तत्त्वज्ञान आणि राजकारभार

राजकारणावर तत्वज्ञानाचा प्रभाव प्रचंड होता. समाजाच्या परिस्थितीवर आधारित राज्य कारभाराची पद्धत होती. समाजाची परिस्थिती मानवाकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर होते. जसे रानटी मानव शिकार करायचा आणि टोळ्यात रहायचा जे काय मिळेल ते वाटून खायचा. त्यांचा एक प्रमुख असायचा जो त्यांचे संरक्षण करत असे आणि निर्णय घेत असे. जेव्हा कृषी तंत्रज्ञावर आधारित समाज निर्माण झाला, त्यात मानव स्थिरावला. घर बांधू लागला त्यातून गाव निर्माण झाले. समाज निर्माण झाला. त्यातूनच हुकुमशाही निर्माण झाली. निसर्गाचे अद्भूत प्रकरण पाहून देवाची कल्पना पुढे आली. गाव तेथे देऊळ निर्माण झाले आणि त्यात एक पुजारी निर्माण झाला. पुजारी राजाचा सल्लागार झाला. हळूहळू राजा पुजाऱ्यांनी एक कडक समाज व्यवस्था निर्माण केली ज्याला भारतात चतुवर्ण म्हणतात. त्यालाच अरबांनी नाव दिले हिंदु लोक म्हणजेच सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक.

मुळात चातुवर्ण फुकट राबणारी जमात निर्माण करण्यासाठी झाली. राजा/पुजारी समाजाच्या कष्ठावर श्रीमंत झाले. राजेशाही तत्वज्ञानावर राज्यकारभार चालायचा. राजा हा देवाचा अवतार.  त्याने केलेलं सर्व माफ. त्याची मर्जी म्हणजे देवाची मर्जी. राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी प्रजेने राजाच्या मर्जीवर चालायचे. जगाच्या इतिहासात  लोककल्याणकारी राजे हाताच्या बोटावर मोजता येतात. त्यापेक्षा प्रजेचे शोषणकर्ते हजारो राजे झाले. गौतम बुद्धने राज्यकारभार सोडला आणि लोकांना सुखी करण्यासाठी आयुष्य घालवले. त्यांचे यश ह्यातच आहे कि लाखो लोक त्यांच्या विचारावर चालू लागले. सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर भारत जिंकला. पण बुद्धांच्या आचार विचारावर लोकांची मने जिंकली.  पुन्हा अशोकला, तलवार हातात घ्यावी लागली नाही. भारत सुजलाम सुफलाम झाला. देशात सुवर्ण युग आले. जागतिक व्यापाराचा ३३% हिस्सा भारताचा होता.

धर्मकरणाचा राजकारणावर चांगला प्रभाव कसा असतो हे सम्राट अशोकाने दाखवून दिले. पण राजकारभारावर दुष्परिणाम कसा असतो हे असंख्य वर्ष मानवाने भोगल आहे. राजकारणात लोकांना धर्माच्या/ जातीच्या नावावर पेटवणे सोपे असते. जगात एकाच वेळी कृषी संस्कृतीत राजेशाहीच राज्यकारभाराची एकमेव पद्धत झाली. त्यावर वेगवेगळ्या धर्माचा प्रभाव होता. आधुनिक काळात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पडला व राज्यकारभार धर्मगुरूंच्या प्रभावाखाली चालू लागला. त्यात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म मानणारे राज्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यात गोरा माणूस विजयी झाला .

गोरा माणूस विजयी का झाला तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे. वाफेचे इंजिन निर्माण झाले, त्याचबरोबर गोळाबारुद, तोफा निर्माण झाल्या. जग बदलून गेले. म्हणून आपण गोऱ्यांना सुधारलेले म्हणतो. कारखाने निर्माण झाले. गावातला माणूस शहरात आला. कारखान्याचे मालक श्रीमंत होऊ लागले. थोड्याच काळात भांडवलदार राजा पुजाऱ्यापेक्षा श्रीमंत झाले. आपल्याला पाहिजे तसा राज्यकारभार असावा असे त्यांना वाटणे साहजिकच आहे. त्यांनी मग राजाच्या/पुजाऱ्यांच्या श्रेष्ठत्वाला आव्हान उभे केले. मानवी हक्काची कल्पना निर्माण झाली त्यातून लोकशाही प्रणाली मूळ धरू लागली. पण राजांनी जुमानले नाही, संघर्ष सुरु झाला. अखेर इंग्लडमध्ये क्रांती झाली. लोकसभा विरुद्ध राजा असे यादवी युद्ध पेटले.  ख्रिस्ती चर्च फुटली होती. रोमन ख्रिस्ती हे राजाबरोबर होते आणि ज्यांना प्रोटेस्टनट म्हणतात ते जनतेच्या सैन्याबरोबर होते. राजाचा पराभव झाला. राजा जेम्स १ ला १६४९ मध्ये लंडनला  सुळावर लटकावण्यात  आले. ह्या क्रांतीचा जगात प्रचंड परिणाम झाला. सगळीकडे क्रांतीचे पर्व सुरु झाले. त्यातूनच, अमेरिकन क्रांती झाली. लोकशाहीची लिखित घटना बनली. मानवी हक्क प्रस्थापित झाले.  फ्रांसची क्रांती झाली.  स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वावर राज्यकारभार सुरु झाला. धर्माला राजकारणातून दूर ठेवण्यात आले. सर्व क्रांतीत, भांडवलदारांनी क्रांतीकारकांना मदत केली कारण त्यांना सुध्दा  राजा/ पुजाऱ्याचे वर्चस्व नको होते.

ह्याच दरम्यान भारतात शिवनेरीवर शिवरायाचा जन्म झाला. १६४९ ला शिवराय १९ वर्षाचे होते. इंग्लंडमधील क्रांतीचे वारे भारतात पोहोचले होते. जमीनदारी नष्ट करण्यात आली होती. म्हणून शिवरायांनी भारतात जमीनदारी नष्ट केली. धर्माचा राज्यकारभारावर परिणाम होऊ दिला नाही. चातुवर्ण नष्ट केले. १८ पगड जाती जमातींना हृदययाशी कवटाळले. दलिताच्या हातात तलवार देणारे पहिले राजे झाले. त्यामुळेच तथाकथित सनातन धारणा जुमानली नाही. म्हणूनच सर्व धर्मगुरुनी त्यांचा राज्याभिषेक करण्याचे नाकारले. असे असताना तिथीवर राज्याभिषेक करण्याचे आज कारण काय? रामदास स्वामी जर शिवरायंचे गुरु म्हणतात तर त्यांनी राज्याभिषेक का केला नाही? खोटा इतिहास रचून शिवरायांना बदनाम करण्याचा व आपले तत्व समाजाच्या माथी मारण्याचे काम धर्मगुरूने केले.  त्याचप्रमाणे मोघल राज्य करत होते. सम्राट अकबराने हिंदू आणि मुसलमानांचा मिळून धर्म स्थापन करायचा प्रयत्न केला.  मुस्लिम धर्मगुरूने विरोध केला. म्हणूनच एवढा मोठा सम्राट होऊन देखील त्यांना मानत नाहीत, उलट जुलमी राजे युद्धात इस्लामचा वापर करत.  स्वत: दारू पिणे, बायकांवर अत्याचार करणे हे करणारे मुस्लिम राजे देखील धर्म वेडे नव्हते.  पण राजकारणासाठी धर्म वापरला. पण शिवरायांनी कधीच वापरला नाही. म्हणूनच रायगडावर मस्जिद बांधली. आपल्या शत्रूची अफझल खानची कबर सन्मानाने बांधली. शिवरायांच्या विशाल मनाचा थांगपता आताच्या हिंदुत्ववाद्यांना आला नाही.  म्हणून शिवरायांनी समाजाला दिलेल्या लोकशाही प्रणालीचा वापर सध्याच्या स्थितीत होणे गरजेचे आहे.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS