नविन राजकीय व्यवस्था

सामान्य माणूस स्वतःला सामान्य करतो. तो विसरतो कि सरकार उलटून काढू शकतो.  नविन पर्याय निर्माण करू शकतो.  सरकारच्या धोरणांना संघटीत विरोध करू शकतो. जगातील सर्वात मोठी शक्ती ही जनशक्ती आहे.  या जनशक्तीने राजेराजावाडे मोठमोठे हुकुमशहा यांना जमीनदोस्त केले.  साम्राज्य नष्ट केले.  अलीकडच्या काळामध्ये भ्रष्टाचार विरोधातील अण्णा हजारेंचा आंदोलनामुळे सत्ताधीशांना नमावे लागले.  त्यातूनच आम आदमी पक्षाची निर्मिती झाली आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून कॉंग्रेस आणि भाजपला भुईसपाट केले.  म्हणून माझ्या देशबांधवानो तुम्ही स्वतःला कमी समजू नका.  तुमच्याच हातात जबरदस्त शक्ती आहे. ती भारताला योग्य मार्गाने येण्यासाठी वापरा.  याची पुर्ण जाणीव असल्यामुळे सत्ताधीश ही जनशक्ती निर्माण होण्यापासून प्रतिबंध करतात.  किंबहुना सर्व सरकारे पक्ष दाबून टाकण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात.   पहिल्यांदा कुठलीही घटना घडल्यानंतर तिचा वापर करतात व दुसरीकडे स्वतःच कुठ्यालातरी घटनेची निर्मिती करून लोकांच चित्त विचलित करतात.  जसे जन पक्ष वाढला कि बॉम्बब्लास्ट किंवा दहशतवादी हल्ले घडवून आणणे.  हा अलीकडच्या काळातला सोपा मार्ग आहे.

जसे नीरव मोदीने देशाला लुटले.  त्याच्यावर पडदा घालण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरात पोलीस घुसवले.  त्यातच श्रीदेवीचे दु:खद निधन झाले. तर पुर्ण मिडियाने  ४ – ५ दिवस त्यावरच लक्ष केंद्रित केले.  ३०० कोटीचा वेस्टलँड विमान खरेदी घोटाळा मनमोहन सिंगच्या काळात लोकसभेत चर्चेला आला.   त्याच्या आदल्या दिवशी हेद्राबादला बॉम्बब्लास्ट करण्यात आला.  तेव्हापासून त्याची चर्चा आजपर्यंत कुणी केली नाही.   बोफोर्सचा बाप राफेल विमान खरेदी सगळे नियम धाब्यावर बसवून करण्यात आले.  पण त्याची कुणी चर्चा करत नाहीत.  इंग्रजांनी भारत स्वतंत्र होत असताना हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या १९४५ ला दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्ध सुरु झाले, त्यात पुर्ण जग भरडून निघाले.  अमेरिकेचा भांडवलशाही गट आणि सोवियेत संघ (रशिया) यांच्या तुंब युदध सुरु झाले.  ते आजपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सुरु आहे.  दोघे अनुवस्त्रधारी असल्यामुळे एकमेकाशी थेट युदध टाळण्याचा शहाणपणा केला.  त्यात इज्राईल-अरब, भारत-पाकिस्तान संघर्ष चालूच आहे.  भारत हा रशिया बरोबर तर पाकिस्तान हा अमेरिकेबरोबर राहिला.  आज देखील पाकिस्तान अमेरीकेचे आघाडीचे राष्ट्र आहे.

हे युदध गुप्तहेर खात्याद्वारे घडविले जाते. १९४५ ला भारत स्वतंत्र झाल्यावर कम्युनिस्ट होऊन रशिया बरोबर जाऊ नये म्हणून इंग्रजांनी भारताचे तुकडे पाडायचे ठरवले.  म्हणूनच त्यांनी ५५० पेक्षा जास्त राजेराजवाड्यांना स्वतंत्र राष्ट्र बनवायची मुभा दिली.  तसेच भारतात ब्रिटीश इंटलीजियन्स  ब्युरो (IB) या गुप्तहेर खात्याला भारतात हिंदू-मुस्लिम दंगली पेटवायचे काम दिले.  त्यातून पाकिस्तानची निर्माती झाले.  परिणामत: पाकिस्तानचे लोढणे भारताच्या गळ्यात कायमचे बांधून ठेवले आहे. तोडा आणि फोडा ही राज्य करण्याची पद्धत नविन नाही.  मुठभर इंग्रजांनी राजेराजवाड्यांना एकमेकाशी लढायला लावून भारतावर कब्जा केला.  ब्रिटीश सैन्यदल  हे ९०% भारतीय सैनिकांचे होते.  आज हेच अस्त्र अमेरिका वापरत आहे.  याप्रमाणे जगभर लोकशाहीचे संरक्षण करायच्या नावाने अनेक देशात आपले सैन्य घुसवले आहे.  अफगाणिस्तान, इराक, सिरीया, अनेक आफ्रिकन देशात, दक्षिण अमेरिकेत आज अमेरिका ढवळाढवळ करत आहे.  अनेक दहशतवादी टोळ्यांना हत्यार पुरवत आहेत.  अनेक देशामध्ये संघर्ष पेटवत आहे. जसे भारत पाकिस्तानमध्ये जितका संघर्ष होईल तेवढा अमेरिकेला फायदा आहे.  कारण कुठूनही काही झाले तरी हत्यारे अमेरिकेचीच विकली जातात.

प्रत्येक देशावर आपले प्रभुत्व ठेवण्यासाठी अमेरिका अनेक तंत्रांचा वापर करते.  प्रत्येक देशातील राजकीय पक्षात आपली माणस घुसवते.  जसे १९७१ च्या भारत पाक युध्द प्रसंगी इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळात एक अमेरिकन हेर होता, जो मंत्रिमंडळातील सर्व बातमी अमेरिकेला पुरवत होता.  त्याचबरोबर प्रत्येक देशात आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्या प्रस्तापित केल्या.  त्यातील अनेक अधिकारी हे अमेरिकन गुप्तहेर असतात.  जगभरातील भांडवलदार हे अमेरिकेवर अवलंबून असतात.  ते अमेरिकेचा उदोउदो करत असतात.  उच्च पदस्थ अधिकारी, खासदार, आमदार, हे अमेरिका प्रणित आहेत.

अमेरिकेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर पुर्ण ताबा आहे. त्यासाठी अमेरिकेने अनेक जागतिक आर्थिक संस्था बनवल्या.  त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे ‘जागतिक बँक’. ही बँक अमेरिकेच्या पैशावर उभी राहीली.  त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) एशियन डेव्हलपमेंट बँक हे सर्व जगाचे अर्थकारण चालवतात व भारतासारख्या देशाला त्यांचे आदेश पाळावे लागतात.  यावरून लक्षात येईल कि भारताचा अर्थसंकल्प हा भांडवलदारांच्या फायद्याचा का आहे? जसे आता मोठ्या भांडवलदारांनी व कारखानदारांनी सरकारी बँकांकडून मोठमोठे कर्ज उचलले व ते बुडवले.  त्यामुळे आता जवळजवळ ८ लाख कोटी रुपयाचे कर्ज थकीत आहे.  बँकांनी नियमांप्रमाणे हे कर्ज वसूल केलं पाहिजे.   पण असे केले तर अनेक कारखाने, उद्योग बंद पडतील.  म्हणून केंद्र सरकारने आदेश काढले कि हे उद्योग बंद पडू नयेत यासाठी यांचे कर्ज write off करा.  म्हणजेच माफ करा. परिणामत: आपल्या लोकांच्या मालकीच्या स्टेट बँक सारख्या बँका तोट्यात आल्या.  त्यांना वाचवण्यासाठी भाजप सरकारने २.१५ लाख कोटी रुपये त्यांना दान केले.  याचाच अर्थ मोठ्या कंपन्याच कर्ज माफ केल त्यामुळे शेतकरी, कामगार आणि जनतेला द्यायला पैसा यांच्याकडे नाही.  अमेरिकेतही तसेच झाले.  मोठमोठ्या खाजगी बँका बुडाल्या.  ५ कोटी लोकांच्या घरांवर जप्ती आली.  खाजगीकरण – जागतिकीकरण यांच्या नावावर अमेरिकन भांडवलशाहीचा डोलारा उभा आहे. १९९१ पासून तो भारताने स्विकारला आणि भारत बुडाला.  तोच परिणाम आपल्या गावामध्ये व सर्वत्र प्रतिबिंबित होत आहे.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेकारी, भूकमारीने जनता उद्ध्वस्थ होत आहे.  हे फक्त भारतात होत आहे असे नाही. तर जगभर लोकांना दारिद्र्याच्या खाईमध्ये बुडवून टाकलेले आहे.  त्यात अमेरिका सुध्दा सुटलेली नाही.

एकंदरीत भांडवलशाही व्यवस्था म्हणजे पैशाने पैसा कमविणे.  अलिकडे कारखानदारी बंदच होत आली आहे  आणि भांडवलाने भांडवल निर्माण करण्याची पद्धत आली आहे.  थोडक्यात सावकारी पद्धत ही प्रचलित पद्धत होत आहे.  ज्याच्याकडे पैसा आहे तो शेअर बाजारात, बँकेत पैसा गुंतवतो व त्याबदल्यात प्रचंड व्याज कमावतो.  जागतिक अर्थव्यवस्थेच भांडवलदारी सूत्र म्हणजे व्याजवर आधारित आर्थिक व्यवस्था आहे.  त्यामुळे ज्याच्याकडे पैसा नसतो तो आयुष्यभर मरमर मरतो पण हातात काही राहत नाही.  जसे मनमोहन सिंगने FDI आणि मोदीने Make in India हे त्यांचे प्रमुख कार्यक्रम केले.  वरवरचा उद्देश कारखाने निर्माण करून नोकऱ्या निर्माण करणे हा आहे.  पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे कारखाने येतात पण नोकऱ्या कमी होतात. उदा. T.V. बनवणाऱ्या कारखान्यात १००० कामगार लागत असतील तर Make in India मध्ये नविन कंपनी आणल्यास पैसे तर येतात पण १००० च्या जागी १०० नोकऱ्या निर्माण होतात आणि ९०० कामगार बेकार होतात.  या सर्व चर्चेचा सारांश असा कि जो अर्थकारणात हुशार आहे,  तो मजा मारतो जसे मल्ल्या, निरव मोदी, केतन शहा, यांनी घोटाळा करून बँका बुडवून लोकांचे पैसे लुबाडून मजा मारली. आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. चोरांना साथ देणे आणि प्रामाणिक माणसाना मारणे हा आताच्या राजकारणाचा स्थायी भाव झाला आहे.  हे आपल्याला बदलावे लागेल.  अनेक देशामध्ये प्रस्थापित पक्षांना गाढून नविन पक्ष निर्माण झाले व ते आता सत्तेवर आहेत.  जसे फ्रांसमध्ये मॅक्रोनने नविन पक्ष उभा करून ७ महिन्यातच राष्ट्रपतीची निवडणूक जिंकली. दिल्लीमध्ये केजरीवालाने ८ महिन्यात सत्ता काबीज केली. त्याचप्रमाणे मतदारानो, देशबांधवानो  प्रस्थापित पक्षाला नष्ट करा आणि नविन राजकीय व्यवस्था निर्माण करा.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS