काळा धंदा (भाग-२)

काळा धंदा (भाग-२)

                        काळ्या पैश्याची निर्मिती विश्वव्यापी, शोषणकारी महासत्तेने केली. जागतिक अर्थव्यवस्था काळ्या पैश्याची गुलाम आहे. म्हणूनच रशियाचे राष्ट्रपती पुतीन, ब्रिटनचे प्रधानमंत्री कॅमेरॉन, नवाज शरीफ अशा अनेक लोकांच्या खोट्या कंपन्या करमुक्त देशात सापडल्या. त्यात भारतातून अनेक लोकांची नावे पण आली. ती सापनाथ कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार आणि नागनाथ भाजप-सेना सरकार जाहीर करत नाहीत.  सुरुवातीला HSBC घोटाळ्यात २०१२ ला ६०० भारतीयांची नावे होती. ती गुप्त ठेवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने मग स्वतः ते प्रकरण हातात घेतले व SIT (खास चौकशी संघ) नेमले. पण दोन्ही सरकारांनी अत्यंत संथ गतीनी चौकशी चालवली. जेणेकरून देश लुटणाऱ्या अति श्रीमंत असणाऱ्या लोकांचे नाव बाहेर येऊ नयेत. काळ्या पैशाविरुद्ध लढण्याचे सोंग करणाऱ्या मोदिनी तर ही सर्व प्रकरणे दाबून टाकण्याचा विडाच उचलला आहे असे दिसते. कारण कुणावरच कसलीच कारवाई होत नाही.

त्यानंतर २०१६ मध्ये जागतिक पत्रकार संघाने पनामा पेपर्सच्याद्वारे खोट्या कंपन्या आणि त्यांचे खरे मालक ह्यांचा पर्दाफाश केला. त्यातच पाक पंतप्रधान नवाज शरीफ, पुतीन, कॅमेरॉन सकट ६०० भारतीयांचे नाव आले. त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय सकट अनेक उद्योगपती, राजकारणी नेते, माफियांची नावे आहेत. पण मोदी सरकारने काहींच केले नाही. आता PARADISE PAPERS मध्ये आणखी ७०० लोकांची नावे आली . जेठली साहेबांनी घोषणा केली कि कडक पाऊले उचलू. पण मोदी सरकारचा इतिहास म्हणजे श्रीमंतांचे संरक्षण करा आणि गरिबांना मारा. पाकमध्ये नवाज शरीफला राजीनामा द्यावा लागला आणि तुरुंगात जावे लागले. पण भारतात अमिताभ बच्चनची साधी चौकशी सुद्धा होत नाही. PARADISE मध्ये, खासदार, उद्योगपती आणि अनेकांची नावे आली आहेत. मोदी साहेब जनता बघत आहे. तुमचा दरवाजा बंद  कारभार लोक पाहत आहेत. परीक्षा जवळ येत आहे. तरी केलेल्या घोषणावर कारवाई करा.

पनामा पेपर्सनंतर १८ महिन्यातच PARADISE पेपर्समधून दुसरा जागतिक गुप्त आर्थिक व्यवहाराचा भांडाफोड ICIJ ह्या जागतिक पत्रकार संघटनेने केला. ICIJ ही जगातील पत्रकारांनी बनवलेली एक संघटना आहे, जी जगातील सरकारांच्या सर्व भानगडी बाहेर काढतात. आजचे गुन्हेगार फार हुशार झालेत. त्यातील पांढरे गुन्हेगार तर अतिशय भयानक. दाऊद पेक्षा अति श्रीमंत सिनेतारक, उद्योगपती, नेते खतरनाक आहेत. दाऊद उघड उघड गुन्हा करतो. पण हे पांढरे गुन्हेगार, त्यांचे हवाला साथीदार, माफिया ह्यांचा चोरलेला पैसा, परदेशी बँकेत लपवतात. मोदीसाहेबच म्हणाले होते कि परदेशात भारतीयांचे ३० लाख कोटी रुपये आहेत. मी सरकारमध्ये आल्यावर हा पैसा परत आणणार आणि प्रत्येक भारतीयांच्या बँकेत १५ लाख रुपये ठेवणार. बँकेत खाती काढून लोक वाट बघत आहेत.

PARIDSE पेपर्स मधून एक कोटी ३४ लाख कागदपत्र उघड  ICIJ ने केली.  त्यात भांडवलदार, माफिया, नेत्यांनी १९ करमुक्त देशात कशी अतिश्रीमंत लोकांनी आर्थिक उलाढाल केली हे उघड झाले. हे काम २ वकीली कंपन्यांच्या मार्फत झाले. APPELBY ही बर्मुडा स्थित कायदा सेवा पुरवणारी कंपनी करमुक्त देशात खोट्या कंपन्या बनवत होती. दुसरी सिंगापोर स्थित ASIACITI. त्यांनी सेवा भावी संस्था, प्रतिष्ठान, आणि खोट्या कंपन्या वापरल्या.  चोरीचा आणि काळा पैसा ह्या १९ देशात लपवला. त्यात इंग्लंडची राणी एलिझाबेथ, गायक मडोना, अशांची  नावे आहेत. राणीने $१.३ कोटी कॅय्मान दीप आणि बर्मुडामध्ये लपवले. भारतात भाजप खासदार रविंद्र सिन्हा ह्यांच्या SIS ह्या कंपनीच्या खोट्या कंपन्या आढळल्या. कुणालाही रिझर्व बँकेच्या परवानगी शिवाय परदेशात कंपनी उघडता येत नाही. लोकसत्ता ग्रुप हा ICIJ चा सदस्य आहे. त्यांनी ह्या सर्व घटनांची माहिती छापली आहे.

