खासदार आणि आमदार यांची पेन्शन_२६.५.२०२२

खासदार आणि आमदारयांनी पेन्शन घेऊ नये, म्हणून अनेक लोकांनी मागणी केलेली आहे.  लोकांना असे वाटते सर्व खासदार आणि आमदार हे करोडपती आहेत. मगत्यांना पेन्शन कशाला पाहिजे? काही अंशी हे खरं आहे.  काही खासदार, आमदार, मंत्रीइतके श्रीमंत आहेत कीजी पेन्शन मिळते ती फक्त चहा पाण्यासाठी वापरण्यात येते.  पणयाला एक दुसरी बाजू पण आहे.  जी कोणी बघत नाही. या देशांमध्ये सर्व खासदार -आमदार कर भरत असते व सदाचारी असते, तर  देश बरबाद झाला नसता. सर्वच आमदार-खासदार हे बेईमान असते तर भारताचे पाकिस्तान झाले असते.  पण तुम्ही जर जाणीवपूर्वक पाहिले तर असे अनेक आमदार-खासदार आहेत, जे काम करतात.  देशासाठी, समाजासाठी, त्यागाच्या भूमिकेतून सुद्धाकाम करतात. जर त्यांना पेन्शन नसेल तर निवडणुकीत पडल्यानंतर जगणेहीकठीण होऊन जाते.  भ्रष्टाचारावर व प्रचंड श्रीमंती मिळवण्यावर काय काय करावेलागते याचा अभ्यास केला पाहिजे.  शेवटी कुठलाही सरकारी आदेश हाअधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सही शिवाय कार्यान्वित होत नाही. त्यामुळे जर कुठले सरकार भ्रष्ट असेल किंवा कुठला खासदार आमदार मंत्रीभ्रष्ट असेल तर त्याला मान्यता देण्याचे काम कार्यान्वित करण्याचे काम हेअधिकारी आणि कर्मचारी हेच करतात.  ह्या विषयाकडे कोणीच बघत नाही.

तुम्ही बघितलेअसेल अनेक तलाठ्यांचे बंगले, घर हे प्रचंड मोठे आहेत आणि त्यांच्याकडेगाडी घोड्यांची काहीच कमतरता नाही.  त्यामुळे ही सर्व व्यवस्था भ्रष्ट झाली आहे, तर जर अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश देण्याचे मान्य केले नाही तर भ्रष्टाचार होणारनाही ,मग आपल्याला पूर्ण व्यवस्थेकडे बघावे लागेल.  कारण भ्रष्टाचार आणिगर्भश्रीमंत हा एक व्यवस्थेचा भाग आहे आणि ही व्यवस्था जोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त होत नाही, तोपर्यंतभ्रष्टाचार संपणार नाही व राजकीय नेते व अधिकारी लोकांना ओरबाडून खाऊन प्रचंड पैसा कमावतील. अनेक चित्रपटांमध्ये कादंबऱ्यांमध्ये, नाटकामध्येराजकरणातला भ्रष्टाचाराचा गवगवा केलाजातो.  ते खरंही असेल. पण राष्ट्रात पूर्णपणे प्रामाणिक  खासदार-आमदारांबद्दल कोणी लिहित नाही.  मला आठवते की माझे वडील १५ वर्षेशेतकरी कामगार पक्षाचे प्रामाणिक आमदार होते. १५ वर्षानंतरनिवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर आमच्या घरात एक पैशाचे देखील उत्पन्न नव्हतं.  त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थिती कुटुंबावर आली. मुंबई मध्ये आम्हीकसेबसे करून दोन गाड्या विकत घेतल्या आणि मी टॅक्सी ड्रायव्हर झालो.  हा माझापहिला उपक्रम आहे. यामधून कॉलेज करता करता कुटुंब सावरलं आणि पुढचीवाटचाल आम्हाला करता आली.  त्यातून मी सैन्यामध्ये गेलो. एका प्रामाणिक आमदाराचे काय होते याचा मला चांगला अनुभव आहे.  अशा आमदार खासदार बरोबर मी मोठा झालो, ज्यांनीदेशासाठी प्रचंड त्याग केला.

पेन्शनचा विचार करतेवेळीया लोकांचा विचारकेला पाहिजे.  असे समाजसेवक व जे राष्ट्रभक्त आहेत, स्वच्छ प्रतिमा असलेले लोकआहेत, ज्यावेळेला पेन्शन आणि पगार याचा आपण विचार करतो त्या वेळेला लक्षातठेवलं पाहिजे ही मंडळी राज्य करत आहेत आणि ही मंडळी राज्य करताना भिकारी राहूनचालणार नाही.  त्यामुळे पगार आणि पेन्शन हे अशा गरीबातल्या गरीब आमदार – खासदारांना असले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. आमदार जेव्हा माजी आमदार होतो त्या परिस्थतीत प्रामाणिक आणि देशभक्त आमदाराची काय परिस्थिती होते हे काम बघण्याचे काम सुद्धा जनतेचे आहे. म्हणून पेन्शन कुणाला दिली पाहिजे हे खासदारांच्या उत्पन्नावर ठरवून आपल्याला निर्णय घेतला पाहिजे.ज्या आमदार – खासदारांचे इन्कमटॅक्स २० लाखाच्या वर आहे त्यांनी पेन्शन घेऊ नये असे मी स्पष्टपणे म्हणतो. असे जे आमदार खासदार आहेत. त्यांच्याबद्दल वेगळा विचार असला पाहिजे आणिउत्पन्नाच्या दर्जा प्रमाणे त्यांना पेन्शन देण्यात यावी असे विचार मीलोकसभेत सुद्धा मांडले आहेत.  लोकसभेमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होते. सरकार पगारवाढ जाहीर करते, पेन्शन वाढ जाहीर करते तेव्हा सगळ्या पक्षाचे नेतेत्याला विरोध करतात.  फक्त लोकांना दाखवायला हे नाटक आहे.

मी जेव्हा खासदारझालो त्यावेळी आर्मी मध्ये मला ८००० पगार होता. पण खासदार म्हणून ५००० रुपये पगारमिळायचा.  ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या काळात शंभर लोकं घरी रोज भेटायला येत असत. त्यांना एक कप चहा तरी दिला पाहिजे. तसेच शंभर पेक्षा जास्त पात्रांना  रोज उत्तर तरीदिली पाहिजेत. जो खर्च होतो तो खासदारांच्या पगारमध्ये भागू शकत नाही. म्हणून मी लोकसभेतल्या भाषणांमध्ये म्हटलं होतं कि, जेनेतेमंडळी उत्पन्नाने सधन आहेत, त्यांना पगाराची गरज नाही.  पगार आणि पेन्शन त्या लोकांना असला पाहिजे ज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असते. या आमदार-खासदारांनी जास्तीत जास्त काम करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. भिकारी खासदार-आमदार काय करू शकतात.  आपल्या आमदार – खासदारांना भिकारी बनविण्याचा अट्टाहास सोडा. जनता प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्याकडे जाऊ शकत नाहीत, त्यांना लोकप्रतिनिधीकडे जावे लागते आणि लोक प्रतिनिधी जनतेचे प्रश्नसोडवण्यासाठी प्रयत्न करतात.  काही लोक हे करत नसतील, पण तरीदेखील लोकांना आपल्यातक्रारी मांडण्यासाठी, आपले प्रश्न मांडण्यासाठी, लोकप्रतिनिधी उपलब्ध असतात. अधिकारी नाही हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींची ताकदवाढविण्यामध्ये लोकांनी पीछेहाट करू नये.  जसं खासदार आणि आमदार निधी झाला  हा निधी खासदारांचा आणि  आमदारांचा व्यक्तिगत नाही. जनतेची सेवा करण्यासाठी हा निधी आहे. कुठलेही काम करायचे असल्यास खासदार-आमदार कलेक्टरला पत्र लिहितात व आपला निधी देतात. मग सरकारी यंत्रणा ते काम पूर्ण करतात.  फायदा असा आहे कि कुठलाही रस्ता पाहिजे असेल , किंवा पाणी पाहिजे असेल किंवा शाळेची खोली पाहिजे असेल तर तातडीने तर खासदार आनंदाने काम करू शकतात  आणि म्हणूनकमीत कमी पाच कोटीची काम तरी लोकांची होतात आणि सामान्य माणूस जाऊन आमदार-खासदारांकडे हे प्रकल्प मागू शकतात, पाणी मागू शकतात आणि तातडीने त्याच्यावर उपाय योजना आमदार-खासदार करू शकतात.  नाहीतर सामान्यपणे प्रश्न सुटत नाहीत.  त्याला फार वेळ लागतो म्हणून बघितलंपाहिजे आपल्या खासदार आणि आमदारांना ताकद दिली पाहिजे.

आपल्याजनप्रतिनिधीना तुम्ही मजबूत केले तर तुमची कामे सुद्धा लवकर होऊ शकतात हेस्पष्ट आहे.  त्यातला राजकारणाचा भाग सोडला तर दुसरं कोणी तुमची काम करणारनाही हे स्पष्टपणे आपल्याला माहिती आहे. आमदारांना निवडणूकीमध्ये प्रचंड खर्चकरावा लागतो.  कुणी काही म्हटलं तरी ही सत्य परिस्थिती आहे.  निवडणुकीत लोकांनीपैसा गोळा करून मला दिला होता आणि म्हणून मला तसा जास्त पैसा लागला नाही. निवडणुका या सरकारी पैशाने व्हाव्यात अशी एक मागणी आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष श्रीमंत राजकारणी करतात. कुठलाही कायदा किंवा व्यवस्था त्या गरिबातल्या गरीब माणसासाठी असली पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे देशसेवा केली आहे आणि ती करत असताना या भ्रष्टाचारी व्यवस्थेने आम्हाला वैयक्तिकरित्या प्रचंड त्रास दिला आहे.  निवडणूक लढविण्यासाठी जो लागेल तो पैसा एका प्रामाणिक माणसाला असह्य आहे. पण व्यवस्थेने आणि समाजाने प्रामाणिक लोकप्रतिनिधीना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे.  कारण हा देश त्यांच्यामुळे टिकून आहे, सर्व राजकारण्यांप्रमाणे प्रामाणिक राजकारण्याला बदनाम करून प्रामाणिकपणा नष्ट होत चालला आहे. पुढच्या काळात अशी परिस्थिती येऊ शकते कि १००% लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी होतील.  त्यावेळी या देशाला वाचविणारा कुणीच नसेल आणि म्हणून राजकारण्यांना सरसकट दोष देणे हे बंद करावे लागेल आणि प्रामाणिक राजकारण्यांना लोकांनी संरक्षण दिले पाहिजे. तरच भविष्यामध्ये भारत टिकेल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS