Fascism म्हणजे काय?

गेल्या शतकामध्ये १९३० ला जगामध्ये विशेषत: अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली. त्या मंदीमध्ये लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. जवळजवळ सगळेच कारखाने बंद पडले. कारण लोकांजवळ कारखान्यातील माल घेण्यासाठी पैसे नव्हते.  त्याच काळात प्रचंड आर्थिक, सैद्धांतिक  विषय पुढे आले. एकाबाजुला अमेरिकन भांडवलशाहीचा पैशावर आधारित राजकारण आणि अर्थकारणाचा प्रसार पाश्चिमात्य जगावर झाला.या पाठीमागे भांडवलशाही समाज उभे करण्याचा आक्रमक प्रयत्न झाला.  भांडवलशाही म्हणजे आर्थिक प्रगतीचा मोठा वाटा श्रीमंताकडे जातो. श्रीमंताचा पैसा खर्च होण्याला मर्यादा असते.  श्रीमंत पैसा वाचवतो व तो गुंतवणूक करून कारखाने उभे करतो. म्हणून श्रीमंतांना श्रीमंत बनविले जाते. भांडवलशाही जगतात आर्थिक विषमता हे तत्त्व स्वीकारले जाते. त्यामुळे श्रीमंत श्रीमंत होतात आणि गरीब गरीब राहतो. ११९१ नंतरचा भारत हा पुर्णपणे या भांडवलशाही तत्त्वावर उभा आहे. म्हणून  भारतामध्ये आर्थिक प्रगतीचा मोठा हिस्सा श्रीमंतांकडे गेला.  देशात अब्जोपती, करोडोप्रती निर्माण झाले. पण शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त झाले.  दुसरीकडे १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर अर्ध्या जगामध्ये साम्यवाद प्रस्थापित झाला.  त्यात सर्वांना समान हक्क आणि समान न्याय या तत्वावर आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाला.  साम्यवादी देशामध्ये लोकांना मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण हे हक्काने मिळायचे.  पण हा मोठा धोका अमेरिका आणि यूरोपियन राष्ट्रांना निर्माण झाला.  अमेरिका आणि पश्चिम युरोप मधील श्रीमंतांना साम्यवादाचा धोका टाळण्यासाठी प्रचंड संघर्ष सुरू झाला.

यामध्येच fascism ची निर्मिती झाली.  आजकाल मोदीची राजवट ही fascist  राजवट आहे असे बोलले जाते.  याचा निश्चित अर्थ काय हे समजने नितांत गरजेचे आहे.  fascism म्हणजे एका समूहाची हुकूमशाही. १९३० ला लोकांवर प्रचंड आर्थिक संकट आल्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला होता.  त्यातूनच भांडवलदारांची हुकूमशाही निर्माण झाली. इटलीमध्ये बेनिटो मुसलोनी आणि जर्मनीमध्ये हिटलर यांचा उदय झाला.  या दोन्ही देशात भांडवलदारांना उत्पन्न वाढीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे होती. कारखानदारांना fascist  राजवट सोयीची होती. कामगारांचे हक्क आणि अधिकार संपुष्टात आले.  fascist सरकारच्या आड भांडवलदार वाटेल ते करू शकत होते. लोकांचे लक्ष आपल्या दुर्दैवापासून दूर नेण्यासाठी fascism आक्रमक राष्ट्र प्रेमावर उभा राहतो. हिटलरने जर्मन आर्यन राष्ट्रप्रेम निर्माण केले.  त्याचबरोबर लोकांच्या दुर्दशेच कारण लोकांना दाखवावे लागते.  हिटलरने आर्यन समूहाचे श्रेष्ठत्व आपल्या तत्व प्रणालीचे मुख्य केंद्र केले.  ‘जू’ हा समुदाय आपल्या दु:खाचे मूळ कारण आहे असे विचार प्रचलित केले. जसे आज हिंदुत्वाचा अजेंडा अल्पसंख्याकांच्या द्वेषावर उभा आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ६० लाख ‘जू’ लोकांची हिटलरने कत्तल केली. पहिल्या महायुद्धातील पराभवामुळे जर्मन लोकांना प्रचंडपणे अपमानित केले गेले. परिणामत: हिटलरचा वर्णद्वेष ‘जू’ विरोधी आक्रमक भूमिका घेऊन उभा राहिला.  जर्मन लोकांना प्रभावित करून ‘जू’ समुदायाविरुद्ध  उभे केले.  तोच प्रयत्न मोदी सरकारच्या काळात भारतामध्ये झाला. बेकारी, भूक, भ्रष्टाचाराचे कारण अल्पसंख्यांक आहेत असे वातावरण निर्माण करण्यात आले. गाय बैलाचे राजकारण आणून निरपराध लोकांना फासावर लटकविण्यात आले.  याला मोदी सरकारचा अलिखित पाठिंबा होता.  भांडवलदारांना / श्रीमंताना अशा प्रकारची समाजमधील फुट सोयीची असते.  हिटलरने युद्धासाठी भांडवलदारांना मोठे केले.  तसेच आजच्या काळात मोदी सरकारने भांडवलदारांना प्रचंड ताकद दिली.

जसे आज हिंदुत्व हा नारा गल्ली गल्ली मध्ये प्रचलित करण्यात मोदी यशस्वी झाले.  त्याच्या आड सर्व देशातील समस्या झाकून टाकण्यात आल्या. हिटलरने पण नाझी पक्षाचे सैन्य निर्माण केले आणि जर्मन सैन्याविरुद्ध षड्यंत्र रचले. त्यात अनेक वीर, जर्मन सैनिक आणि अधिकारी मारले गेले. जसे आज भागवत यांनी म्हटले कि RSS चे सैन्य ३ दिवसात लढण्यासाठी तयार होईल.  आम्ही २ वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकारी झालो. भारतीय सैन्य हे कडक प्रशिक्षणामुळे उभे आहे. कोणी असे राजकीय घोषणा करून सैन्याला अपमानित करू नये. पण ही हिटलेरियन मानसिकता आहे. जे fascist पक्ष आहेत. ते स्वत:ला फार मोठे समजतात. वास्तवापासून दूर राहतात. भावनात्मक विषय निर्माण करून फुका देशाला संभ्रमित करतात. त्याचाच भाग म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदू शेतकर्‍यांना तर ह्यांनी देशोधडीला लावले. मग पोकळ हिंदुत्वाचा सामान्य माणसाला काय फायदा?  हिटलरच्या जर्मनीत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्यामुळे, शस्त्रास्त्र निर्मितीवर जोर देण्यात आला. त्यात बर्‍याच कंपन्यांना फायदा झाला. १९३० ला मंदीची लाट उलटली. हत्याराच्या उत्पादनामुळे अनेक लोकांना नोकर्‍या लागल्या. त्यामुळे आर्थिक सुबत्ता पुन्हा एकदा जर्मनीत आली. आर्थिक शक्ती वाढल्यामुळे जर्मनी युद्धासाठी तयार झाली.  त्यातूनच दुसरे महायुद्ध झाले.  हिटलरला आत्महत्या करावी लागली.  युद्ध संपले तेव्हा १६ ते ६० वर्षामधील एकही पुरुष जिवंत नव्हता.   तशाच भविष्याकडे भारताला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे सर्व लोकांना कळणार नाही कारण त्यात मिडिया हा पूर्णपणे भांडवलदारांच्या ताब्यात आहे व तो मोदी भक्त झाला आहे. fascist राजवटीत मिडिया हा हुकूमशहाच्या हातात असतो.  स्वातंत्र्यानंतर कुठलेही  सरकार मोदिसारखे भांडवलदारांचे भक्त नव्हते. मोदी अडाणीचेचे विमान घेऊन दिल्लीला शपथविधिला गेले. मोदीने या भांडवलदारांचे प्रचंड लाड केले. कर्ज बुडव्या भांडवलदारांचे कर्ज माफ केले.  पण गरीबांना काही देण्याची दानत दाखवली नाही.  मोदींचा काळ समाजात द्वेष निर्माण करण्याचा काळ होता.  त्याच्या पाठी पुर्णपणे भांडवलदारांचे हितसंबंध जोपासण्यात आले. या काळात भांडवलदार आणि सरकार यांचे अनोखे मिलन झाले.  १९३० प्रमाणे fascism चा उदय केवळ भारतात नाही तर जगात आहे. भांडवलशाहीच्या अपयशातून तो निर्माण झाला आहे. त्यात भांडवलदारांची आर्थिक मक्तेदारी ही व्यवस्थेला पुर्णपणे नाकाम करून टाकते.  मोठे उद्योग, fascist नेते यांच्या भागिदारीतून अपयशी जागतिक अर्थव्यवस्था २०१८ नंतर बिघडलेल्या आर्थिक व्यवस्थेतून मार्ग काढण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.  मोदीने मोठे उद्योग आणि हिंदुत्व जमातीमध्ये भागीदारी निर्माण केली.  १९३० ला उद्योगपती हे राष्ट्रावर आधारित होते आणि दुसर्‍या राष्ट्राबरोबर संघर्षात होते म्हणून युद्ध झाले.  आज अशा प्रकारची स्पर्धा नाही आहे, उलट जगातील सर्व भांडवलदार एकत्र झाले आहेत.  त्यांना कुठल्याही देशात गुंतूवणूक करण्याची मुभा पाहिजे.

आताचे नविन सूत्र हे लोकशाहीच्या दिखाव्यावर आहे.  कारण निवडणुका जागतिक भांडवलाला प्रतिष्ठा देते.  आज भांडवलदारांच्या स्पर्धेतून युद्ध निर्माण होत नाहीत. पण त्यात fascist तत्त्वांना लोकशाही समर्थन देते. जसे अमेरिकेत ट्रम्प आहे, फ्रांसमध्ये मेक्रोन आहे आणि भारतात मोदी आहे. या सर्वांची अलिखित युती आहे.  पैशाची सत्तेवर पूर्ण पकड आहे.  म्हणूनच जगातील सरकारे सामान्य माणसाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.  याला उत्तर आपल्याला द्यावेच लागणार. नाहीतर गरिबांचा कोणचं वाली राहणार नाही.

लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS