भीमा कोरेगावचा आतंकवाद
भीमा कोरेगाव हे महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्ण कडी म्हणून सैन्यदलात ओळखले जाते. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी SC/ST/OBC/मराठा या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य घडविले. त्यांना बदनाम करण्यासाठी व जातीय- धार्मिक स्वरूप देण्यासाठी RSS ने नेहमीच प्रयत्न केला आहे. कारगिल युद्धात महार रेजिमेंट मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. म्हणून असे प्रकार घडावेत ही खेदाची बाब आहे. RSS च्या एकबोटेने अनेक वर्ष त्या भागात संभाजी महाराजांच्या नावाने आतंक माजवला आहे. महार रेजिमेंटचा पेशव्यांवर मिळवलेला विजय हे संभाजी (खोटे नाव) भिडे सारख्या असंख्य मनुवादी जमातीच्या लोकांच्या मनात ही बाब सलत आहे. त्याचाच भाग म्हणून, जाती-जाती मध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे दंगल घडवून आणली आणि अनुसूचित जातींवर सूड घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब निषेधार्य आहे. दंगल घडवण्याच्या प्रकरणावरून पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक केली. ही बाब धाडसी अधिकाऱ्यांनी केली आणि सोडले. आता सरकार त्यांना सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. दंगलीच षडयंत्र हे अनेक दिवस पिकत होते . ह्या आधी संभाजी महाराजांचा अंत्यविधी एका दलित समाजाच्या व्यक्तीने केला होता त्याची समाधी मिलिंद एकबोटेने तीन दिवस आधी फोडली होती. संभाजी महाराजांनी देशद्रोही मनुवादी लोकांना भिंतीत चिरून मारले होते आणि म्हणूनच संभाजी महाराजांविषयी एक प्रचंड राग ह्या मनोवृत्तीच्या लोकांमध्ये अजूनही धुमसत आहे. ज्याने त्यांची अंत्यविधी केली त्याची समाधी उध्वस्त केली . म्हणजे सरकारला ही गोष्ट माहित होती. तणावग्रस्त वातावरण होते. पण सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.
एकंदरीत हा अविरत चालणाऱ्या वर्ण वर्चस्वाचा लढा आहे. पेशवाईत वर्णवर्चस्व मनुवादी लोकांनी प्रस्थापित केले. जवळ जवळ १०० वर्ष शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य खालसा करून पेशव्यांनी दलितांच्या गळ्यामध्ये मडकी बांधली. शूर बहादुर सेनापतींना जहांगीर वाटून त्यांचे समाधान केले. शिंदे, गायकवाड, होळकर, भोंसले अशी राज्यघराणी निर्माण झाली. त्यात फुट पाडून देशावर इंग्रजांनी कब्जा केला. पेशव्याला एकटा पाडून संपवला. तीच ती भीमा कोरेगावची लढाई. पेशव्यांचा इतका अत्याचार होता, कि पेशव्यांपेक्षा इंग्रज बरे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. म्हणूनच भीमा कोरेगाव इथे दर १ जानेवारीला महार रेजिमेंट आणि बहुजन समाज विजय दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस उच्चवर्णीय, जानवेधारी हिंदूंच्या विरुद्ध लढा आहे. अत्याचार विरुद्ध लढा आहे. म्हणूनच जानवेधारी हिंदुत्वाला हे सलत आहे. हिंदुत्व म्हणजेच पेशवाई . हिंदू म्हणजेच उच्च जातीचा शुद्रांवर प्रभुत्व. जे जानवेधारी नाहीत ते शुद्र आहेत. म्हणून फुकट काही लोक मोठेपणाचे सोंग आणतात. आधुनिक काळात हिंदुत्वाची सांगड स्पष्टपणे भांडवलशाहीशी आपोआप बसते. हिंदुत्व म्हणजे उच्च जातीचे राज्य. भांडवलशाही म्हणजे श्रीमंतांचे राज्य. ह्यात भारताच्या लोकसंख्येचा 3 % वर्ग येतो. हे ९७ % भारतीय लोकांवर राज्य करतात. हिंदुत्व आणि भांडवलशाही हा अनोखा संगम आपण पाहत आहोत. त्यातूनच पंतप्रधान नरसिंह राव जानवेधारी हिंदूने खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा) व्यवस्था निर्माण केली. ती जानवेधारी हिंदू वाजपेयीने, मनमोहन सिंहाने आणि मोदीने चालवली आहे. म्हणूनच मी इतके वर्ष सापनाथ कॉंग्रेस/राष्ट्रवादी आणि नागनाथ भाजप सेना मध्ये काही फरक नाही हे सांगून दमलो आहे. हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. उच्चवर्णीय अधिक श्रीमंत भांडवलदार पक्ष. बाकी गुलाम.
पेशव्यांनी संभाजी पुत्र शाहू महाराजांना फक्त नावाचा छत्रपती ठेवला आणि हिंदू संस्कृतीच्या नावाने चातुवर्ण पुन्हा प्रस्थापित केला. ही मानसिकता शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उघडपने पुढे आली. जी आता राहुल गांधीनी स्पष्ट केली. राहुल गांधी जानवेधारी हिंदू आहे. म्हणजे आम्ही शुद्र आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक करायला विरोध जानवेधारी हिंदूनेच केला. मी हि प्रवृत्ती सोनिया गांधीचा सचिव असताना कॉंग्रेस मध्ये जवळून पाहिली आहे. जेव्हा सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेव्हा पक्षाचा ताबा आमच्या सारख्या तरुणांनाकडे आला. जानवेधारी हिंदु नेता प्रणव मुखर्जी बाजूला पडला. सोनिया गांधी त्यांना दिड वर्ष भेटली नव्हती. त्यानंतर ह्या लोकांनी भांडवलदारांच्या मदतीने जानवेधारी पक्षाचा ताबा घेतला. प्रणव मुखर्जी हे अंबानीच्या अत्यंत जवळचे समझले जात असत. अंबानीनेच बाळासाहेब ठाकरेना भेटून शिवसेनेचा पाठिंबा जानवेधारी प्रणव मुखर्जीना दिला. कॉंग्रेस हा पूर्णपने जातीयवादी पक्ष आहे हे मला दिसले.
त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला. तरी सर्व जातीच्या लोकांनी समन्वयाने या बाबीला तोंड दिले पाहिजे. कारण कष्टकरी जनतेला फोडण्यासाठी, जाती-जमातींना विभागण्यासाठी नेहमीच इंग्रजांपासून आजपर्यंत ‘फोडा आणि राज्य करा’ हे तत्व वापरण्यात आले आहे. सापनाथ UPA आणि नागनाथ NDA यांनी या तत्वाचा वापर करून अनेक वर्षे लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण केली व त्या पाठीमागे शोषणकारी, आतंकवादी, राजकीय व्यवस्था निर्माण केली. या देशात भांडवलशाही आणण्यासाठी,श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी अंबानी-अदानी-मल्ल्या आणि बहुराष्ट्र कंपन्यांना भारताला लुटण्यासाठी पूर्ण व्यवस्था ताब्यात देण्यात आली आहे. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी, दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी हिंदुत्व असे गोंडस नाव दिले. साधारणत: अशा दंगली सरकारच घडवून आणते. त्यासाठी ते भारतीय गुप्तचर खाते वापरतात. भारतात ब्रिटीशानी दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश IB ह्या गुप्तहेर खात्याला तोडा आणि फोडाची कामगिरी दिली. हिंदू आणि मुस्लीम दंगली त्यांनी घडवल्या. भारताला तोडून टाकले. आता देखील तेच चालू आहे. IB चे अधिकारी माल्लोय कुमार धर ह्यांनी आपल्या पुस्तक ओपेन सिक्रेटस मध्ये कबुल केले कि त्याच्याच घरात बाबरी मशीद पाडण्याचा कट शिजला. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) व्यवस्था स्थापित करण्यासाठी UPAसरकारने व NDA विरोधी पक्षाने मिळून बाबरी मशीद पाडली. त्याचप्रमाणे मोदी सरकारच्या शासनामध्ये जाती-धर्म द्वेष झपाट्याने पसरला आहे. त्यापाठीमागे खाउजा धोरणाची अंमलबजावणी झपाट्याने करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या, कामगार क्षेत्राचे कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्या नष्ट करणे असे अबोली राजकारण भारतामध्ये फोफावत आहे.
याला उत्तर देण्यासाठी सर्व जाती-धर्माने एकसंघ होणे अत्यंत आवश्यक आहे व अशा प्रकारच्या आतंकवादी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. RSS चे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यानी मिळून अशा प्रकारच्या आतंकवादी घटना निर्माण केल्या.याला कडक शासन झाले पाहिजे. म्हणून ह्या आतंकवादी घटनेला दहशतवादी घटना म्हणून जाहीर केले पहिजे. संघटीत गुन्हेगारी म्हणून जाहीर केले पाहिजे. म्हणजे NIA ला चौकशी करावी लागेल. ह्यांना मोका लागला पाहिजे. ह्यांच्या संघटनावर बंदी आणली पाहिजे. ह्यांचे कारस्तानातील सर्व सूत्रधार पकडले पाहिजेत आणि स्वतंत्र खटला दाखल झाला पाहिजे. दुसरीकडे तथाकथित बहुजन नेत्यांनी श्रेय घेण्याचे बंद करावे. जनतेच्या जीवावर राजकारण करतात आणि जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याची पद्धत मोडीत जनताच काढील. पण सरकारच त्यांचे संरक्षण करते. तसेच मालेगाव बॉम्ब स्फोटाचे आरोपी कर्नल पुरोहित आणि त्यांच्या साथीदारांना मुक्त करण्यात आले. हे सरकारी षडयंत्र जनतेने ओळखले पाहिजे. पूर्ण रोजगार, निवारा, अन्न, आरोग्य, शिक्षण, वस्त्र यासाठी संघर्ष केला पाहिजे. वरवर हे हिंदुत्वाचे नाव देतात आणि हिंदू शेतकरी, कामगारांचे जीवन उद्ध्वस्त करतात. याला आपण थांबविले पाहिजे आणि यांचा धर्म-जाती द्वेष निर्माण करण्यासाठी प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com मोबा. नं. ९९८७७१४९२९ |