बोलणाऱ्याची ससेहोलपट_२८.७.२०२

अलिकडच्या काळात वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांना फार काही महत्त्व उरले नाही. कारण बरीचशी वृत्तपत्र आणि माध्यम ही सरकारची तळी उचलतात आणि विरोधकांना नेस्तनाबूत करतात. म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ हा निष्प्रभ झाल्याची आपल्याला जाणीव होते. पण ही गोष्ट केवळ भारतापुरती मर्यादित नाही. संपूर्ण जगामध्ये प्रसार माध्यमांना निष्प्रभ करण्यासाठी राजकर्ते चटावलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वात जास्त निष्ठुरपणा व आतताईपणा अमेरिकन राजकर्ते करताना दिसतात. त्याचेजिवंत उदाहरण म्हणजे ज्युलियनअसेंजेवर होत असलेला अत्याचार.

अमेरिकेचा दुष्टपणा आणि क्रूरपणा वेळोवेळी जगाच्या दृष्टिकोनात आला आहे. पूर्ण जगावर आपली सत्ता गाजवण्यासाठी अमेरिकेने दुसऱ्या देशांवर प्रचंड जुलूम केलेला आहेत. न्यूयॉर्क वरच्या ११ सप्टेंबर २००१ च्या  हल्ल्यानंतरअमेरिका अफगाणिस्तान मध्ये घुसली आणि हजारो लोकांना मारले. म्हणून अफगाणिस्तानचे सर्व लोक तालिबानच्या बाजूला गेले आणि अमेरिकेला झोडपून काढले. शेवटी अमेरिकेला अफगाणिस्तान मधून पळून जावे लागले. दुसरीकडे इराक मध्ये विकिलिक्सने सिद्ध केले की अमेरिकेने जवळजवळ ६६ हजार लोकांची कत्तल केली. त्याचबरोबर अबू गरीब आणि क्युबामधील गुंतामो बे मध्ये क्रूरपणे सामान्य लोकांचा छळ केला. या सर्व अमेरिकन युद्ध गुन्हेगारीचा दस्तावेज जुलियनने विकीलिक्स ही वृत्तवाहिनी निर्माण करून पूर्ण जगाला दाखवलेव अमेरिकन सैतानी उघडकीस आणली. 

जुलियन असांजेने  इराक अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये अमेरिकेने केलेल्या अत्याचाराचा मोठे पुरावे जाहीरपणे छापले. जगातील अनेक वृत्तपत्रांनी त्यांना मदत केली. अमेरिकेने ज्युलियनला गुन्हेगार जाहीर केला व त्याला अटक करून अमेरिकेला पाठवून देण्याची मागणी केली. सुरुवातीला तो लंडन मध्ये  अनेक वर्ष इक्विडोर ह्या मध्य अमेरिकेतीलदेशाच्या राजदूतावासात एक आश्रित म्हणून राहत होता. त्याला कुठेही फिरायला संधी नव्हती. नंतर त्याला इंग्लंडच्या तुरुंगात डांबले गेले. नुकत्याच इंग्लंडच्या कोर्टाने त्याला पकडून अमेरिकेला धाडून द्यायचा आदेश दिला. हा वास्तविक ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे आणि म्हणून अमेरिकेने त्याची मागणी केली ती त्याच्यावर गुन्हेगारी केस घालून. हेरगिरीच्या आरोपावरून  त्याच्यावर खटला घालण्यात आला व अमेरिकेने मागणी केली की या इसमाला अमेरिकेला परत पाठवा. जिथे त्याच्यावर अमेरिकेत केस चालेल आणि त्याला जवळजवळ १७५ वर्षाची शिक्षा होईल.

कोर्टाच्या निकाला विरोधात त्याला इंग्लंडच्या गृहमंत्र्याकडे अपील करायला संधी होती. त्यांनी तसे अपील देखील केले. पण इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी ते धुडकावून लावले व असांजेला परत अमेरिकेला पाठवायचा आदेश दिला. या आदेशाला जगातील सर्व पत्रकारांनी विरोध केला. कारण जे काय असांजेने छापलं होतं ते त्याने पत्रकार म्हणून छापले होते. त्यात अमेरिकेचे पाप आणि दुष्टपणा सगळ्या जगासमोर आला व विशेषत: अमेरिकन नागरिकांसमोर आला. युकेच्या सुप्रीम कोर्टाने असांजेच्याविरोधात निकाल दिला त्याची पुष्टी करताना इंग्लंडच्या सरकारने म्हटले की असांजेला अमेरिकेत परत पाठवायला कुठलाही अन्याय होत नाही. त्यामुळे सर्वच सरकारनेअसांजेच्याविरोधात भूमिका घेतली आहे व त्याला अमेरिकेला विरोध करण्याबद्दल शासन झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व घेत आहेत.याला प्रचंड विरोध पत्रकार आणि सरकार विरोधी जनता करत आहे. यातून मूळ मुद्दा निर्माण झालेला आहे की सरकारचा विरोधात जे जे पुरावे मिळतात ते पब्लिक समोर आणायचं की नाही? सरकारचा म्हणणं आहे की सरकारचा विरोधातलं कुठलीच गोष्ट छापायची नाही किंवा दूरदर्शन वर आणायची नाही. किंबहुना या सर्वांचा लोकशाहीलाच विरोध दिसतो. सरकारची पाप लोकांमध्ये धुऊन काढण्यासाठीच वृत्तपत्र झालेले आहेत. 

असांजेने जवळजवळ २५लाख कागदपत्र जी अत्यंत गुप्त होती ती विकीलीक्स द्वारा छापली. म्हणूनच असांजेच्या वकिलाने कोर्टामध्ये दावा दाखल केला की त्यांनी ह्या गुप्त कागदपत्राद्वारे इराक आणि अफगाणिस्तानमध्ये जे अमेरिकेने गुन्हे केले ते लोकांच्या हितासाठी छापले.  अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तान मध्ये अनेक निरपराध नागरिकांना मारले होते. विकिलिक्सने एक व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केला.  ज्याच्यामध्ये अमेरिकन आपाची हेलिकॉप्टर बगदाद मध्ये २००७ला नागरिकांवर गोळीबार करताना दाखवले.  त्यात जवळजवळ १८नागरिक मारले गेले होते.  हे सर्व अमेरिकन कायद्याच्या विरोधात होते.  म्हणूनच मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी म्हटले की अशाप्रकारे अमेरिकेने एका पत्रकारांना झोडपण्याचे काम थांबवावे व असांजेला गरज असेल तर त्यांनी मेक्सिको मध्ये येऊन रहावे.  पण असांजेला २०१९मध्ये तुरुंगात डांबण्यात आले आणि त्याची प्रकृती खालावत गेली. विकीलीक्सने २००७पासून २०१० पर्यंत अमेरिकेचे सर्व गुप्त कागदपत्रे छापत गेले.  आत्ताही छापत आहेत.  हे सर्व कागदपत्र विकीलीक्सला चेल्सा मॅनिंग या सैनिकाने दिले. मॅनिंगला अमेरिकेने २०१४साली शिक्षा ठोठावली, पण बराक ओबामाने त्याला माफी केली.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यावर असांजेला इंग्लंडहून अमेरिकेत पाठवून देण्यासाठी मागणी केली.  नंतर बलात्काराच्या आरोपावरून त्याला स्वीडनमध्ये परत पाठवण्यासाठी कोर्टामध्ये केस झाल्या. असांजेने या खोट्या तक्रारीवर खटल्यामध्ये सामील व्हायला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की हा बलात्काराचा आरोप फक्त अमेरिकेला परत पाठवण्यासाठी करण्यात आला आहे. शेवटी अमेरिकेने असांजेला परत आणण्यासाठी दावा केला की कॉम्प्युटरचे मधून गुप्तपणे सरकारी कागदपत्र काढल्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे.

जवळजवळ १५पत्रकारांच्या जागतिक संस्थांनी जानेवारीत बैठक घेतली आणि पटेल यांना विनंती केली की असांजेला सोडून द्यावं. हे सतरा खटले अमेरिकेने असांजेवरलावली आहेत. त्यामुळे त्याला १७५वर्ष तुरुंगात जावे लागेल. आतापर्यंत कुठल्याही पत्रकारावर सरकारी दस्तावेज छापून सरकारला विरोध करण्यामुळे शिक्षा झाली नाही. मग असांजेला शिक्षा का करण्यात यावी? अशाप्रकारचा प्रश्न पत्रकारांनी विचारला.  अमेरिकेने हेही आरोप केले की असांजे रशियासाठी काम करतो आणि हे सर्व कागदपत्र उघड उघड करण्याचे कारस्थान असांजेने रशियामुळे केले.  अलिकडे जो बायडन राष्ट्रपती झाल्यावर तर असांजेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करू लागली.  कारण असांजेने हे सगळं कागदपत्र उघड करून विरोधी पक्षाला मदत केल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाने आरोप केले आहेत. 

