आप महाराष्ट्र प्रदेश संयोजक माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांची भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
लोकशाही प्रधान आपल्या देशात पाटीदार समाजाचे प्रभावशाली नेते हार्दीक पटेल यांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे. घरातच सुरू असलेल्या हार्दीक पटेल यांच्या आंदोलनाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून हार्दीक यांच्या जवळच्या लोकांवर देशद्रोहाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. सरकारचे असे कृत्य ही लोकशाहीची अवहेलना आहे.
विधी आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हंटले आहे की विरोधी मत असणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे आणि त्याची कधीही गळचेपी होता कामा नये अन्यथा अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.
धन्यवाद.