Category: My Articles

अमेरिकन दादागिरी_31.5.2018

साधारणतः सामान्य माणसाला जगात काय चालले आहे ते कळतच नाही. जागतिक घडामोडी सामान्य माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतात. उदा. अमेरिकेने तेलाचे भाव वाढवले  तर सर्वच वस्तू महाग होतात आणि गरिबांचे प्रचंड हाल होतात. डॉलरची किंमत रुपयाच्या मानाने वाढली तर देशात येणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किंमती वाढतात. टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मोटार गाड्या, मोबाईल, कोका- कोला वगैरे या सर्वांचीच किंमत वाढते. कारण या सर्वात परदेशातून आयात केलेले भाग असतात.

Read more ...

गटबंधन_24.05.2018

 कर्नाटक मध्ये कुमारस्वामीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कॉंग्रेस जनता दल सरकार स्थापन झाले. देशातून प्रत्येक राज्यातून सर्व पक्षाचे नेते बंगलोरमध्ये अवतरले. विरोधी पक्षाची एक अद्भूतपूर्व एकी स्थापन होताना दिसली. एकमेकाचे शत्रू एकमेकाच्या गळ्यात पडताना दिसले. मायावती आणि अखिलेश यादव, ममता, कॉंग्रेस आणि साम्यवादी  हे बेंगालमधील मुख्य शत्रू एकत्र येत आहे. आंध्र मध्ये चंद्राबाबू नायडू आणि कॉंग्रेस एकत्र दिसले.

Read more ...

साम दाम दंड भेद_17.05.2018

कर्नाटक हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. साधारणत: कायद्याला धरून तेथील नागरिक व राजकारणी लोक वावरत असत, पण आता सर्व बदलले आहे. साम दाम दंड भेद हे राजकारणाचे मुख्य तंत्र झाले आहे. नितीमत्ता राजकारणापासून दूर गेली आहे आणि तिची जागा विकृती आणि धोकादडीने घेतली आहे. तेथेच येदुराप्पा मुख्यमंत्री झाले. अनेक दिवस भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात राहिले.

Read more ...

छावा_10.05.2018

शेक्सपिअरचे हम्लेट आजही गाजत आहे. पण छत्रपती संभाजींच्या यातना अजून आपल्याला जाणवत नाहीत. हम्लेट पेक्षा  संभाजी महाराजांची दु:खभरी कहाणी आहे. कुठल्याही राजांनी आपल्या प्रजेसाठी व राज्यासाठी एवढे हाल सोसले नाहीत.

Read more ...

हिंदी चीनी भाई-भाई_03.05.2018

१९६२ चे चीन बरोबर युद्ध भारताच्या इतिहासातील एक भयानक स्वप्न होते.त्यावेळी लोकसभेत अनेक  खासदारांनी भाषण केले कि शेवटचा जवान आणि शेवटच्या गोळी पर्यंत लढू. झाले देखील तसेच. आमचे जवान शेवटपर्यंत लढले. आपले प्राण देशाला अर्पण केले. पण खासदार आमदारांचे काहींच नुकसान झाले नाही. फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी चाडाओड करताना दिसतात. १९६२ च्या युद्धात,भारताचा दारूण पराभव तर झालाच पण त्याहीपेक्षा सैन्याची प्रचंड हानी झाली. ४००० सैनिक कैदी झाले असंख्य मारले गेले, त्याहून अधिक जखमी झाले.

Read more ...