कलम ३७० नंतर_13.1.2022

काश्मिरमध्येआठ वर्षे राहिल्यानंतर व त्यानंतर अनेकदा लढणाऱ्या सैनिकांना भेटदिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की भारत सरकारला काश्मिर मधील खरीपरिस्थिती कधीच कळलेली नाही. त्यामुळे वेगवेगळे सरकार येते आणि वेगवेगळीभूमिका घेते पण त्या सामान्य काश्मिरी माणसाचा कुणी कधी विचार करताना मलादिसला नाही. त्यात हिंदू-मुस्लिम द्वेषाच्याखांद्यावर फुगणारे राजकीय नेते आणि राजकीय पक्ष भारतामध्ये काश्मिरचा प्रश्न हाहिंदू-मुस्लीम संघर्षाचा प्रश्न म्हणून मानतात. जनतेची दिशाभूल करतात.त्यामुळे अनेकदा काश्मिर स्थिर होत असतानाच तिथे हिंसाचार वाढवला जातो. तोचखेळ मला सगळ्यांसमोर मांडायचा आहे.

भारतीयसैन्य हे जगातील असे सैन्य आहे की ज्याने स्वातंत्र्यापासून दहशतवादाविरुद्धलढा दिला आहे. कुटीरवादा विरोधात लढा दिला आहे. अत्यंत जोखमीच्यापरिस्थितीतून शांतता प्रस्थापित केली आहे. ही भारतीय सैन्याची प्रचंडकामगिरी लोकांच्या नजरेत अजून आली नाही आणि भारतीय सैन्य कसं वागत वा वर्तनकरते याकडे लक्ष दिले नाही. आम्ही ज्यावेळेला काश्मिरमध्ये गेलो त्या वेळेलाआमच्या वरिष्ठांनी आम्हाला नेहमी सांगितलं “दहशतवादाविरोधात बंदुकीच्यागोळीने तुम्ही जिंकू शकत नाही. हृदय आणि मन जिंकून दहशतवाद नष्ट करता येतो.” अशा परिस्थितीत काम करायला आम्हाला अनेकदा संधी मिळाली आणि मला वाटतंआम्ही जे प्रचंड यश संपादन केलं त्याला तोड नाही.

पणदुसरीकडे राजकारणी लोकांनी काश्मिरचा प्रश्न आपआपल्या फायद्यासाठी वापरलाआहे. सगळ्यात मूळाशी गेलं तर इतके वर्ष काश्मिरमध्ये दहशतवाद आहे, पणराजकीय लोकांना दहशतवाद्यांनी हात सुद्धा लावला नाही. या पाठीमागे काय आहे? सर्वपक्षाचे आमदार, खासदार मुक्तपणे हिंडत आहेत पण दहशतवादी त्यांच्यावर हल्लाकरत नाही. त्यापाठी गौडबंगाल काय आहे? समीर वानखेडेच्या प्रकरणात हे समोरआलेले आहे. दहशतवाद हा माफियाच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही आणि या देशातीलमाफिया सर्वात जास्त पैसा कमावते ते ड्रग्सच्याच तस्करी मधून. अफगाणिस्तानहुन पाकिस्तान मध्ये ड्रग्स आणली जातात, तिथे त्याच्यावर प्रक्रिया होते. मगकाश्मिर, पंजाब आणि राजस्थानद्वारे हे भारतामध्ये वितरित केले जातात आणिगावागावांमध्ये, गल्ली-गल्लीमध्ये ड्रग्सचा प्रसार होत आहे. समीर वानखेडेनीत्याविरोधात मोहीम उघडली आणि जवळजवळ १२०लोकांना तुरुंगातघातले.  त्याच्याविरोधात राजकीय नेते उभे राहिले. एवढ्या सक्षमअधिकाऱ्याला बदली करून बाहेर पाठवण्यात आले. एका मंत्र्याने किंवा पक्षांनीड्रग्स विरुद्ध लढणार्‍या अधिकाऱ्यांविरोधात एवढा काहूर माजवायची काय गरज होती.तर ड्रग्सच्या तस्कऱ्यांना सोडण्यासाठी समीर वानखेडेला बाहेर पाठवण्यात आले, हामाझा स्पष्ट आरोप आहे.

दहशतवादी तस्करी करतात आणि प्रचंड पैसा कमवतात त्यातून तेहत्यारे वगैरे घेतात. म्हणून काश्मिर, पंजाब किंवा राजस्थान मध्ये माफियांनापकडण्याची मोहीम कधीच दिसली नाही. इथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा कधीहीदहशतवादाने हात लावला नाही. कारण राजकीय नेतृत्व हे ड्रग माफियाच्याजिवावर उभे आहे. सर्व पक्षाचे नेते तस्करीला बघतात व मदत देखील करतात. यातीनही  देशावरील ड्रग्स तस्करीचा डॉन कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दाऊदइब्राहिम हा जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणला जातो आणि त्यांचा मुख्यव्यवसाय ड्रग्स तस्करीचा आहे. याला राजकीय नेत्याची पूर्ण मदत आहे आणि म्हणूनच हीतस्करी बिनबोभाट वर्षानुवर्षे चालत आहे,त्यात आमचे सैनिक मारले जात आहे.

यापार्श्‍वभूमीवर बघताना लोकसभेमध्ये डिफेन्सचे राज्यमंत्री अजय भट यांनीमाहिती दिली की गेल्या तीन वर्षांमध्ये १७७सैनिक दहशतवादात मारले गेले. १०३३ हल्ले दहशतवाद्यांकडून झाले. काश्मिरमधील ३७०कलम काढल्यानंतर हिंसाचारवाढतच चालला आहे. अलिकडे फरक इतकाच आहे की दहशवादी हे काश्मिर मधील तरुण मुलं आहेत. त्या अगोदर पाकिस्तानीदहशतवादी यायचे खूनखराबा करायचे आणि पळून जायचे. पण आता स्थानिक लोक यादहशतवादी कारवाईत जास्त निर्माण झाले आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले वाढत चाललेले आहेत.२०१९ मध्ये ५९४ दहशतवादी हल्ले झाले. २०२० आणि २०१९ मध्ये सुद्धा २००च्यावर हल्ले झाले आहेत. हल्ली थोडे कमी व्हायला करोना जबाबदार आहे.दहशतवावाद्यांनी आता सैन्य दलातील लोकांना नष्ट करण्याचीभूमिका घेतलेली आहे.  त्यापूर्वी खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करतहोते. भट यांच्या प्रमाणेनागरिकांचीही हत्या वाढत चाललेली आहे.विशेषत:काश्मिरी पंडित यांची हत्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे ३७० कलमकाढल्यानंतर जे काश्मिर मध्ये आले होते ते पुन्हा सगळे पळून जात आहेत. भारतसरकार ते थांबवू शकले नाही. त्याच बरोबर सामान्य नागरिकांची हत्याफक्त हिंदूंची पण झाली नाही अनेक मुसलमानांची सुद्धा हत्या झाली. 

सैन्य दलाच्या भूमिकेच्या अगदी विरोधात केंद्र सरकारची भूमिका आहे. सरकारला वाटते कि कठोरपणाने काम केल्यास हिंसाचार कमी होईल.  अमित शहा म्हणाले कि आम्ही दहशतवाद मोडून काढू. परंतु काश्मिरी पंडित याच्या विरोधात भूमिका घेत आहेत. एक काश्मिरी पंडित सरपंच म्हणाला अमित शहा यांच्या वक्त्यव्याहुन सत्य परिस्थिती वेगळी आहे.  काश्मिरी पंडितांची स्थिती ही वाईटच होत चालली आहे. हे भारतीय जनता पार्टीचे काल्पनिक संशोधन आहे. कलम ३७० काढून टाकल्यानंतर जबरदस्त हिंसाचार वाढला आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेलेला आहे. नुसते क्रूरपणे सरकारची हल्ला करण्याची भूमिका यशस्वी होणार नाही.  ३७० नुसता नावालाच उरला  होता. काश्मिरमध्ये स्वतंत्र लोकसभा असणे, राष्ट्रपती होणे, वेगळा झेंडा राहणे हे सगळे इंदिरा गांधीने कधीच उडवून लावले होते. इतर राज्यासारखे काश्मिर हे राज्य होते.  काश्मिरमध्ये प्रधानमंत्री असणे १९७५ मध्ये रद्द बादल झाले होते व शेख अब्दुलाने मुख्यमंत्र्याचे पद स्विकारले होते.

३७० चा एक भाग अजून अस्तित्वात होता.  तो म्हणजे बाहेरच्या नागरिकांना तेथील जमीन घेता येत नव्हती.  पण आता ३७० काढल्यानंतर किती लोकांनी जमीन विकत घेतली आहे?  किती लोकांनी उद्योग उभारला आहे?  लोकांना पूर्ण सुरक्षा मिळाल्या शिवाय उद्योग कसे उभे राहतील? त्यामुळे भारतातील इतर नागरिकांचे समाधान करण्यासाठी आपण काहीतरी फार मोठे काम करत आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारचा दिसतो. 

काश्मिरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मी व सैन्य दलाने केला होता.  १९८९ पासून ७ वर्षे काश्मिरमधील बिघडलेल्या तरुणांची दहशतवादी संघटना आम्ही आपल्या बाजूने वळवली.  १९९५ साली २५०० दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.  त्यानंतर त्यांचा नेता कुक्का पेरे हा आमदार म्हणून सुद्धा निवडून आला. त्यावरून त्याची लोकप्रियता दिसून आली.  त्याची आणि जवळ जवळ १००० आत्मसमर्पित दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे हे लोक आमच्याकडे आले. कारगिल युद्धानंतर भारताचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना आम्ही विनंती केली कि, आत्मसमर्पित दहशतवाद्यांना भारतीय सैन्यात घेण्यात यावे. याला विरोध झाला. परंतु ३ वर्ष प्रयत्न केल्यानंतर भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी आत्मसमर्पित दहशतवाद्यांना प्रादेशिक सेनेत घेण्याची मंजुरी दिली.   मी प्रादेशिक सेनेतच होतो.  मग आम्ही प्रत्येकी १००० च्या ८ फलटणी बनवल्या.  ८००० ची फौज Home and Hearth Battalions म्हणून उभ्या केल्या आणि काश्मिर मधील दहशतवाद संपवून टाकला. यावेळी २०१३ ला आम्ही सैन्य दलातून बाहेर पडलो.  त्यावेळेस काश्मिर मध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित झाली होती.  आत्मसमर्पित दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याला प्रचंड मदत केली. त्यातील अनेक लोकांना शौर्य चक्र, सेना मेडल मिळाली आहेत. गेल्यावर्षी ‘वनी’ या शूर सैनिकाला अशोक चक्र सुद्धा मिळाले.  त्यावरून भारतीय सैन्याने पुन्हा सिद्ध केले कि, लोकांची हृदय आणि मन जिंकूनच दहशतवाद संपवता येतो. 

जगामध्ये ठोकशाहीने लोकांना कधीही दाबता येत नाही.  त्याविरुद्ध लोकांचा बंड उफाळून येतो.  काश्मिरमधील बहुसंख्य नागरिक हे दहशतवादाला विरोध करतात. त्यामुळे कुणी जोर जबरदस्ती केली तर भारताच्या बाजूने असणारे लोक सुद्धा बंड करतात.  या जोर जबरदस्तीने शांत झालेला काश्मिर पुन्हा पेटला आहे.  हे करण्यापेक्षा पाकिस्तानवर एकदाचा हल्ला करून चार तुकडे केले पाहिजेत.  कारण या युद्धात १०००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. सर्जिकल स्ट्राईक सारख्या लुटूपुटूच्या लढाईने दहशतवाद संपणार नाही.  त्याचा कायमच्या बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानला चिरडून टाकले पाहिजे. आणि आपल्या काश्मिर मधील नागरिकांचे हृदय आणि मन जिंकले पाहिजे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS