कोपर्डी आणि भारतातील स्त्री – 14th July 2017

कोपर्डी आणि भारतातील स्त्री

१ जाने २०१७ प्रचंड जनसमुदाय बँगलोरमध्ये गोळा झाला होता. दारू पिऊन आचकट विचकट नाचत दारूच्या नशेत  आई बहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखा बघू लागला.  मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागला व भगिनींच्या अभ्रुचे धिंडवडे उडवू लागला.  जोरात ओरडू लागला ‘हॅप्पी न्यू ईयर’. असे अनेक प्रकार भारतभर फोफाऊ लागले.  १३ जुलै २०१७ रोजी कोपर्डीच्या कोवळ्या वयातील निष्पाप श्रद्धाच्या अमानुष हत्येला एक वर्ष उलटले तरी अद्याप तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही की गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही. संपूर्ण समाजाच्या भावना आता या ज्वलंत प्रश्नाशी जोडल्या गेल्या आहेत. विकृत मानसिकतेच्या नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडुन तिच्यावर निर्घृण बलात्कार केला आणि त्यात त्या निरागस जीवाचा बळी गेला. ही घटना समाजाची मान खाली घालायला लावणारी आहे.  श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेप्रमाणे देशात घडलेल्या स्त्रियांच्या अपमानाच्या  अनेक घटना या देशाला कलंक लावणार्‍या  आहेत. श्रद्धा ही केवळ तिच्या कुटुंबियांची नसून समाजाशी तिचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे. तिच्यावर झालेला अन्याय हा स्त्री असुरक्षिततेचे प्रमाण आहे. हा स्त्री जातीचा प्रश्न आहे कोणा जाती जमातीचा नाही.

हा प्रश्न मोदी फडणवीसच्या राज्यात कसा  बघितला जातो? स्त्री सुरक्षित आहे का? मुलींना मुक्तपणे फिरता येते का?  ग्रामीण भागात बालविवाह का केले जातात? आज अबला स्त्री दिसली, एकटी मिळाली तर सामुहिक बलात्कार होणारच. कारण इंटरनेटवर विकृत संभोगाचे व सामुहिक बलात्काराचे प्रकार उघडपणे दाखवले जातात. त्यामुळे पुरुषांची मने विकृत होऊन जातात. सोबत अमेरिकन सेक्स आणि शराबच्या  संस्कृतीमुळे दारू पिणे म्हणजे पुरुषार्थ असा समज झाला आहे. कोपर्डीत देखील नराधमांनी दारू पिऊन बलात्कार केला, पण दारू पिल्यामुळे नपूसंकता वाढते व संभोग होत नाही किंवा अर्धवट होतो. त्यामुळे नराधम पिसाटला जातो मग त्या गरीब अबला मुलीला क्रूरपणे मारतो. पोलीसदल संरक्षण करू शकत नाही. स्त्रीला पोलीस कायदा शिकवतात आणि गुन्हेगारांवर कारवाई करत नाहीत. अनेकदा पोलीस नराधमाना मदत करतात व मुलीना धमकी देतात. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये होत आहे.

सृष्टी प्रवीण दिवटे वय-२१, यवतमाळ येथील राहिवासी तिचे दिवंगत वडील २७.०८.२०१६ रोजी  प्रवीण दत्तूजी दिवटे यांचा बंटी उर्फ आनंद जैस्वाल, विशाल दुबे, विक्की राय व अनेक लोकांनी डोळ्यात मिर्ची पावडर टाकून  धारधार शस्त्राने, तसेच ४  गोळ्या घालून अतिशय क्रूरपणे खून केला आहे.  या सर्व घटनेची सृष्टी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, एक आठवड्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या कुटुंबास त्रास देण्यास सुरुवात केली. आई आणि दोन बहिणीच कुटुंबात आहेत. त्यांच्यावर  ३०७  सारखे खोटे गुन्हे दाखल केले. वास्तविक जखम असल्याशिवाय ३०७ कलम लावता येत नाही. तरी  १७ वर्षाच्या श्वेताने पिस्तुल दाखविले म्हणून पोलिसानी ३०७ चा कलम त्यांच्यावर लावला.  तिच्याकडे पिस्तुलच नाही.  यवतमाळ पोलिसांमार्फत खुनाचा योग्य तपास होत नाही.  पोलीस वेळोवेळी आरोपींना मदत करत होते.  मुली बाहेर गेल्या की गाडीला अडवणे, धमकवणे, घरासमोर येऊन शिट्या मारणे, उचलून घेऊन जाण्याची धमकी देणे. तुमचा कोपर्डी करू. अशाप्रकारे मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कुणाचाच आधार नाही. गुंडांना घाबरून नागरिक बघ्याची भूमिका घेतात. सर्व गुंड उत्तर भारतीय आहेत आणि भाजपचे लोक आहेत. शेवटी मुलींनी मला फोन केला. मी या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना ओळखत देखील नव्हतो, पण शिवरायांचा मावळा  असल्यामुळे कुणीही भगिनींनी हाक मारली तर धावून जातो.

११.०७.२०१७ रोजी मी त्यांच्या घरी गेलो. माझ्या लक्षात आले की हे परप्रांतीय लोक मुलीचा घात करू शकतात. म्हणून  तक्रार निवेदन घेऊन पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचेकडे गेलो व  बोलणे केले, त्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी मला सांगितले की मुलीबरोबर खाजगी बोलायचे आहे.  वास्तविक महिला पोलीस बरोबर असल्याशिवाय पोलिसांनी एकांतात मुलीबरोबर बोलायचे नसते. हा गुन्हा आहे. तरी देखील चांगल्या भावनेने मी बाहेर गेलो.  दोन बहिणीना तिथेच बसवून घेतले व पोलीस अधिक्षकाने  अतिशय लाज वाटेल इतक्या घाण भाषेत मुलीना धमकावले.  तुम्ही शांत बसा, नाहीतर मी तुम्हा दोघींना जेलमध्ये पाठवेण, त्या आरोपीच्या नादाला लागू नका, ते लोक तुम्हाला जिवाने मारतील अशा  भाषेत मुलींचा  अपमान केला व आरोपींची भीती दाखवली. एका IPS अधिकार्‍याने पोलिसांच्या वर्दीचा अपमान केला. उत्तर प्रदेशचा पूर्ण गुंडाराज यवतमाळमध्ये पोलीस अधिक्षकाने स्थापन केला हे सिद्ध झाले. गुन्हेगारांचा दारूचा व्यवसाय आहे. म्हणून मी मुलींना घेवून गृह राज्यमंत्री केसरकर आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुलींना सुरक्षा देणे व पोलीस आणि अधिक्षकावर कडक कारवाई करण्यास आग्रह धरला आहे. तसेच अधिक्षक योग्य तपास करणार नाहीत म्हणून तपास C.B.I मार्फत करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तक्रार निवेदन सादर करून देखील काहीं कारवाई न झाल्यास आरोपी मुजोर होतील व मुलींच्या  जीवितास व अब्रूस धोका निर्माण करतील हे देखील मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तरी ३० तारखेपर्यंत शासन काय करते ते पाहणार आहोत व ३० जुलैला यवतमाळ येथे नागरिकांचा मेळावा घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत.

ह्यावरून दिसते की कोपर्डीच्या हत्याकांडानंतर मोर्चे निघाले अनेक, पण रांजाच्या पाटलाचा अंमल वाढतच चालला.  बलात्कार होतच चालले.  हात पाय कलम करणारा शिवराय पुन्हा केव्हा निर्माण होणार ह्यांची वाट सर्व अबला बघत असतील.  पण तो कधीच निर्माण होणार नाही हे लक्षात ठेवा.  आपले सरंक्षण आपणच करायचे.  तुम्हीच जिजाऊ, तुम्हीच ताराराणी, तुम्हीच अहिल्याबाई बनल्याशिवाय हया पाशवी वृत्तीला काबूत आणू शकत नाही. मोघलाई कशाला म्हणतात? तर हयाच पाशवी प्रवृत्तीला.  आधुनिक सरदार, अंमलदार, राजे, राजवाडे, देशपांडे, देशमुख स्त्रिया हया आपली मालमत्ता समजतात.  कुणाचीही मुलगी किंवा स्त्री उचलावी अन उपभोग घ्यावा.  आज जंगल राज स्थापन झाले.  युरोपमध्ये असो, का अरबस्तानमध्ये असो, का भारतात असो.  मध्ययुगात स्त्री सत्तेचे अवशेष पुर्ण नष्ट झाले आणि पुरुषी कौर्याचे पर्व प्रचलित संस्कृती बनली.  मनमोहन सिंग, शरद पवार, मोदी किंवा उद्धव ठाकरेंनी स्त्री अत्याचारावर काही म्हटल्याचे किंवा केल्याचे मला तरी आठवत नाही.  सर्व प्रश्नापेक्षा हाच प्रश्न आज समाजाला भेडसावत आहे.  भयभित करत आहे.  सामाजिक संघटनांचे तरी काय.  उगाच महापुरुषांची नावे घ्यायची आणि दुकाने मांडायची.  मुळ प्रश्नाला हात घालायचा नाही.

असे का? त्याचे कारण आजची विकृत व्यवस्था.   अमेरिकन भांडवलशाहीने एक नविन संस्कृती निर्माण केली.  सेक्स आणि शराबची.  भांडवलशाहीने उपभोगवादाला जन्म दिला.  ओरबडून खायचे.  वाटेल ते करा पण नफा झालाच पाहिजे.   भारताची संस्कृती काय?  साधी राहणी उच्च विचारसरणी, शेजारधर्म अशी होती.  योगसाधना, शांत अशा अनेक पैलूंनी बांधलेली होती.  तिचे समूळ उच्चाटन करून सनी लिओनला मान्यता देऊन पैशासाठी पिक्चरवर सेक्स करण्याला प्रतिष्ठा दिली.  तिच्या सेक्स करताना अनेक फिल्म क्लिप प्रसारीत झाल्या आहेत.     अशा अवस्थेत भारतीय समाज विध्वंसाकडे झपाट्याने चालला आहे.  कोण रोखणार?  सरकार?  अजिबात नाही.  कायदा हया गोष्टी रोखू शकत नाही.  तर समाजालाच हा उठाव करावा लागेल.  सिनेमातील विकृत चित्रण आधी बंद केले पाहिजे.  सेन्सॉर बोर्ड तर मनमोहन मोदींच्या राज्यात नसल्यासारखाच आहे.  हे सिनेमा जनतेने बंद पाडले पाहिजेत.  सभ्यता अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे हे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना संस्कारीत केले पाहिजे.   गावागावात महिला सुरक्षा दल स्थापन केले पाहिजे.  एकंदरीत भारताच्या संस्कृतीत जीवनाचे पुर्णबांधणी झाली पाहिजे.  हे सोपे नाही पण अशक्य देखिल नाही. यासाठी महिलांनाच पुढाकार घ्यावा लागेल.  सर्व समाजातील मोर्चाना माझे आव्हान आहे की स्त्री सुरक्षा आणि सन्मान हेच एकमेव उद्दिष्ठ ठेवा.  जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई यांचा आदर्श बाळगून स्त्री सन्मानाचे नविन पर्व भारतात आणू.  ३० जुलैला यवतमाळ येथे जमू.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/

ब्रिगेडियर सुधीर सावंत

  • Call – 998 771 4929

For Appointment – Shyam Sonar (74000 63236)

You can send him message by clicking here

शून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस

केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते.  .. Read More

छ शिवाजी म कृषी विद्यालय

छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

संयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ

या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते

मुंबई फेस्टिव्हल फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे

बाल शिवाजी हायस्कूल

कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष

मिलिटरी स्कूलअंबोली

Demo Content

Brig. Sudhir Sawant Says…

We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.

We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj

My Facebook Page

Unable to display Facebook posts.
Show error

Error: The 'manage_pages' permission must be granted before impersonating a user's page.
Type: OAuthException
Code: 190
Please refer to our Error Message Reference.
Copyright © 2019 Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4