राडीया टेप्स फेम नीरा राडियाचे नाव आहे. तिने २ जी प्रकरणात टाटा कडून रु.३० कोटी घेतल्याचे उघड झाले. तिचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संबंध होते. मोठ मोठ्या कंपन्यांचे मालक तिच्या करवी काम करून घेत असत. लाच देणे व मोबदला घेणे हा धंदा ह्या दलालांचा असतो. तीच्या मालटामध्ये २ कंपन्या आहेत. विजय मल्ल्याने ४ परदेशातील कंपन्यांचा वापर करून पैसा त्यात वळवला. APPELBY मध्ये सापडलेल्या माहिती प्रमाणे ही रक्कम रु.१०००० कोटी आहे. वीरप्पा मोईली हे UPA मध्ये मंत्री होते. त्याचा मुलगा हर्ष ह्याची कंपनी मोक्ष युगला MAURITUS मधील UNITUS ह्या कंपनी कडून गुंतवणूक मिळाली. संजय दत्तची बायको मान्यता ची बहामा ह्या अमेरिकन बेटात बेनामी कंपनी आहे.  जयंत सिंह हे केंद्र सरकारचे मंत्री यांची कंपनी D LT DESIGN परदेशात आहे. त्यांनी ते नाकारले आहे पण चौकशी झाली तर खरे बाहेर येईल. त्याचप्रमाणे appelby ने एक कंपनी Mauritius मध्ये नोंदणी केली. राजस्थान मधील अम्बुलन्स घोटाळ्याची सध्या CBI आणि ED कडून चौकशी सूरु  आहे. त्यात अशोक घेलोत, कार्टी चिदंबरम (माजी अर्थमंत्री चिदंबरमचा मुलगा) सचिन पैलट, रवी कृष्ण, माजी मंत्री व्याला रवीचा मुलगा ह्यांची चौकशी चालू आहे. ह्यांनी आपल्या सहभागाबद्दल नकार दिला आहे.  त्याशिवाय राष्ट्रपती ट्रम्पचे १३  मंत्री आणि जवळच्या लोकांचे नाव आहे. ट्रम्पचा व्यापार मंत्री आणि रशियन राष्ट्रपती पुतीनचा जावई एकाच कंपनीचे लाभधारक आहेत. तसेच १०० बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या काळ्या धंद्यात सहभागी आहेत. त्यात, अप्पेल, नायकी, आणि उबेर सुद्धा आहेत.

पनामा पापार्सनी पनामा मध्ये ही जगभर घोटाळा उघडा केला. त्यात उद्योग जगतातील आणि उच्च राजकीय नेत्यांचा घोटाळा बाहेर काढला. त्यात, रशिया, चीन भारत आणि आशियातील लोकांचा काळा धंदा बाहेर आला. paradise पपेर्सने मात्र. जास्त अमेरिका आणि युरोप मधील लोकांचा काळा धंदा बाहेर काढला. GMR  ह्या विमानतळ बांधणाऱ्या कंपनीने फाल्कन २००० विमाने घेतली. त्यांच्या परदेशातील खोट्या कंपनीने, फ्रांसच्या दासालट कंपनीकडून $२.७५ कोटी (साधारण १७० कोटी रुपये) ला विकत घेतली आणि १५ दिवसातच $२.३ कोटीला (रु १४० कोटी) अमेरिकन कंपनीला विकली.  हा सर्व गोलमाल काय आहे?  ते चौकशी अंती कळेल अशी अशा करूया.  झी, पॉल, बहल अशा अनेक उद्योगपतींचे काळे कर्म बाहेर आले आहे.

हा विचित्र व्यवहार लपला नाही. जगातील महाशक्ती आणि अनेक देश काळा पैसा वापरतात. त्यांच्या गुप्तहेर खाती दहशतवादी, माफियाना गुप्त कामासाठी वापरतात. जगातील गुन्हेगारी विश्व ह्यांच्या मदतीशिवाय चालू शकत नाहीत. भारतात हा प्रश्न आणखीन गंभीर आहे. काळा  पैसा सरकारलाच पाहिजे असतो. त्याकरवी माफियांचा उपयोग आपला पैसा लपवण्यासाठी नेते करतात. उद्योगपती तर माफियाचे कवच म्हणूनच काम करतात. मोदी सरकारने पहिल्यांदाच जाहीर केले कि, हया चोरीच्या पैश्यामुळे सगळीकडे दहशतवाद आहे. पण तो रोखायचा असेल तर परदेशातील पैसा बाहेर काढावा लागेल. पण ३ वर्षात सरकारची पावले पक्त गरिबांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना मारण्यात गेली. अति श्रीमंत मजा मारत आहेत. एकालाही अटक झाली नाही. फक्त काही कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर चौकशीचे बालंट आले आहे. अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढण्याचे भाजप सरकारने जाहीर केले पण अजून काही दिसत नाही. लोकांना कृती पाहिजे घोषणा नको. तुमच्या सरकारला ‘घोषणा सरकार’ असे म्हणत लोक खिल्ली उडवत आहेत. जर का तुम्ही ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करणार नाहीत; तर लोक कधीच माफ करणार नाहीत.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS