कोपर्डी, इव्हांका, पद्मावती

कोपर्डी- इव्हांका –पद्मावती

कोपर्डीतील अमानुष बलात्कार आणि हत्या हि मानवी विकृतीची परमोच्च जागतिक घटना आहे.  हि घटना इतकी क्रूर होती कि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कधी नव्हे तो समाज रस्त्यावर आला. असे अभूतपूर्व नेतृत्वहीन आंदोलन पहिल्यांदाच लोकांनी पाहिले. त्यात राजकारणी कोल्ह्यांनी घुसायचा प्रयत्न केला. काही संघटनानी पक्षांची सुपारी घेऊन प्रचंड गोंधळ घातला, पण लोकांनी त्यांना जुमानले नाही. त्याकडे दुर्लक्ष करून समाज संताप प्रकट करण्यासाठी आपोआप निर्धारित स्थळी गोळा झाला. अत्यंत शांतपणे मोर्चे निघाले. कुठलेही अनुचित प्रकार घडले नाहीत. शिस्तबद्ध पद्धतीने समाजाने आपला आक्रोश प्रकट केला. हेच मोर्चाचे यश आहे. साहजिकपणे न्यायासाठी समाज सरकारकडे बघत होता. पोलीस प्रशासनाला जागरूक राहून पुर्ण चौकशी करावी लागली आणि नराधमांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. त्यामुळे समाजिक सूडभावनेला शांत करण्याचे काम झाले.

हा कुठल्या जातीचा विषय नव्हता.  ही घटना अशी होती कि महाराष्ट्रातील सर्व जनता रस्त्यावर आली. कोपर्डीनंतर बलात्कार काही थांबले नाहीत. वेगवेगळ्या जातींच्या मुलींवर बलात्कार होत राहिले आहेत. प्राचीन काळापासून स्त्री हि युद्धातील लूट समजली जात होती. बलात्कार हे सुडाचे शस्त्र मानले जायचे.  स्त्री हि उपभोगाची वस्तू आहे. म्हणूनच रावण सीतेला पळवून नेतो, पण राम लोकप्रवादाला घाबरून गरोदर सीतेला जंगलात सोडून देतो. ह्यात लोकप्रवाद आणि स्त्रीचे शील ह्याचे मानवाच्या मनातले सुप्त महत्त्व उठून दिसते. पांडव द्रौपदीला जुगारावर लाऊ शकतात हि मानसिकता भारतीय समाजात खोलवर रुजली आहे. मुळात पांडवानी जुगार का खेळावा? आणि द्रौपदीला जुगारावर का लावावे? हिच मानसिकता तथाकथित हिंदुत्ववादी कट्टरपंथीय लोकांची आहे.  तत्कालीन काळात जुगार खेळणे आणि दारू पिणे हिच आर्यांची संस्कृती होती. हतबल पांडव, नपुसकांसारखे आपल्या पत्नीचा तळतळाट पाहत राहतात.

असे अनेक पांडव आज नपुसकांसारखे आपल्या आया बहिणींची द्रौपदी होत असताना बघत बसतात. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या समाज्याने आपल्या परिसरात स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला विरोध केला तर हे बलात्कार कसे होतील? आजचे राज्यकर्ते  हे शिवरायांचे मावळे नव्हे तर भ्याड, नपुसंक आहेत.  शिवरायांनी आपल्या राज्यकारभाराची सुरुवातच रांज्याच्या पाटलाचे हात पाय कलम करून सुरु केली. प्रत्येक स्त्रीला व तिच्या पालकांना विश्वास वाटला. माझा राजा माझा रक्षक आहे. तो माझ्यासाठी धावत येईल. आज फडणवीसांबद्दल ते म्हणता येते का? का मोदीबद्दल म्हणता येते?

उलट मोदी इव्हांका ट्रम्प बरोबर तासानतास फिरताना दिसतात. इव्हांका अमेरिकन राष्ट्रपतींची कन्या. माझ्या देशाचा प्रधानमंत्री तिच्यापाठी फिरताना बघून माझ्यातला सैनिक जिवंत होतो.  आंतरराष्ट्रीय संबंधात राजांनी राजाशी बोलावे असे संकेत आहेत. इतरांना ५-१० मिनटे भेटायला हरकत नसते. एका प्रधानमंत्र्यानी  दुसऱ्या देशाच्या राजकन्येबरोबर इतका वेळ गाईडसारखे अधिकृतपणे फिरणे हा अक्षम्य अपराध आहे. ह्यापूर्वी देखील नवाज शरीफला मिठी मारायला सर्व संकेत धाब्यावर बसवून मोदी गेले होते. तो तर प्रचंड अपराध आहे.  प्रधानमंत्री म्हणजे भारताची शान, ह्या पदात भारताचे सार्वभौमत्व सामावलेले आहे. तिला घेवून फिरणे म्हणजे अमेरिकेसमोर झुकणे हेच मी म्हणू शकतो.

तो कार्यक्रम जागतिक उद्योजकांचा होता. नोकरीहीन उद्योग भारतात उभारण्यासाठी मोदींच्या आमंत्रणावरून इव्हांका ट्रम्प आली आहे.  अमेरिकेतील नवीन ईस्ट इंडिया कंपनी भारताचा पुर्ण कब्जा करू शकेल.  ह्यातून नोकऱ्याच निर्माण होत नसल्यामुळे कष्टकऱ्यांना ह्याचा काहीच उपयोग नाही.  त्यातील सर्वात राष्ट्र विघातक कृत्य म्हणजे पुर्ण संरक्षण उत्पादन व्यवस्था अमेरिकेला बहाल करून टाकणे.  हे संरक्षण मंत्र्यानी अस्पष्टपणे जाहीर करून टाकले.  ह्या कार्यक्रमावर ५० कोटींचा चुराडा करून हातात काही नाही. तर परत मोदींचे पुराण ऐकायची पाळी भारतीयांवर आली. ह्यात गोऱ्या लोकांशिवाय आपण उद्योग करू शकत नाही असे वातावरण मोदीसाहेबांनी भारतात निर्माण केले आहे.  ह्यात गोऱ्या वर्णाचे प्रभुत्व प्रस्थापित केले.  गोरी बाई बघितली कि आपला माणूस पळाला अशी परंपराच आहे.  अमेरिकेने भारतीय नेत्यांना आपले करण्यासाठी स्त्रीचा वापर मुबलकपणे केला आहे.  सैन्यात परदेशी स्त्रियांना भेटण्याची बंदी आहे.

पण ते काही असो कोपर्डीतील पाशवी बलात्कार हा अमेरिकन आधुनिक संस्कृतीचा परिणाम आहे. १९५६ साली शीत युद्धात अमेरिकेने एक सांस्कृतिक धोरण निर्माण केले. बंदुकीच्या जोरावर जगावर राज्य करता येत नाही म्हणून संस्कृतीच्या जोरावर लोकांना मानसिकरीत्या गुलाम करायचे असे ठरले.  पण ४०० वर्षाच्या अमेरिकेकडे संस्कृतीच नाही. अमेरिकेने सेक्स व शराबची संस्कृती निर्माण केली. हॉलीवूड, संस्कृतीतून

अश्लिलता, सेक्स सिनेमा निर्माण केले. दारू पिण्याला सभ्य आणि उच्च दर्जा दिला. मुलींच्या अंगावरचे कपडे कमी होत जातात. फाटक्या अर्ध्या चड्डीची किंमत वाढत जाते.  भारतीय संस्कृती बदलून गेली. त्यात उपभोगवाद पेटला. प्रचंड पैसा लोक सेक्स-शराबवर खर्च करतात. इंटरनेटमुळे १२ वर्षाची मुले सामुहिक बलात्काराची चित्र बघतात.  त्यात मुलींना ते आवडल्याचे दाखवले जाते. त्यातूनच दारू पिऊन सामुहिक बलात्कार करण्याचे प्रकार वाढत जात आहेत. ह्या संस्कृतीपाठी मोठा धंदा आहे. सिनेमा विक्री, सौंदर्य प्रसाधने, दारू धंदा, सिगरेट, ड्रग्सचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  ड्रग्सचा जागतिक व्यापार ६ लाख कोटी रुपये आहे. ज्यात पूर्ण भारतीयांना अन्न पुरू शकते. नशेवर लोक प्रचंड पैसा खर्च करत आहेत. त्यातून दहशतवाद्यांना पैसा मिळतो.

ह्या सेक्स आणि शराबच्या संस्कृतीने जगाची आर्थिक घडी बिघडून टाकली. अन्न-वस्त्र-निवारा, नोकरी- धंद्यासाठी, कोट्यावधी जीव अनंत यातना भोगत  आहेत. भ्रष्ट मने भ्रष्ट देश बनवतात. म्हणूनच इव्हांका ट्रम्पला प्रचंड महत्त्व दिले आहे. अमेरिका आज बलात्काराचे प्रमुख केंद्र आहे. मग कुठल्या तोंडाने इव्हांका अमेरिकन स्त्रीचा आदर्श आमच्यासमोर ठेवते. भ्रष्ट अमेरिकन समाज हा भारताचा आदर्श होऊ शकत नाही. मोदीसाहेब तुम्हीच अमेरिकन विषकन्येत खुश रहा. हिच संघाची संस्कृती आहे का? म्हणूनच राजीव दिक्षितची हत्या झाली का?

इथेच पद्मावती सिनेमाचा प्रश्न उभा राहतो. पद्मावतीला बघण्याची परवानगी एका राजपूत राजाने अल्लाऊदिन खिलजीला दिली ही पूर्ण दंतकथा आहे. तसेच खिलजीने पद्मावतीला भेटण्याचा हट्ट धरला हे पण धादांत खोटे आहे आणि पद्मावतीचा नवरा खिलजीला सोडायला निशस्त्र किल्ल्याबाहेर गेला ह्याच्यावर माझा विश्वास नाही. पण सती जाण्याच्या परंपरेवरून युद्धात मारल्या गेलेल्या राजपूत सैनिकांच्या महिला जोहर करतात. त्या गोष्टीची चेष्टा करण्याचा अधिकार कोणालाही नाही.  अशा घटना राष्ट्रीय संस्कृतीचे  परंपरेचे उच्चा शिखर आहेत.  विभत्स सिनेमाच समाजाला भ्रष्ट करण्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. सेक्स आणि शराबचा प्रसार करणारे हे सूत्र आहे. ते बंद झाले पाहिजे. राष्ट्राच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण सापनाथ कॉंग्रेसने देशात जागतिकीकरण आणले. तेव्हापासून पुर्ण भारतात मॅकडोनाल्ड, कोकोकोला आणि पेप्सीची  संस्कृती आली.  सेक्स-शराब-भ्रष्टाचार प्रचंड वाढला.  म्हणूनच कोपर्डी झाली.  नागनाथ भाजप  ही संस्कृती आणखी खोलवर रुजवत आहेत. तिला उत्तर पद्मावतीच्या जोहारानीच दिले पाहिजे. ही पाश्चात्य  संस्कृती जाळून भस्म केली पाहिजे. परदेशी मालावर बहिष्कार टाकून देश बांधवानो आणि भगिनीनो नव्या क्रांतीला सुरुवात करा. घरातील कोलगेट, कोकोकोला, पावडर, खते, बियाणे, किटकनाशके उद्या बाहेर काढा आणि जाळून टाका.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS