माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत

माझा राजकारणात प्रवेश हा एक अपघात होता. १९९१ साली, मध्यावधी निवडणूक लागल्या व राजीव गांधीनी कॉंग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. माझे वडील हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, नंतर आमच्या आग्रहाखातर १९८० साली शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे आम्ही कोणी शरद पवार यांचे विरोधक होतो असे नाही,पण कालांतराने मी काँग्रेसचा खासदार असताना भ्रष्टाचाराचा महामेरू बघितला आणि मी विरोधात उभा राहिलो. त्याचे कारण १९९२ चा सुधाकर नाईकांचा माफिया विरुद्ध लढा. ह्या देशात एकच मुख्यमंत्री होऊन गेला ज्याने माफियाविरुद्ध थेट लढा दिला. ज्यामुळे भारताच्या  राजकारणात भूकंप झाला.

१९९१ ला खासदार झालो तेव्हा मी राजकारणातील व्यवस्थेबद्दल पूर्ण परिचित होतो.  कारण देशाच्या सुरक्षेला सर्वात हानिकारक राजकारणी लोक असतात. बरेच लोक प्रत्यक्ष शत्रू राष्ट्रांचे हेर आहेत. आज देखील बरेच नेते CIA ही अमेरिकन गुप्तहेर खात्याचे हेर आहेत. जसे १९७१ च्या युद्धात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात CIA चा हेर एक मंत्री होता. तो सर्व माहिती CIA ला पुरवायचा. आज शत्रू राष्ट्रांच्या हेरांची संख्या वाढली, त्यामुळे मंत्रीमंडळ खुनी MONSANTO कंपनीच्या ऐवजी शेतकऱ्यांना मारते. कारण MANSANTO अनेक अमेरिकीन गुप्तहेर काम करत आहेत.

१९९१ ला कांही मंत्री दाऊदचे हस्तक होते. ह्याची पूर्ण माहिती मी नाईक साहेबांना दिली. त्याच बरोबर शंकरराव चव्हाण आणि प्रधानमंत्री नरसिंहरावना दिली. सुधाकर नाईकांनी माफियाला सळो की पळो केले. एकाच महिन्यात मुंबई माफिया मुक्त केली.त्याबरोबर नाईकांना काढण्याचे षडयंत्र सुरू झाले. २८ ऑक्टोबरला मी पंतप्रधानांना भेटलो आणि पत्र दिले. पत्रात स्पष्ट म्हटले की नाईकांना काढण्यासाठी मुंबईत उग्र दंगल घडविण्यात येईल.तरी माझ्या सुचनेकडे दुर्लक्ष्य करण्यात आले. माफिया हा राज्यव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. गुप्तहेर खात्यात काम केल्यामुळे ह्याची पूर्ण माहिती मला होती. कारण माफिया राजकीय नेत्यांच्या काळ्यापैश्याची वसुली करतो आणि पांढरा ही करतो. हे मी म्हणत नाही तर गृह राज्य सचिव वोरांच्या अध्यक्षतेखाली व्होरा समिती मी गठीत करायला लावली. त्यात सर्व गुप्तहेरखात्यातील प्रमुख होते. त्यांनी स्पष्ट म्हटले की भारतात राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी आणि माफियाचे समांतर सरकार राज्य करत आहे.मग घडायचे तेच घडले. बाबरी मस्जिद काँग्रेस-भाजपच्या संगमताने पाडण्यात आली आणि सुधाकर नाईकांना काढण्यात आले. शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि माफिया राज परत महाराष्ट्रात प्रस्थापित झाले. गुन्हेगारी संपवण्याची एकमात्र संधी गेली.

असो, मी राजकारणात आलो का? माझा मूळ पिंड राजकारणाचं होता. पण १९७१ च्या युद्धामुळे मी भारावून गेलो आणि सैन्यात अधिकारी झालो, पुढे त्याच अनुषंगाने राजीव गांधींनी मला लोकसभा लढवण्यासाठी संधी दिली तेव्हा मी स्वीकारले आणि राजापूर मतदारसंघात ५ वेळचे खासदार प्रो. मधू दंडवते, भारताचे अर्थमंत्री यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली व खासदार झालो. त्याच काळात २१ जून, १९९१ ला श्रीधर नाईक माझा प्रचारप्रमुख याची कणकवलीत मुंबईतील गुंडाकरवी हत्या करण्यात आली.  प्रमुख आरोपी नारायण राणे होते. जे नंतर मुख्यमंत्री झाले.  त्यांना माझ्याच पक्षाचे शरद पवारांचे खास अरुण मेहतानी जमीन मिळवून दिला. हा मला फार मोठा धक्का होता. त्यात राजकारणातील नीचपणा स्पष्ट दिसतो.

त्याच संघर्षातून हिंसक राजकारण सिंधदुर्गत पेटले. आरोपीने रंगे हात पकडले. नारायण राणेंचे पेट्रोल पंप, घरदार लोकांनी जाळून टाकले. अनेक हिंसक घटना घडल्या. आणखी एक कॉंग्रेस  युवा अध्यक्ष  सत्यविजय भिसेची सुध्दा हत्या झाली. त्यावेळी परत लोकांनी नारायण राणेचे घरदार पेटवून  टाकले. काँग्रेसचे नेते भयभीत झाले. मला मग जशास तसे उत्तर द्यावे लागले. तत्कालीन काळातील शिवसेनेची गुंडगिरी मोडून काढावी लागली, पण नियती कशी क्रूर खेळ करते,  मी आमदार असताना एक दिवस विरोधी पक्ष नेते नारायण राणेना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रस्ताव मला कळला.  तब्बल २ वर्ष आधी मी ते जाहीर केले . त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राजापूर येथे कोर्टात माझ्यावर हल्ला केला. भ्याड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता मलाच पकडून कोर्टात नेले, पण राणेंचे कार्यकर्ते इतके मग्रूर की त्यांनी कोर्टावरच दगड फेक केली. न्यायाधीश संतापले. ते बाहेर आले कंपाउंडवरून उडी मारून मारेकऱ्यांवर चालून गेले. तेव्हा कुठे पोलिसांनी सर्वाना अटक केली.

पण पूढे जाऊन २ वर्षांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले. मी विरोध केला त्यावेळी सोनिया गांधींनी मला  विचारले की राणे राष्ट्रवादीत गेले तर काय होईल? मग मी उत्तर दिले की काँग्रेसचे नुकसान होईल, पण त्यांना घेऊन काहीच फायदा होणार नाही. पक्षाने त्यांना घेतले, त्याबरोबर माझी कुचंबणा होऊ लागली. त्यांच्याबरोबर एकाच गाडीत बसताना शिसारी येत होती. राजापुरातील मारेकरी मुख्य माझ्याच गावातील भावकीतील दोघे होते सतीश सावंत व गोट्या सावंत. त्यामुळे मला सर्वांनाच माफ़ करावे लागले.त्याच काँग्रेसने प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी घेतला. माझे सर्व निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते हतबल झाले. पुढे जाऊन नाईक कुटुंबाने काँग्रेससाठी बलिदान केले. त्यांना शिवसेनेत जावे लागले व श्रीधर नाईकांच्या पुतण्याने वैभव नाईकने राणेंचा पराभव केला. त्यात आम्ही पूर्ण मदत केली व राणेंचा मुलगा  लोकसभेला उभा होता त्यालाही जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाडला. ह्या सर्व घटनाक्रमात माझ्या पक्ष्याच्या मुख्यमंत्र्यांनी राणेंना मदत केली.  विशेषतः सुशील कुमार शिंदेनी म्हणून २००४ ला मी हट्टाने सोनिया गांधींना त्यांना काढायला लावून विलासराव देशमुखना मुख्यमंत्री करायला लावले.

