मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा.

कोल्हापूर :

आप महाराष्ट्र संयोजक माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर येथील सुरू असलेल्या दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा देवून मार्गदर्शन केले.

राज्यकर्त्यांच्या मनात असेल तर ते काहीही करू शकतात. मराठा, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका महिन्यात सुटू शकतो. मात्र तशी सरकारची इच्छाशक्ति दिसत नाही. सरकार वेळकाढूपणा करत आहे.
”मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून चर्चेत आहे”. आघाडी सरकारने काहीच केले नाही. कार्यकाळ संपताणा ‘नारायण राणेंनी समितीची’ घोषणा केली. समितीने सादर केलेल्या अहवालात तांत्रिक आधार नव्हता. त्यांनी मराठा समाजाची क्रूर चेष्टा केली. आता भाजपही लोकांना फसवत आहे. आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी घटनादुरुस्तीची गरज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटना दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे का पाठवत नाहीत? प्रस्ताव केंद्राकडे गेल्यास बहुमताच्या जोरावर घटना दुरूस्ती शक्य आहे”.

Please follow and like us:

Author: admin