ब्रिटिश सरकारने असांजेच्या विरोधात कारवाई सुरू केल्यावर जगभर विरोध झाला.असांजेसंरक्षण समिती निर्माण करण्यात आली व जगातील नामांकित लोकांनी असांजेलामदत करण्यासाठी जबरदस्त चळवळ उभी केली आहे. इग्नेश कल्लाडहेअमिनेस्टी इंटरनॅशनलचे प्रमुख आहेत. ही संघटना मानवी हक्काने जिथे जिथे तुडवले जाते तिथे जाऊन आश्रितांना मदत करते. ते म्हणाला की असांजे वरील कारवाई म्हणजे लोकशाहीला धोका आहे.  सरकार विरोधात पत्रकार काही छापतात आणि मग त्याला गुन्हेगारी कारवाई म्हणतात हे लोकशाहीला पोषक नाही. निलेश मेजर हे युनोचे खास रिपोर्टरने म्हटले आहे की इंग्लंड असांजेवरकडक कारवाई करत आहे व त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  जगातील तीनशे डॉक्टर,मानवरुग्ण तज्ञ यांनी एक संघटना बनवली आहे की ‘डॉक्टर्स फॉर असांजे’. यांना लिहिले की असांजेची खालवत असणारी प्रकृती लक्षात घेऊन त्याच्या विरोधात जी कारवाई केली जाते ही अत्यंत चुकीची आहे आणि त्याला सोडवण्यात यावे.

दुसरीकडे ब्लिंकन हा अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री यांनी म्हटलं की पत्रकारांना पूर्ण संरक्षण दिले जाते आणि त्यांचे संरक्षण करणे हे सर्वांचे काम आहे. त्यांनी असांजेला अमेरिकेत आणून खटला करून तुरुंगात छळ करण्याचं काम चालूच ठेवलेले आहे. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार असतो की सरकारच्या कारवाई बद्दल सर्व काही माहिती मिळवली पाहिजे. म्हणूनच अण्णा हजारे यांनी मोठी चळवळ करून माहितीचा अधिकार हा कायदा निर्माण केला. जगातील सर्वात पहिली लोकशाही बनवणारा अमेरिकेने असांजेने पब्लिक मध्ये त्यांचे दुष्कर्म नेल्याबद्दल त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. जागतिक पत्रकाराच्या संघटनेने म्हटले आहे ही अशाप्रकारे जर असांजेला अमेरिकेत परत पाठवण्यात येईल. तर जगातील सर्व पत्रकारावर हा प्रचंड अन्याय आणि अत्याचार होईल.  म्हणून असांजेला सोडवलं पाहिजे.  अशा प्रकारची मागणी मागणी जगभर उमटत आहे.

असांजेचे उदाहरण मी जाणीवपूर्वक येथे ठेवलेले आहे.  त्याचे कारण की पूर्ण जगामध्ये दमन करण्याचा पर्यंत सुरू आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे पत्रकारिता. हिला दाबून आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व सरकार प्रयत्न करत आहेत. जसे अनेक वृद्ध कार्यकर्त्यावर नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या कारणावरून तुरुंगात डांबण्यातआलं. केसचा अजून निकाल लागला नाही. पण शिक्षा पूर्णपणे त्यांनी भोगली आहे.  अशाच प्रकारे अनेक पत्रकारांना कैद करून डांबण्यातयेते त्याला विरोध करण्याचे काम सर्व जनतेने केलं पाहिजे. तिसता सेटेलवाड असू दे किंवा कोणी असू दे. लोकशाहीमध्ये लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. बोलणं खोटं ठरलं तर त्यांना शिक्षा करता येते, पण सरकारविरुद्ध काही वक्तव्य केलं. म्हणून त्यांना देशद्रोही ठरवणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि आजच्या जगात सरासरी ते होत आहे. म्हणून अशा वृत्ती प्रवृत्ती विरोधात लोकांनी लढायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS