कुलभूषण जाधवची ससेहोलपट

कुलभूषण जाधवची ससेहोलपट

कुलभूषण जाधव एक भारतीय  सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडला आहे. अनपेक्षितपणे पाकिस्तानने  त्यांच्या कुटुबियांना त्यांना  भेटण्यास परवानगी दिली.  त्यांची पत्नी आणि मातोश्री त्यांच्या भेटीसाठी गेले.  पाकमध्ये त्यांना अपमानित केले. हे पण अपेक्षित होते. भेट देण्यापाठी पाकचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बाजूने लोकमत निर्माण करायचे होते. पण पाकमधील जनमत भारताविरुद्ध निर्माण करण्याचे ही होते. पाकच्या जनतेचा प्रचंड रोष सरकारविरुद्ध आहे. म्हणूनच जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाक सरकार व सैन्य नेहमीच भारत द्वेष वापरत आले आहे.  आतातर हा द्वेष आणखी तीव्र करण्यात येत आहे. जसे भारत सरकार पण पाक द्वेष वापरून हिंदू-मुस्लिम द्वेष पेटवत राहते. त्यापाठीमागे देशाची लूटमार करत राहते. जनता स्वामिनाथन आयोग विसरून जाते. शेतकऱ्याला योग्य भाव देण्याचे मोदींचे फोकनाड दुर्लक्षित करते. कुलभूषण जाधवचा पण उपयोग पाकिस्तान द्वेष वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाकला शिव्या देण्यात सरकार जास्त रस घेते. कुलभूषणला वाचवायचे असेल तर आता पाकला शिव्या देवून ते निश्चित होणार नाही. भारतीय जनतेला पाकविरुद्ध पेटवून हे कसे होणार? त्याऐवजी पाकला  बदल्यात काही तरी द्यावे लागणार आहे. जेणेकरून पाक कुलभूषणला भारतात परत पाठवेल. आंतरराष्ट्रीय संबंधात लेण-देणने असे प्रश्न सोडवले जातात. मला विश्वास आहे कि भारत सरकार कुलभूषणला परत आणु शकते. पण ते न करता पाक द्वेष पेटवण्यासाठी कुलभूषणचा वापर होणार का? राजकारणात सैनिकांचा  नेहमीच बळी देण्यात येतो. असे होऊ  नये ही अपेक्षा आहे. सध्या सर्वांनी फक्त कुलभूषणला परत आणण्यावर भर  दिला पाहजे.

शेवटी शिव्या देवून काहींच फायदा होत नाही. त्याचा फायदा सर्वात जास्त अमेरिकेला होतो. कारण भारत आणि पाक  सर्वात मोठे  अमेरिकन हत्याराचे खरीददार आहेत. आतातर मनमोहन सिंघ आणि मोदिनी भारताचे हत्यार उत्पादन संपवून परदेशी हत्यारे घेण्यावर भारताला परावलंबी करून टाकले आहे. अमेरिका तर नेहमीच पाकबरोबर राहिली आहे. तरी आम्ही अमेरिकेचेच पाय धरतो. सर्वात वाईट अनुभव मला कारगिल युद्धात आला. पाक सैन्य उंच डोंगरावर मोर्चे  बांधून बसले होते. प्रचंड पैसा गिळणारे गुप्तहेर खाते पूर्ण अपयशी झाले होते. वाजपेयी नवाज शरीफला मिठ्या मारत लाहोरेला भारत-पाक संबंध सुधारत होते.  आणि येथे भारतीय सैन्य गन्घोर युद्धात लडत होते. भारतीय सैन्याला ह्यांची घाण धुवून काढण्यासाठी लढावे लागले. उंच टेकड्यांवर हल्ले करावे लागले. सैन्याने मागणी केली कि अशी लढाई लढलो तर प्रचंड सैनिकांची जीवितहानी होईल. त्यापेक्षा LOC पार  करून पाकवर पाठून हल्ला करायला द्या. सात दिवसात लढाई जिंकू. पण नागनाथ भाजपने परवानगी दिली नाही. कारण अमेरिकेने आदेश दिले होते कि पाकवर हल्ला करायचा नाही. म्हणजे कॉंग्रेस सापनाथ आणि भाजप नागनाथ हे अमेरिकन आदेशावर देश चालवतात. हिच १९९१ नंतरची शोकांतिका आहे. अनेक भारतीय सैनिक मारले गेले त्याची किंमत कोण मोजणार?  १९९१ नंतरचा काळ हा अशाच गोऱ्यांच्या गुलामीत गेला आहे. म्हणूनच ह्यांना बुलेट ट्रेन पाहिजे आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या  आत्महत्या चालू आहे. कर्जबाजारी अंबानीला राफेल विमानाची दलाली करायला मोदि मदत करतात. सरकारी कंपनी HAL ला बाजूला काढून अनिल अंबानीला राफेल उत्पादक दासाल्ट/ Dassault कंपनीचे भागीदार मोदी करतात. संरक्षणमंत्री परीकरला देखील विचारत नाहीत. त्यांचा विरोध मोडून काढतात. त्यांना पुन्हा गोव्याला पाठवतात.  नागपूरला प्रचंड जमीन विमान आणि सुटे भाग बनवण्यासाठी अंबानीला देतात आणि भारतीय सुरक्षेला प्रचंड धोका निर्माण करतात. २१००० कोटी रुपये कर्जबाजारी अंबानीला मिळतात. हे सापनाथ UPA  आणि नागनाथ NDA चे धंदे आहेत.

सर्जिकल स्ट्राईक करायचे आणि मोदींना धनुष्यबाणधारी रामाच्या रुपात प्रदर्शित करायाचे. जणू काय मोदीच लडतात. इकडे पाक ने ४० स्ट्राईक करून आमचे सैनिक मारले. गेल्या अनेक वर्षात ८००० भारतीय सैनिक मारले गेले. चीन युद्धात ह्याच्या अर्धे सुद्धा सैनिक मारले गेले नाहीत. म्हणूनच मी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी लिहले होते कि मोदी  गरजणार पण बरसणार नाही. पाकविरुध कॉंग्रेस प्रमाणेच काही करणार नाही. कारण आपण अमेरिकेच्या हुकमाची तामिल  करणार. भारताचे हीत बघणार नाही आणि तसेच होतय.  एवढे सैनिक ह्या तुमच्या लुटूपुटूच्या लढाईत मारण्यापेक्षा; एकदाची निर्णायक लढाई करून पाकचे  ४ तुकडे केले पाहिजेत.  पण पाकला एकसंघ ठेवण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे. हा मोदींच्या वल्गनांचा सर्वात मोठा पराभव आहे. मोदींना सांगा कि फेकुपणा करण्यापेक्षा पाकला संपवून दाखवा तरच आपण सुरक्षित होऊ.

कुलभूषण जाधव हे सांगली जिल्ह्यात जन्माला आले. वडील पोलीस अधिकारी होते. ते NDA मध्ये प्रशिक्षित झाले अन १९९१ ला नौदलात अधिकारी झाले. पाकच्या म्हणण्याप्रमाणे २००३ मध्ये गुप्तहेर खात्यात RAW मध्ये काम  करू लागले. त्याने इराणमध्ये छाबर येथे छोटा धंदा सुरु केला. पाकचा आरोप आहे कि तेथून त्याने पाकमध्ये घुसखोरी सुरु केली. पाक सरकार म्हणते कि,  ३ मार्च २०१६ ला बलुचिस्तान येथील चमन जवळ त्यांना अटक करण्यात आले. पाक म्हणते कि जाधव अजून नौदलात आहे. तो RAW ह्या भारतीय गुप्तहेर खात्याचा गुप्तहेर आहे. त्याने नवीन नाव हुसेन मुबारक पटेल धारण केले व  इराणमध्ये आला. बलूचिस्थान मधील पाकविरुद्ध दहशतवाद्यांना मदत करत होता. पाकच्या चौकशीत, जाधव ह्यांच्याकडून अनेक लोकांना पकडण्यात आले.   त्यांचा दावा आहे कि जाधवने इस्लाम स्विकारला आणि पाकविरुद्ध प्रचंड हल्ले केले. जाधव यांचा कबुलीजबाब घेण्यात आला आणि त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले कि ते RAW साठी काम करत होते आणि पाकमध्ये दहशतवाद करत होते.  त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तरी आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांना फाशी देण्यात आली नाही. पण कुटुंबियांना भेटण्याची परवानगी हे फाशी देण्याचे संकेत आहेत. म्हणून पाकने तमाशा केला. त्यातून जगाला दाखवले कि पाक जनतेचा कुलभूषणना किती विरोध आहे. भारत सरकारने राजकारण न करता तातडीने पाकला जे पाहिजे ते द्यावे व जाधवना सोडून आणावे. हीच आमची मागणी आहे. कुलभूषणना फाशी दिल्यावर शिव्या शाप देण्यात काहीच अर्थ नाही. आम्हाला आमचा सैनिक जिवंत परत पाहिजे.

एकंदरीत मनमोहन सिंघ आणि मोदिसाहेबांनी कळत नकळत भारताची सुरक्षा नाव विस्कळीत केली आहे. अमेरिकन दबाव हा आपल्या राष्ट्रीय हिताविरुद्ध काम करण्यास भाग पाडतो.  संरक्षण उत्पादनात खाजगीकरण करून १००% परदेशी उद्योगांना परवानगी देण्यात आली. खाजगी कारखाने भारताचे हित बघणार का स्वत:चा फायदा बघणार. इंदिरा गांधीने १९७१ चे युद्ध जिंकले. त्यानंतर अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, हत्यार उत्पादनाचे भारतीयकरण केले. मनमोहन सिंघ आणि मोदीने स्वावलंबन उद्ध्वस्त केले. RSS च्या दिक्षित यांनी ह्या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केला. मग आता संघ परिवार का गप्प आहे. भारताला अमेरिकेचे गुलाम करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग आहे. असेच मी म्हणतो. मग भारतीय संस्कृतीची वल्गना का मारता?

हे सर्व फार बिघडले आहे. आता हे सर्व निट करण्यासाठी माजी सैन्यातील अधिकाऱ्यांनाच संरक्षण मंत्री केले पाहिजे. जसे अमेरिकेचे अर्धे मंत्री सैन्यातील  माजी अधिकारी आहेत. म्हणून अमेरिका जगावर राज्य करत आहेत. तर मोदीने सर्व माजी सैनिक खासदारांना दाबून टाकले. खासदार जनरल खंडुरी सारखा निष्कलंक मुख्यमंत्र्याला मंत्रीच बनवले नाही. भारताच्या सेना दल प्रमुख जनरल व्ही. के. सिंघला एका  छोट्या खात्याचा राज्य मंत्री करून टाकले. मग कसा काय भारताला लढाऊ करता. मनमोहन सिंघ कीं मोदींना धंदा समजतो. धंदेवाले कधी लढू शकत नाहीत. म्हणून एक नवीन पर्याय भारताच्या जनतेने बनवला पाहजे. पंतप्रधान एक राजकीय पण माजी अधिकारी पाहिजे आणि संरक्षण मंत्री एक माजी सैनिक पाहिजे. असा नवीन पर्याय निर्माण करावाच लागेल नाहीतर भारताचे भविष्य आणखी १५० वर्ष गुलामगिरीचे असेल असे  मला स्पष्ट दिसते. मग शेतकरी कामगार देशोधडीला लागतील नाहीतर काय होईल? म्हणून माझ्या देशबांधवानो जागे व्हा आणि नवीन पर्याय निर्माण करा.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS