भारताचासंरक्षण व्यवस्थेचे आघाडीचे हत्यार म्हणजे गुप्तहेर संघटना. शत्रुबद्दल आणि दहशतवादाबद्दल पूर्ण माहिती गोळा करून सुरक्षा दलाना आणिसरकारला वेळीच आपले निष्कर्ष देणे. जेणेकरून सरकार योग्य उपाययोजना करेलआणि शत्रूवर मात करेल. बऱ्याच वेळा पार्लमेंट सकट अनेक ठिकाणी दहशदवादी हल्ले झाले. जसे पुलवामा येथे ४० जवानांची कत्तल करण्यात आली. याला कारण म्हणजे इंटेलिजन्स फेलियर. गुप्त हेर खाती सक्षम नसतील तर देशाची प्रचंड हानी होते. गनिमी काव्याचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे हेरांची कार्यक्षमता असते. शिवराय आणि पुढे संभाजी महाराज,राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी हेरांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनेउपयोग केला. शत्रु नेमका कुठे आहे, याची माहिती मराठ्यांना मिळायची आणि२७ वर्ष औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध लढून त्यालामहाराष्ट्रातच गाढला. त्यातभटक्या समाजाचे लोक जास्त होते. बहिर्जी नाईक सुद्धा हा भटक्या समाजाचा होता. त्यांच्या जीवन काळामध्ये या हेरांना कोणी बघितले नसायचे. म्हणूनच त्यांचा इतिहास उपलब्ध नाही. त्यामुळे अत्यंतकार्यक्षम पद्धतीने हेरांचा उपयोग करून मराठ्यांचे साम्राज्य उभे राहिलेआहे. पण तेच आजच्या गुप्तहेर संघटना बद्दल म्हणता येत नाही. सरकाने वेगवेगळ्या अशा अनेक संघटना उभ्या करून देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्येप्रचंड गोंधळ माजवला आहे.
CBI स्थापनेचा मूळ हेतू, राष्ट्रीय गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद, ड्रग्ज सारखे काळे धंदे इत्यादी प्रकरणात तपास करणे. CBI हतबल होताना दिसते.CBIला कुठल्याही प्रकरणात चौकशी करण्यासाठी राज्यशासनाची परवानगी लागेते. यामधून घटनात्मक अडचण निर्माण होते. केंद्र पातळीवर वेगवेगळ्या गुन्ह्यांचातपास CBIला करता येतो. पण अनेकवेळा राज्यात चौकशीसाठी राज्य सरकार परवानगी देत नाही. २००६ च्या मुंबई हल्ल्यानंतर NIAयानविन तपास संस्थेची निर्मिती केली. या संस्थेचे काम CBIच्या दहशतवादीपथकासारखेच असते. अशा अनेक गुप्तहेर संस्थाची निर्मितीकेली जाते आणि त्यासाठी गुप्तधन वापरले जाते. त्याची नोंद अर्थ संकल्पातहोत नाही. ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर एक नविन दल उभे करायचेव गोंधळ निर्माण करायचा ही सरकारची निती आहे. त्यामुळे विविध गुप्तहेर संघटना एकमेका विरोधात श्रेयवादाची लढाई लढतात व भारताची वाट लावतात.
जेम्स बाँडची निर्मीती दुसऱ्या महायुध्दाच्या पाश्र्वभुमीवरकरण्यात आली. तेव्हापासून अनेक कादंबऱ्यांचे चित्रण हॉलीवूड आणिबॉलीवूडमध्ये झाले. किंबहूना गुप्तहेर खाते जनतेच्या कुतूहलाचा विषय बनले.भारताच्या इतिहासात चाणक्याने व शिवरायांनी गुप्तहेरांचा अत्यंतकार्यक्षमतेने उपयोग केला. शिवराज्याचे उद्दीष्ट मुळातच आक्रमक, गतिमानयुध्दाचे होते. वेगवेगळ्या जागी अचानक पोहोचायला आणि हल्ला करायलागुप्तहेरांचा वापर निर्णायक होता. शिवरायांचे यश हे त्यांच्या निष्ठावंतगुप्तहेरांमुळे होते. लोक शिवराज्यासाठी प्राण द्यायला तयार होते. अलिकडेनिष्ठावंत लोक मिळत नाहीत. दुहेरी हेरगिरी करणारे मिळतात. म्हणजे तेपाकिस्तान आणि भारतासाठीही एकाच वेळी काम करतात. माहिती मिळवण्याला‘इंटेलिजन्स’ समजले जाते. पण, इंटेलिजन्स म्हणजे माहीती नव्हे. खबऱ्यांनापाठवून माहीती मिळवून त्यावर कारवार्इ केली तर इशरत जहाँसारखा खोटाएन्काऊटर होतो. खबरे बेर्इमान असतात असा मला नेहेमीच अनुभव आला आहे. कारण मी अनेक वर्ष गुप्तहेर संघटनेत काम केले आहे. माणसाने पुरवलेली माहीती धोकादायक आणि अपुरी असते. तंत्रज्ञानाद्वारेमिळवलेली माहीती ही अचुक असते. अनेक वर्षांच्या मेहनतीच्या फळामधूनइंटेलिजन्स विश्लेषक एक चित्र बनवतो. त्यात नविन माहीती मिळाल्यावरविश्लेषण केले जाते व मिळालेल्यामाहीतीची प्रक्रिया होते आणि निष्कर्षनिघतो. त्याला ‘इंटेलिजन्स’ म्हणतात. विमानाने घेतलेल्या फोटोमध्ये तंबूदिसले म्हणजे तेथे सुरक्षा दल असणे निश्चित असते. रणगाडयाचे ट्रक दिसले तररणगाडयाच्या दलाचा तो तळ हा निष्कर्ष निघतो. बॉम्बस्फोट झाल्यावर कुणातरी मुस्लिमयुवकांना बडवून कबुली घेणे व काल्पनिक असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन यासंघटनेला पाच मिनीटाच्या आत दोष देऊन मोकळे होणे हा धंदा नित्यनेमाने चाललाआहे. जनता बिचारी त्यावर विश्वास ठेवते. खरे दहशतवादी कधीच पकडले जातनाहीत. पण मिडीया आणि जनता कुणातरी मुसलमानाला दोष देऊन आपली सुडाची तहानभागवून घेते. कसाब हा मामुली दहशतवादी होता. त्याला फाशी देऊन सरकारने २००८च्या हल्ल्यावर पडदा टाकला. पण या हल्ल्यातील माफिया, अमेरिकेची भुमिकाआणि हेमंत करकरेंच्या हत्येचे षडयंत्र पडद्याआडच राहीले. २००८ च्यादहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार हेडलीला संरक्षण अमेरिका का देत आहे? यातकोणालाच रस नाही. तो अमेरिकन गुप्तहेर खात्याचा हस्तक होता. मग तोलष्कर-ए-तोयबा मध्येअमेरिकेच्या आदेशावरून सामील झाला.अमेरिकेचेगुप्तहेर संघटना CIA यांनीच पाकिस्तानची ISIला१९८०च्या दशकात उभेकेले आणि अफगाणिस्तानमध्ये रशिया विरुद्ध लढण्यासाठी जगातले दहशतवादी गोळाकेले. त्यात ओसामा बिन लादेन सुद्धा होता. हे सर्वश्रुत आहे. पाकिस्तानने ज्या दहशतवादी टोळ्यांचा वापर भारताविरुद्ध केला. पाकिस्तानचे ISI भारताविरोधात दहशतवादी हल्ले करते. आपण मात्रअमेरिका करेल ते मान्य करतो आणि राष्ट्रहीत बाजूलाच राहते.
शितयुध्दामध्ये अमेरिकन CIA आणि रशियन KGB ने प्रत्येक देशात घुसूनमाफियाची निर्मीती केली. त्या त्या देशाची गुप्तहेर खाती आपल्या अंकीतकेली. अमेरिकन CIAने १९६५ पासून आजपर्यंत पाकिस्तानी ISIला मोठे केले.त्याउलट भारताला १९९१ नंतर कुणाचाच आधार मिळाला नाही. त्याआधी रशियनKGB बरोबर आपले चांगले संबंध होते. माफियासाठी विदेशामध्ये काम करण्यासाठीखोटे पासपोर्ट बनविणे,खोटया नोटा, भागिदार संघटना इ. चे जाळे सर्व देशांमध्येगुप्तहेर संघटनांनी निर्माण केले. त्यांना पैसे मिळवण्यासाठी स्मगलिंगचाव्यवसाय दिला. वेश्या, ड्रग्ज, शस्त्रास्त्रे हे माफियाचे पैसे मिळवण्याचेमोठे स्त्रोत होत. पुढे पुढे माफिया इतकी शक्तीमान झाली की, त्यांना सरकारीपाठिंब्याची गरज उरली नाही, ते स्वयंभू झाले. याच भूमिकेतून दाऊद इब्राहिमआज मुक्तपणे पाकिस्तानमध्ये वावरत आहे आणि भारता विरोधातील सर्व दहशतवादीसंघटनाचा वापर होत आहे. त्यांच्याकरवी ड्रग्स भारतात आणली जातात व त्यातूनचदहशतवादाला प्रचंड पैसा मिळतो व हत्यार आणि साहित्य-सामुग्रीदहशतवाद्यांना मिळते. जेणेकरून भारतात कुठेही, ते हल्ले करू शकतात.
इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही भारताची सर्वात प्रमुख गुप्तहेरसंघटना आहे. तिच्या प्रमुखाला छोटा राजन टोळीच्या मल्होत्रा नामक गुंडाबरोबरएकाच गाडीत दिल्ली पोलिसांनी पकडले होते. ते प्रकरण दाबण्यात आले. त्यावरूनमाफिया आणि IBचा संबंध स्पष्ट होतो. २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यातRAW या परदेशात काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने चार दिवस आधी मुंबर्इवरहल्ला करण्यासाठी कराचीहून बोट निघाल्याची माहीती IBला दिली होती. पणIB ने ती माहीती मुंबर्इ पोलिसांना व नौदलाला कळवली नाही. कारण हेमंतकरकरे, अशोक कामटे यांचा एन्काऊन्टर करायचा होता. करकरेंनी मनुवादीदहशतवादाचा चेहेरा जगासमोर नागडा केला होता. कर्नल प्रसाद पुरोहीतनेव्हिडीओमध्ये स्वत:च सर्व रेकॉर्ड केले आहे. त्यांना देशाची घटना कशी मान्यनाही, हिंदू राष्ट्र कसे बनवायचे आहे, ईस्त्राइलने त्यांना काय मदत केली.हे सर्व त्या व्हिडीओत स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत गुप्तहेरखात्याने खबऱ्यांकडून माहीती गोळा करण्यासाठी अगणित पैसा घालवला. IB लासरकार चालवते की सरकारला IB चालवते हेच कळेनासे झाले आहे. गुप्तहेरखात्यात व सैन्यात काम केलेला राजकारणातील मी एकमेव व्यक्ती आहे.काँग्रेसमध्ये मी अतिउच्च पातळीवर काम केले, पण जाणीवपुर्वक दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा ह्या विषयांपासून मला दूर ठेवले गेले. कारणराज्यकर्त्यांना खरे नको आहे. खोटया लढाया लोकांसमोर आणायच्या आणि आपलाधंदा चालवायचा असे राजकारण राजकीय पक्ष करत आहेत.
गॄहखात्याखालीNIA निर्माण झाली. प्रधानमंत्री कार्यालयाच्या हातात CBI आहे.अर्थमंत्रालयाच्या हातात आयकर विभाग, कस्टम विभाग, नार्कोटिक्स कंट्रोलब्युरो, एन्फोर्समेंट डायरेक्टर, डिआरआय अशा अगणित गुप्तहेर संघटना आहेतआणि त्या एक दुसऱ्याला मारत आहेत. संरक्षणामध्ये डिफेन्स इंटेलिजन्स एजंसीनिर्माण झाली. पण सर्व गुप्तहेर संघटना एकमेकांच्या स्पर्धकांसारखे कामकरतात. म्हणून भारताच्या इंटेलिजन्स व्यवस्थेचेपुनर्गठन करणे काळाची गरज आहे. सर्व गुप्तहेर संघटना भारताच्या घटनेबाहेरकाम करतात. त्यांना संसदेला उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे. त्यासाठीसर्वोच्च पातळीवर संसदेची स्टँडींग कमिटी बनवली पाहिजे. जी त्यांच्याकामाचा आढावा घेर्इल. पण कुठलेही सरकार तसे करणार नाही अशी माझी खात्रीझाली आहे. तरी जनतेने निवडणुकीत अशा विषयाची नोंद घ्यावी ही अपेक्षा.CBIला बरखास्त करून NIA मध्ये विलीन करावे ही मागणी मी अनेकदा केलीआहे. ह्या संस्था जनतेच्या पैशावर उभ्या केल्या आहेत म्हणून जनतेप्रति त्याउत्तरदायी असायला हव्यात. ह्या संदर्भात गुप्तहेर संघटनाना एकत्रितकरण्यासाठी संसदेने भाग पाडले पाहिजे. फाजील गुप्तता सोडून ह्या संघटनातपारदर्शकता आणण्यासाठी संसदीय समितीची आवश्यकता आहे. देशाच्या संरक्षणासाठी तातडीने सर्व गुप्तहेर संघटनाना एकसंघ करून एकत्रितपणे चालवले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९