शुद्ध जान्हवेधारी हिंदू

शुद्ध जाणवेधारी हिंदू

गुजरात निवडणुकीमध्ये अनेक नवीन संकल्पना उघडकीस आल्या. प्रचाराच्या पातळीने नीच्चतम स्थर गाठले. व्यक्तिगत पातळीवर जाऊन राजकीय नेते एकमेकाला जातीय आणि धार्मिकदृष्ट्या निच्च प्रकारचा प्रचार करताना दिसले.  सर्वात महत्वाचा शोध म्हणजे राहुल गांधी जाणवेधारी हिंदू आहेत. कारण गांधी हे कुठल्या धर्माचे आहेत हा  कदाचित भारतातला सर्वात महत्वाचा विषय आहे. म्हणून मुसलमानांना, बौद्धांना, जैनांना, आदिवासी बांधवाना कळले कि ते जाणवेधारी हिन्दू आहेत. आता जाणवेधारी हिंदू कोण आहेत? तर फक्त ब्राह्मण. बाकी सर्व शुद्र आहेत. हे फार मोठे कोडे राहुल गांधींच्या लोकांनी सोडवले होते. मी कॉंग्रेसमध्ये गेलो तेंव्हा मला माहीतच नव्हते कि कॉंग्रेसमध्ये हिंदुत्वाला फार महत्व आहे. आता कळले कि कॉंग्रेसमध्ये इतर हिंदूंच्या तुलनेत जाणवेधारी हिंदू श्रेष्ठ आहेत. म्हणजे मी शुद्र ठरतो. त्याची मला खंत नाही. कारण ह्यांनी शिवाजी महाराजांना पण शुद्र ठरवले. पण खंत ह्याचीच आहे कि मी जाणवेधारी हिंदूचा नोकर म्हणून १७ वर्ष काम केले. आनंद ह्याचाच आहे कि वेळीच मी सावरलो आणि ह्या जाणवेधारी हिंदुच्या कॉंग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामा देवून पक्ष सोडला व मुक्त झालो. गेली १० वर्ष मी सापनाथ कॉंग्रेस आणि नागनाथ भाजपला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दु:ख ह्याचेच वाटते कि नाना पाटोळे सारखे माझे जवळचे मित्र ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण नाना तुम्हाला जाहीरपणे विचारतो कि तुम्ही सापनाथ कॉंग्रेसमध्ये माझ्याबरोबर काम केले आहे. तुम्ही जाणवेधारी हिंदू नाहीत. तुम्हाला एव्हाना हे कळलेच असेल कि सापनाथांचा खासदार काय का नागनाथाचा खासदार काय? एकच आहे. एका नाण्याच्या २ बाजू आहेत. हातवर करण्यापलीकडे तुम्हाला काय काम मिळाले?

मग केजरीवाल बनण्याचे काम तुम्ही का करू शकत नाही? मी मान्य करतो कि ते तुमच्या एकट्याच्या कुवती पलीकडील बाब असेल. तुम्हालाही नागनाथ सोडून सापनाथकडे जाण्यात फार आनंद नाही. पण पर्याय नाही समजून त्याच गटारात पोहण्याचे का स्विकारता? त्यापेक्षा मर्दासारखे गोर-गरीब जनतेला वाहून घ्या. शेवटी आमदारकी आणि खासदारकी म्हणजे आयुष्य नाही. तुम्ही सापनाथला लाथ मारताना योग्य भूमिका घेतली. तुम्ही जवळचे मित्र म्हणून आनंद झाला. पण जाणवेधारी हिंदूचे पाय धरताना बघून फार यातना झाल्या. त्यापेक्षा नागनाथकडेच राहिला असता तर बरे झाले असते. सापनाथकडे जावून, तुम्ही लोकांची सहानभूती पण गमावणार शेवटी लोक हे राजे आहेत, ते तुम्हाला न्याय निश्चित देतील. त्यांच्यावर भरोसा ठेवा. प्रफुल्ल पटेल हा सापनाथातील मोठा माणूस आहे. तो तुम्हाला तिकीटच घेऊ देणार नाही. जाणवेधारी हिंदू हा प्रफुल्ल पटेलचे ऐकणार का तुमचे, ह्याचा विचार करा. तुम्हाला माहीतच आहे कि आपण दोघे जाणवेधारी हिंदूचे नोकर होतो. आपलेच राज्य आहे असे आपल्याला वाटत होते. पण महाराष्ट्रात जाणवेधारी हिंदूचा मांडलिक राजा होता. तोच सर्व चालवायचा आणि मला अन तुम्हाला मंत्री बनवायला पूर्ण विरोध करायचा. मग जाणवेधारी हिंदूने आपला बळी घेवून त्याला तुकडा टाकला. पुन्हा विषाची परीक्षा का घेता? त्यापेक्षा केजरीवालकडे जा आणि त्याला साथ द्या. भारताला ते एकच उत्तर  आहे किंवा एक नवीन पर्याय उभा करा. अर्थात हे मी तुम्हाला उद्देशून जरी लिहिले असलो तरी हे सर्वांसाठी आहे. ज्यांना भारताला वाचवायचे असेल, ज्यांना पुन्हा इंग्रजांचे गुलाम व्हायचे नसले, ज्यांना शेतकरी कामगारांना ठार मारायचे नसेल त्यांनी जाणवेधारी हिंदू राहुल गांधींची नोकरी करू नये.

एकंदरीत राहुल गांधी जाणवेधारी हिंदू असल्याचे स्पष्ट झाल्याने एक चांगले झाले कि जनता कोण ह्याचा विचार सुरु झाला. मी जाणवेधारी हिंदू नाही. माझी जात हिंदू मराठा लागली आहे. म्हणजे मी जाणवेधारी हिंदू नाही. मग कोण आहे? तर जसे शिवाजी महाराजांना जाणवेधारी हिंदू करण्यापासून विरोध झाला. ते क्षत्रिय नाहीत शुद्र आहेत म्हणून त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही हे धार्मिक धोरण जाणवेधारी लोकांनी प्रस्थापित केले. मग आमची आणि जनतेची गत काय. आपण सर्व शुद्र आहोत, हे पेशवाईत तरी प्रस्थापित झाले आहे. मग आपण सर्व शुद्र मावळे एक का होत नाही. जाणवेधारी लोकांचे राज्य म्हणजेच हिंदुत्व. हिंदू राष्ट्र म्हणजे जाणवेधारी हिंदूचे राष्ट्र. मोदी जरी जाणवेधारी नसले तरी हिंदुत्वाचे शिलेदार आहेत. ते जाणवेधारी लोकांचीच नोकरी करत आहेत.

जाणवेधारी हिंदू असतील मोठे, पण त्यांची व्यवस्था भारतावर लादली गेली आहे. आपण सर्व त्या व्यवस्थेचे गुलाम आहोत कारण आपण सर्व शुद्र आहोत असे ठरविण्यात आले आहे. म्हणूनच जे हिंदू आहेत पण जाणवे घालू शकत नाहीत ते शुद्र आपण शेतकरी आहोत, कामगार आहोत, सैनिक आहोत. जाणवेधाऱ्यांची सेवा करण्यात मग्न आहोत. आपण देशासाठी लढतो आणि मरतो. आपण ह्यांना अन्न देतो. आपण कारखाने चालवतो. पण आपण जाणवेधारी नाहीत म्हणून खालच्या जातीचे आहोत. मनिशंकर म्हणूनच म्हणतो कि मोदी नीच माणूस आहे. कारण मनी शंकर ऐय्यार एक उच्च प्रतीचा जाणवेधारी हिंदू आहे. ती ह्यांची मानसिकता नकळत बाहेर येते. हिंदुत्व म्हणजे जाणवेधाऱ्यांचे श्रेष्टत्व, त्यांनी आपले राज्य व व्यवस्था कशी प्रस्थापित केली हे थोडे लक्षात आलेच असेल. जाणवेधारी हे इंग्रजांचे सच्चे सैनिक होते. कुणीच बंड केले नाही. सर्व उच्च पदे भूषवली. औरंगजेब, बाबरपासून इंग्रजांपर्यंत ह्यांनी परकीय मोगल आणि गोऱ्यांची चाकरी केली. आता स्वातंत्र्यानंतर गोऱ्या अमेरिकन लोकांची करत आहेत. म्हणूनच संरक्षण व्यवस्था, संरक्षण उत्पादन अमेरिकेच्या हातात देऊन टाकले. आता अमेरिकेची मजा आहे. भारत आणि पाकिस्तानला ते तीच हत्यारे विकत आहेत. त्यासाठी हिंदू मुस्लिम लढा पेटवत आहेत. त्यात जाणवेधारी हिंदू त्यांना साथ देत आहेत आणि देश विकत आहेत.

असे झाले तरच अंबानी अडानींची लूट दुर्लक्षित राहते. जाणवेधारी नरसिंह राव, जाणवेधारी वाजपेयी आणि आता  जाणवेधारी फडणवीस आणि जाणवेधारी राहुल गांधी श्रेष्ठ हिंदू आहेत. आम्ही शुद्र जनता त्यांचे प्रभुत्व स्विकारतो आणि त्यांची सेवा करतो. त्या बदल्यात त्यांच्या तत्वावर जगतो. कारण आम्ही पाटोळेसाहेब आपला स्वाभिमान हरवला आहे. शिवरायांच्या मावळ्यांना विसरलो आहोत. आपल्या मनगटाच्या जोरावर, राज्य उभारण्याचे विसरलो आहोत. पण आपल्यातले अनेक लोक लढत आहोत. ह्या जाणवेधारी हिंदूंच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी लढत आहोत. फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, जाणवेधारी नसणाऱ्या मावळ्यांनी एकत्र झाले पाहिजे.  ह्यांना पळता भुई थोडी झाली पाहजे. आता इटलीत क्रिकेटवीर कोहलीने लग्न अनुष्काबरोबर केले. त्यांच्याबरोबर ह्या सर्वांना इटलीला पाठवले पाहिजे.

ही बाब स्पष्ट होते कि लोक विरोधी धोरणे खाजगीकरण, राजकीकरण आणि उदारीकरण (खाउजा) धोरण नरसिंहरावने आणले. तेच धोरण वाजपेयी आणि मोदीने राबविले. त्यात लाखो कोटी रुपये यांनी लुटले.  परदेशी बँकेत ठेवले. इकडे भारतात शेतकरी, कामगार आणि सैनिक मरत आहेत. या जनतेने एकत्र येऊ नये म्हणून धर्म आणि जातीवर लोकांना झुंजवत ठेवण्यात येत आहे. या देशात प्रचंड श्रीमंती आहे. १ टक्के लोकांच्या हातात ९० टक्के देशाची संपत्ती आहे व त्याचा बराच भाग परदेशात आहे. सर्व बँकेतला पैसा या श्रीमंत लोकांनी बुडवला, म्हणून आता गरीब लोकांनी बँकेत ठेवलेला पैसा हडप करण्यासाठी सरकार नवीन कायदा आणत आहे. पुढे जाऊन गरिबांच्या पैशावर गरिबांची मालकी राहणार नाही. अशी प्रचंड शोषणकारी व्यवस्था मनमोहन सिंगने निर्माण केली व आता मोदी त्वेषाने राबवत आहेत. अशा सैतानी कारभाराला मुठ माती देण्यासाठी कष्टकऱ्यांनो एक व्हा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS