केंद्र सरकारकडून सैनिकांची चेष्टा

औरंगाबाद :

देशात सैनिक प्राणाची बाजू लावून लढतात. परंतु सैनिकांना 15 वर्षाच्या  सेवेनंतर वयाच्या  35 व्या वर्षीच निवृत्त केले जाते. निवृत्तींनंतर नोकरीसाठी भटकंतीची वेळ सैनिकांवर येत असून, सरकार त्यांची चेष्टा करित असल्याचे “आप” चे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत म्हणाले.

सैनिकांना निवृत्त करू नये, ही 25 वर्षापासून मागणी केली जात आहे. त्यांना सरकारी नोकरीमध्ये  समाविष्ट केले पाहिजे, पोलिस दलात सैनिक आले तर पोलिस दल अधिक सक्षम होईल. डॉक्टर, अभियांत्रिकी. वाहणचालक अशा अनेक पदांवर सरकारी नोकरीत त्यांना सामावून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

Please follow and like us:

Author: admin