युद्ध आणि हत्यार विक्री_३१.३.२०२

कुठलेही युद्ध लढले जाते ते सैनिकांच्या जोरावर व आधुनिक हत्यारांवर. अत्यंत मारक हत्यार असते तेव्हा सैनिकांच्याशौर्याची काही गरज पडत नाही.  पण हत्यार कमकुवत असले तर सैनिकांचे शौर्य निर्णायकठरते. जसा दुसरा महायुद्धाचा अंत हा अणुअस्त्राने झाला.हिटलरचा जरीअस्त झाला तरी जापनीज सेना लढत होती. मग अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अणुबॉम्ब टाकले त्यातअसंख्य नागरिकांची हत्या झाली.  जपानला आपली हत्यारे टाकावी लागली आणि आत्मसमर्पण करावे लागले. हत्याराची स्पर्धा आंतरराष्ट्रीयराजकारणात सर्वात मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेत अग्रक्रम अमेरिकेचा आहेआणि जगातील दहा देश, त्यात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन, इटली, स्पेनयांच्याकडे जगातील 90 टक्के हत्यारे बनतात आणि ते लढाई जिंकू दे किंवा हार होऊ दे,विजय हत्यार बनविणाऱ्या कारखान्याचा असतो.

हाचअमेरिकेचा मुख्य धंदा आहे. जर लढाया झाल्या नाही तर हे देश कंगाल होतील.म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतरअमेरिकेने वेगवेगळ्या देशांमध्ये युद्धनिर्माण करायचा प्रयत्न केला व त्यातून अब्जावधी डॉलर्स कमावले. दुसऱ्यामहायुद्धानंतर अमेरिका सुडाच्या नावाखाली अनेक ठिकाणी स्थानिक लोकांबरोबरयुद्ध लढली आहे. व्हिएतनाम, कोरिया व दक्षिण अमेरिकेमध्ये अनेक देशांमध्येयुद्ध निर्माण केले. आफ्रिकेमध्ये अनेक देशांमध्ये यादवी युद्ध निर्माणकेले. अफगाणिस्तान वर हल्ला केल्यानंतर इराकवर हल्ला केला आणि आता सीरियावरसुद्धा हल्ला केला. युक्रेन आणि रशियाच्या लढाईमध्ये प्रचंड प्रमाणात हत्यारेअमेरिका आणि नाटो देश युक्रेनला पुरवत आहे. 

हत्यार निर्माण करणारे देश जगाचे नेतृत्व करतात. तेच शांती बद्दल प्रचार करतात,लढाया लावतात आणि मग लढाया मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दाखवतात. या सर्व आंतरराष्ट्रीय झगडयामध्ये युनोचे नाव घेतात पण युनोला बाजूला ठेवून आपलंराजकारण करतात. हे सर्व देश मानवी हक्काचे पुरस्कर्ते आहेत.  पण हे देशामध्येकलह निर्माण करतात.  प्रत्येक देशामध्ये यादवी युद्ध निर्माण करणे, लोकांनाझुंजत ठेवणे आणि ह्या छोट्या मोठ्या लढाया जिवंत ठेवण्यासाठी हत्यार पुरवणेहे चालूच असतं. 

1959 पासून पाकिस्तान अमेरिकेच्या सुरक्षा संघटनमध्ये म्हणजे सीटो मध्ये सामीलझाली.  SEATO म्हणजे दक्षिण पूर्व आशिया करार संघटना. हे आशियामध्येअमेरिकेने संघटन निर्माण केले आणि दक्षिणआशिया मध्ये फक्त पाकिस्तान त्याच्या मध्येसामील झाला. तसेच युरोप मध्ये नाटो म्हणजे North Atlantic Treaty Organization  (NATO), हे अमेरिका आणि युरोपची सुरक्षा संघटना युद्धामध्येरशियाबरोबर युद्ध करण्यासाठी तयार करण्यात आली.

रशियाने देखील पूर्व युरोपला घेऊन पोलंड येथील Warsaw नावाच्या शहराचं नावदेऊन‘Warsaw Pact Countries’ म्हणजे ‘वारसा पॅक्ट कंट्री’ हा सुरक्षा करार निर्माण करून नाटोला विरोधकेला. 1991 ला सोवियत संघाची फाळणी होऊन 15 देश निर्माण झाले.  त्यात रशिया आणियुक्रेन असे दोन देश निर्माण झाले. युक्रेन आणि रशियाचे चांगले संबंध होते. पण 2014मध्ये अमेरिकेने युक्रेनचे सरकार बरखास्त करून नवीन सरकार निर्माण केले.  हे सरकार द्वेष भावनेवर निर्माण करण्यात आले. रशियन लोकांविरोधात धार्मिक कट्टरवादी ख्रिश्चन फळी निर्माण करण्यात आली व रशियन ख्रिश्चन चर्चच्या विरोधात कट्टरपंथीय लोकांना घेऊन आताच्या युक्रेनच्या राष्ट्रपतीच्या नेतृत्वात सरकार बनले.  त्यामुळे एकसंघ असलेले रशियन व युक्रेनचे लोक फुटले.  पूर्व युक्रेनमधील दोन भाग डोनेक्स आणि लोहान्सा असे रशियन भाषिक  दोन देश निर्माण करण्यात आले. अर्थात रशियाला रशियन लोकांना मदत करावी लागली व देश दुभंगण्याची प्रक्रिया सुरु झाली.

अमेरिकेने हा धंदा जगभर केला आहे.  भारतात देखील हिंदू-मुस्लीम क्रूर संघर्ष निर्माण करण्याचा अमेरिकेने नेहमीच प्रयत्न केला.  कारण दोन्ही देशामध्ये सतत युद्ध व्हावे, असा अमेरिकेचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. जेणेकरून जगातील 10 श्रीमंत देशांचा हत्याराची दोन्ही देशांना विक्री करून प्रचंड फायदा होतो.  आता देखील जसे युक्रेनच युद्ध सुरु झाल तसं अमेरिकन हत्यार निर्माती करणाऱ्या कंपन्यांची शेअर बाजारात दुप्पट किंमत झाली.  म्हणूनच आता हे श्रीमंत देश हत्याराचे उत्पादन करून जगभर हत्यारांची विक्री करत आहेत.  युद्ध जन्य परिस्थिती निर्माण करून युद्ध करण्यामध्ये अमेरिका अग्रेसर राहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाची फाळणी करून कम्युनिस्ट उत्तर कोरिया व भांडवलशाही दक्षिण कोरियाची घनघोर युद्धानंतर निर्मिती झाली.  तेथे आजपण युद्धजन्य परिस्थिती प्रचलित आहे व दोन्ही देश श्रीमंत देशांकडून प्रचंड प्रमाणात हत्यारे विकत घेत आहेत. तसेच उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम निर्माण करण्यात आले. अमेरिकेने आपली प्रचंड सेना दक्षिण व्हिएतनाम मध्ये पाठविली. प्रचंड हत्यारे निर्माण झाली. अमेरिकेला हार पत्करावी लागली व अमेरिकेला तेथून पळून जावे लागले. जसे आता देखील अफगाणीस्तानमध्ये 20 वर्ष युद्धानंतर पळून जावे लागले. हीच कहाणी इजिप्त, तुनिशिया, लिबिया, सिरीया आणि अनेक देशामध्ये आहे.  अमेरिकेला हार पत्करून नेहमीच पळून जावे लागले.  पण अमेरिकेने निर्लज्जपणे हे चालूच ठेवले आहे.  त्याचे एकमेव कारण म्हणजे युद्धामुळे अमेरिकेची मिलेटरी औद्योगिक समूह फायद्यात राहतो.  यावरून सर्वांनी ओळखावे की हे युद्ध अनेकदा फक्त हत्यार विक्रीसाठी असतात व बलाढ्य राष्ट्र त्याचा पूर्ण फायदा घेतात.

अशाच प्रकारच्या दबावाखाली भारत वावरत आहे.  चीन आणि पाकिस्तानकडून सतत धोका असल्यामुळे भारताला आपली संरक्षण व्यवस्था अत्यंत उच्च पातळीची ठेवावी लागते.  त्यामुळे भारताला 80% हत्यारे परदेशातून आयात करावी लागली आहेत.  म्हणूनच 2000 साली राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, भारतात पूर्ण क्षमता असताना आपण हत्यार आयात करतो हे दुर्देव आहे. पुढे ते म्हणाले 2020 पर्यंत 80% हत्यार भारतातच निर्माण झाले पाहिजेत व 20% हत्यार परदेशातून आयात करावे.  पण ते झाले नाही.  आतादेखील 80% हत्यारे आपण आयात करत आहोत. 

आता मोदी सरकारने एक नवीन फंडा काढला आहे. संरक्षण खात्याने 60000  कोटी रुपयाचे आयात रद्द केली आहे व खाजगीकरणातून हत्यारे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. वरकरणी हे चांगले दिसत असले तरी खाजगीकरण व जागतिकीकरण हत्याराच्या उत्पादनामध्ये वापरले जाणार आहे. जवळ जवळ 45 OrdanceFactoryआणि हिन्‍दुस्‍तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडहे भारतात विमान बनवते याचे खाजगीकरण करण्यात येणार आहे व भारतातल्या उद्योगांना कवडीमोल भावात विकण्यात येणार आहे. हे उद्योग परदेशी कंपन्यांना सुद्धा विकण्यात येणार का? हे अजून स्पष्ट झाले नाही.  10 देशातील महाकाय बहुराष्ट्रीय उद्योगांना भारतात आणण्यात येणार आहे व त्यांना भारतात हत्यारे बनविण्याची परवानगी देणार आहे.  व याच्या पाठी एक भयानक कारस्थान होत आहे.  Lockheed martin सारख्या बलाढ्य कंपनींना भारतात आणण्यात येणार आहे. अशा परदेशी कंपन्यांना भारतीय कंपन्यांबरोबरच समतेने वागविण्यात येणार आहे. याचाच अर्थ ज्या कंपन्या अमेरिकेत उत्पादन करून भारताला विकत होत्या त्याच कंपन्या भारतात येऊन इथेच उत्पादन करून भारतीय सेनेला विकणार आहेत. त्यातून प्रचंड नफा करून तो पैसा त्यांच्या मायभूमीला पाठविणार आहेत. फक्त नाव बदल होणार आहे की ह्या परदेशी कंपन्यांचे हत्यार उत्पादन हे आयात केले न जाता भारतातच उत्पादीत केल्याचे दाखविले जाणार.  असे गौडबंगाल करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून पूर्वीसारख्याच परदेशी कंपन्या मालामाल होणार आहेत.  एकंदरीत भारताची संरक्षण व्यवस्था ही परावलंबी होणार की स्वावलंबी होणार हे स्पष्ट दिसत आहे.  भारतीय जनतेचा प्रचंड पैसा परकीय महाकाय बहुराष्ट्रीय उद्योगांच्या घशात आपण घालत आहोत. त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार? हे माहित नाही.  पण आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीन मात्र स्वावलंबी झाला आहे आणि म्हणूनच चिंता एवढीच आहे की भविष्यकाळातील स्पर्धेमध्ये हत्याराच्या उत्पादनामध्ये चीन अग्रेसर होणार. म्हणूनच आमचा खाजगीकरणाला विरोध आहे.  भारताच्या सार्वजनिक उद्योगाने नेत्रदीपक यश मिळविले आहे. त्या उद्योगांना वाढवायचे सोडून त्यांना नष्ट करून आपली मान परदेशी महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देणार आहोत काय? हा खरा प्रश्न आहे. 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS