रोजगारासाठी एल्गार आणि खाजगीकरण

माझे वडील हे १५ वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. १९७२ साली ते हरले. आमच्या कुटुंबावर मोठे संकट आले. उत्पन्नाचे साधन काहींच नव्हते. त्यावेळी मी बँकेकडून कर्ज घेवून २ टॅक्सी घेतल्या व कॉलेज करत टॅक्सी चालवली. मी टॅक्सी विकत घेवू शकलो कारण तेव्हा बँका राष्ट्रीयकृत…