राजकारणात आजचे शत्रू उद्याचे मित्र असतात हे मी अनेकदा ऐकले होते पण माझ्या बाबतीत काहीस विचित्र झाले. पूर्ण कोंकणात फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस शिल्लक राहिली. ती निष्ठावंतांची काँग्रेस राणेंकडे गहाण टाकली व आज राणेच काँग्रेस सोडून गेला व कोंकणातील काँग्रेस संपली. आता मला परत काँग्रेसमध्ये बोलवत होते कशासाठी? तर ओसाड गावचा पाटील बनायला. पूर्ण देशभर कॉंग्रेसची अशीच वाताहत झाली आहे. आ.सुनील देशमुख हा काँग्रेसमध्ये युथ काँग्रेस अध्यक्ष होता, शरद पवाराविरोधातील लढाईत तो आघाडीवर होता. १९९९ साली त्याचे तिकीट कापण्यात आले, त्यावेळेला मी रात्री सोनिया गांधीकडे जाऊन त्यांना तिकीट द्यायला लावले ते आमदार झाले मंत्री झाले चांगले काम केले. पण आज भाजपच्या आमदार आहेत. अशा दु:खद गोष्टी मी पुढे जाऊन लिहिणार आहे. पण मुद्दा हा आहे कि माझ्यासारखा कुठलेही पद न मागणारा देशासाठी निस्सीम सेवा करणाऱ्या माणसाला २००७ ला आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेस सोडावी लागली. याचा विचार काँग्रेसच्या नेतृत्वानी केला कि नाही माहित नाही. पण अशामुळे काँग्रेस नष्ट झाली आणि ती कधीही उभी राहणार नाही याची मला खात्री आहे.

काँग्रेस सोडल्यानंतर मी पर्याय शोधत होतो, पण योग्य पर्याय मिळाला नाही पण अचानक अरविंद केजरीवाल यांच्या राजकारभारच  अभ्यास करण्याचा योग आला.  त्यांचे सर्वात मोठे काम भ्रष्टाचार नष्ट करणे त्यामुळे दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आता ३८००० कोटीपासून ७०००० कोटी झाला आहे. जेणेकरून मोफत आरोग्य, मोफत पाणी, सरकारी शाळा पंचतारांकित झाल्या. अशा शाळांत स्विमिंग पूल, व्यायाम शाळा निर्माण झाल्या. मुंबईत जेथे ४५०० रु. वीजबिल येते तेथे फक्त दिल्लीत १२०० रु. येते.  त्यामुळेच मला खात्री झाली कि स्वच्छ शासन आम आदमी पक्ष देऊ शकतो व १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे त्यांच्या हस्ते आम आदमी पार्टीत प्रवेश केला व ६ जूनला शिवराज्याभिषेकाच्या ३४४ व्या समारोहामध्ये मला आम आदमी पार्टीचे अध्यक्ष करण्यात आले व शिवराज्याभिषेक दिनी नव स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मला सर्वाना आव्हान करायचे आहे कि राजकारण काय वाईट  नसते. त्यात घुसलेली बिनडोक माणसे गुन्हेगार वाईट असतात. तरी स्वच्छ राजकारण करण्यासाठी मी समोर आलो आहे मला साथ द्यावी.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af/

ब्रिगेडियर सुधीर सावंत

  • Call – 998 771 4929

For Appointment – Pankaj Pawar (8806979848)

You can send him message by clicking here

शून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस

केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते.  .. Read More

छ शिवाजी म कृषी विद्यालय

छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

संयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ

या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते

मुंबई फेस्टिव्हल फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे

बाल शिवाजी हायस्कूल

कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष

मिलिटरी स्कूलअंबोली

Demo Content

Brig. Sudhir Sawant Says…

We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.

We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj

My Facebook Page

Unable to display Facebook posts.
Show error

Error: The 'manage_pages' permission must be granted before impersonating a user's page.
Type: OAuthException
Code: 190
Please refer to our Error Message Reference.
Copyright © 2020 Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF