्यासाठी स्पर्धा चालू आहे.  इटलीमध्ये २ लाख बाधित आणि २५००० लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये २ लाख २० हजार लागण झाली, तर मृत्यू संख्या २२०००. इंग्लंडमध्ये दीड लाख लागण आणि मृत्यू संख्या २०००० झाली आहे, प्रगतशील म्हणजेच शहरी जगाचे हे चित्र आहे. असे का झाले?

            ‌ग्रामीण जीवन उद्ध्वस्त केल्याचे हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे चित्र आहे. त्यातून जाणीव होते की जगात संतुलन बिघडल्यावर मानव विकासाची घडी बिघडून जाते.  भोगावे लागते मात्र सर्व जनतेला.  भारत स्वतंत्र झाला तेंव्हा ८०% लोक गावात होते. त्यांचा व्यवसाय शेती होता. भारत सुद्धा शेतीला उपयुक्त देश होता. ५२%जमीन शेतीलायक होती. १२ महिने सुर्य होता. वर्षाला ३ पीक घेण्याची क्षमता ह्या देशाची होती. दुसरीकडे अमेरिकेत १९% जमीन शेतीलायक होती. १८% चीन मध्ये होती.  साहजिक या आणि इतर विकसित देशांनी उद्योगाला प्रगतीचे सूत्र मानले.  जिथे जिथे उद्योग उभे राहिले तिथे तिथे शहरे वाढत गेली आणि जीवनशैली ही शहरी बनत गेली.  बहुसंख्य लोक शहरात राहत असल्यामुळे राजकीय आणि आर्थिक धोरणे सुद्धा शहरी बनत गेली. विकासाचे तत्त्वज्ञान सुद्धा शहरी झाले किंवा उद्योगावर आधारित झाले. त्यामुळे शेतीला दुय्यम स्थान मिळाले. भारताचे राज्यकर्ते आणि तत्त्वज्ञानी सुद्धा ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये शिकलेले होते.  ज्याप्रमाणे आपण ब्रिटीशांचे कायदे भारतात लागू केले त्याचप्रमाणे आर्थिक विकासाचे तत्वज्ञान सुद्धा इंग्लंडमधील लागू केले.  त्यामुळे भारतात शेतीला नगण्य स्थान मिळाले.  ग्रामीण भारताची अधोगती होत गेली व देशात आर्थिक विषमता प्रचंड वाढली.  शहरातील निवडक लोक प्रचंड श्रीमंत झाले व गावातील लोक गरीब होत गेले.  देशात संपत्ती वाढून सुद्धा ती शहरातल्या एका विशिष्ट गटाकडे गेली आणि शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. जर भारताने गांधीजींच्या सांगण्यावरून शेतीला प्रथम स्थान दिले असते आणि उद्योगाला दुय्यम स्थान दिले असते तर भारत जगाचे अन्नाचे भांडार झाले असते आणि आज जगात सर्वात विकसित देश होण्याचा महामार्ग खुला झाला असता. त्यासाठी गाव हे विकासाचे आणि नियोजनाचे केंद्र बनले पाहिजे.

            ७० वर्ष नियोजनाचे घोडे गाव सोडून सर्वांकडे उधळले होते. महाकाय शहर निर्माण झाले. दाटीवाटीने लोक राहू लागले. गरीब देशात तरुण शहराकडे धावू लागले. एका खोलीत १०माणसे राहू लागली. शौचालय, घाणेरडे पाण्यातून शरीर सडू लागली. तरी त्याच परिस्थितीत जगण्याचा शाप भारतीय जनतेला भोगावा लागत आहे. त्यात श्रीमंत देशाची दादागिरी. जगातील खनिज, जंगले, निसर्ग उद्धवस्त करून शहरी जीवन आणखी सुखमय, विलासी बनवण्यात माणुसकी जळून गेली. ट्रम्पसारख्या दुष्ट राज्यकर्त्यांनी ह्या जीवनाला आणखी उन्मत्त करण्यासाठी Corona सारख्या संकटाला दुर्लक्षित केले. उद्योग चालू ठेवण्यासाठी हट्ट धरला व धरत आहेत. त्यामुळे संकट वाढतच आहे.  म्हणून वेळ आली आहे की प्राप्त परिस्थितीत बदलण्यासाठी, आनंदी जीवनाचे खरे रहस्य उलगडण्यासाठी  एक नवीन दिशा घेऊन मानवी जीवन सुखी आणि समृद्ध केले पाहिजे.

‌            जीवनाची संकल्पना आनंद आणि समृध्दी आहे. गावांचा सामुदायिक विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही स्थानिक आमदार, लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुंबई मंडळ, कृषि अधिकारी, शिक्षक, आरोग्य सेविका, बचत गट महिला प्रतिंनिधी, गावातील सक्रीय लोक यांच्या उपस्थितीत गावांमध्ये अनेक बैठका घेतल्या. ह्या बैठकांमध्ये गावामध्ये आनंदी आणि समृद्ध समाज कसा बनवता येईल यावर चर्चा करून एक विकास आढावा बनवला आहे. ह्या चर्चेअंती गावातील वरील सर्व घटकांना एकत्रित करून एक गाव विकास कमिटी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. समृद्ध गाव ही संकल्पना यशस्वी व्हायची असेल तर गावातील लोकांचा प्रभावी सहभाग अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान ही संस्था गावामध्ये वेळोवेळी येऊन उत्पादन, फळ प्रक्रिया, बाजारपेठ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांचे सहाय्य घेऊन प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिष्ठान संस्था समृद्ध गाव योजनेत एक दुवा म्हणून काम करत आहे. याचबरोबर गावची ग्रामपंचायत, स्थानीक गाव समिती, मुंबई मंडळ, लोक प्रतिंनिधी यांनी समृद्ध गावाचा आराखडा कार्यान्वित करण्यासाठी शासन, कंपन्यांचे CSR, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या कामात सहभाग घेणे अपेक्षित आहे.

            “समृद्ध गाव” प्रकल्पाची उद्दिष्टे गावातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे व प्रत्येकाला स्वावलंबी करणे हे आहे.  दैनंदिन गरजेच्या वस्तु गावातच बनवण्याची व्यवस्था बनत आहे.  त्यायोगे गावातील पैसा गावातच ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचा पैसा गावात आला पाहिजे. म्हणून गावात तयार माल बाहेर विक्रीला गेला पाहिजे. नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे. रासायनिक खते आणि किटकनाशक गावातून तडीपार केली पाहिजेत. त्याचबरोबर गावातील पिकांच्या स्थानिक जातींचे संवर्धन करून, औषधी वनस्पतींचे देखील उत्पादन केले पाहिजे. त्यातून गावातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून  गावातील पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.

            तसेच  योग व क्रीडा यांच्या सोयीसुविधा निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक स्त्रीने त्यातल्या त्यात मुले असलेल्या स्त्रीने व्यायाम केलाच पाहिजे. मग ते सकाळी बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन योगा करावा किंवा खेळ खेळावा. स्त्रियांनी हे करणे म्हणजे ग्रामीण जीवनात आश्चर्य वाटण्यासारखे आहे. पण सुरुवातीला कुठलीही नवीन आणि चांगली प्रथा हास्याचा विषय होतो. पण त्याला न जुमानता आपल्याला बदल आपणच केला पाहिजे.

            दुसरीकडे ग्रामीण जीवनातील आनंदच नष्ट झाला आहे. त्याला समृद्ध करण्यासाठी  सांस्कृतिक चळवळीतून जीवन आनंदी करता येते. सणवार तर आहेतच पण ग्रामीण लोकांचे लक्ष कला-कौशल्याकडे वळविले पाहिजे. उदा. प्रत्येकाने एक तरी वाद्य वाजविता आले पाहिजे किंवा गायन गेले पाहिजे, नाचले पाहिजे. त्यातून आनंद मिळाला पाहिजे. विकास म्हणजे काम काम नसते. आनंद आला पाहिजे नाहीतर जीवन रुक्ष होते, प्रभोधांविण आणि दु:खी माणूस विकसित होत नाही.  उत्पन्न संस्कृतीतून मानवाला आध्यात्मिक बळ मिळते. ते जोपासण्याची गरज आहे.

            गोसंवर्धन चळवळ व पशुसंवर्धन हे ग्रामीण जीवनाचा महत्वाचा भाग आहे.  उत्पादन आणि उत्पन्नाचे साधन आहे. बचत गटाद्वारे गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी पालन, मत्स्यपालन करणे सहज शक्य आहे.  प्रत्येक गाव हे Wi-Fi युक्त पाहिजे, म्हणजे गावातील लोकांना जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी काही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध करता येतील.  गाव प्रगती पथावर नेण्यासाठी स्थानिक नेतृत्व निर्माण होईल.  त्यासाठी इंटरनेटद्वारे जगाशी संवाद साधता येईल व मार्गदर्शन घेता येईल.  गावातील शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेता येईल व त्या आधारावर उद्योग सुद्धा उभारता येतील.  कृषि माल व बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. हे सर्वच तेव्हाच साध्य होईल, जेव्हा गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरेल.  घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव गावात होऊ देऊ नका.  राजकीय पटलावर स्पर्धा होणारच पण तिचा परिणाम गावाच्या विकासावर कधीही होता कामा नये. 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5_%e0%a5%a8%e0%a5%a9-%e0%a5%aa-%e0%a5%a8/

ब्रिगेडियर सुधीर सावंत

  • Call – 998 771 4929

For Appointment – Pankaj Pawar (8806979848)

You can send him message by clicking here

शून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस

केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते.  .. Read More

छ शिवाजी म कृषी विद्यालय

छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

संयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ

या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते

मुंबई फेस्टिव्हल फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे

बाल शिवाजी हायस्कूल

कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष

मिलिटरी स्कूलअंबोली

Demo Content

Brig. Sudhir Sawant Says…

We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.

We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj

My Facebook Page

Unable to display Facebook posts.
Show error

Error: The 'manage_pages' permission must be granted before impersonating a user's page.
Type: OAuthException
Code: 190
Please refer to our Error Message Reference.
Copyright © 2020 Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A5%AA-%E0%A5%A8