रशिया युक्रेन युद्ध कधी संपणार ?

युक्रेनचे युद्ध सुरू होऊन एक वर्ष झाले तरी अजून शांती दूर आहे. प्रेसिडेंट पुतीन यांनी फेब्रुवारी, २०२१ ला भाषण केले आणि लढाई हळू हळू वाढत जाईल, अशा प्रकारचे भाष्य केले. अशाप्रकारे अमेरिकन राष्ट्रपती जो बाईडन युक्रेन मध्ये कीव ह्या युक्रेनच्या राजधानीत आले.  इथे म्हणाले की ही लढाई लागेल तेवढा वेळ चालणार आहे. तिचा अंत: रशियाच्या पराभवाने होईल. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आता युद्ध संपल्याशिवाय थांबत  नाही. ब्रिटनचे प्रधानमंत्री सुनक हे युद्धाला एक वर्ष झाल्यानंतरच किवला गेले आणि तिथे त्यांनी भरपूर अशी मदत जाहीर केली. अमेरिकेने तर मदत देण्याचे जाहीर केले व दोन अब्ज डॉलरची मदत केली.

एकंदरीत हे युद्ध हे अमेरिका युरोप विरुद्ध रशिया असे युद्ध आहे. या युद्धामध्ये चीन आणि भारत दोघांनीही बोलताना शांततेची भाषा केली. पण आपण पूर्ण मदत रशियाकडून घेतो. रशियाकडून स्वस्थ तेल मिळते, गॅस मिळते आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा चांगला परिणाम झाला आहे. भारत हे अनेक वर्ष रशियाच्या युद्ध सामग्रीवर अवलंबून आहे आणि आधुनिक योग्य युद्ध सामग्री ही रशियाकडून मिळते. म्हणून भारताने कधीही रशिया विरुद्ध भूमिका घेतली नाही. युक्रेन मध्ये रशियाने आक्रमण केल्यानंतर पूर्ण युरोप आणि अमेरिका बरोबर ज्यांचे संबंध होते,  त्यांनी या युद्धाला विरोध केला. रशियाला विरोध केला, असे दाखवण्यात आले.  जणू काही रशियाच आक्रमक आहे आणि म्हणून लोकशाहीच्या समर्थनार्थ सर्व देश युक्रेनच्या बाजूने उभे आहेत, पण हे काही सत्य नाही.

अमेरिका नेहमीच रशिया आणि चीनच्या विरोधात भूमिका घेत असते आणि या दोघांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळी कारस्थान करत असते. जसे ते पाकिस्तान आणि भारतामध्ये समसमान वागणुकीचे दर्शन देतो. पण अमेरिकेने कायम पाकिस्तानलाच मदत केलेली आहे.  हे एक ऐतिहासिक सत्य आहे. याचे कारण म्हणजे भारत एक बलाढ्य राष्ट्र आहे आणि तो सर्व शक्तिशाली होऊ शकतो. भविष्यामध्ये तो प्रचंड सामर्थ्य एकवटू शकतो व भारताची शीत युद्धामध्ये भूमिका ही काय अमेरिकेच्या बाजूने राहिलेली नाही. उलट अनेकदा अमेरिकेने भारताच्या विरोधातच भूमिका घेतली. जसे १९७१च्या युद्धाच्या प्रसंगी अमेरिकेने चीनला सांगितले होते की आपलं सैन्य भारताच्या सीमेवर जवळजवळ करा म्हणजे भारतावर प्रचंड प्रमाणात दबाव टाकण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. दुसरीकडे इंदिरा गांधीला बजावलं होतं की पाकिस्तानवर तुम्ही हल्ला केला, तर अमेरिकन सैन्य पाकिस्तानच्या बाजूने लढेल. याचं कारण म्हणजे पाकिस्तान सरळ अमेरिकन गोठात शिरला होता. पाकिस्तानने सीटो करारवर सही केली होती. सीटो करार म्हणजे दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाच्या देशांना सीटो करार करण्यास अमेरिकेने सांगितले होते. पण पाकिस्तान सोडलं तर या भागातल्या कुठल्याही देशाने या सुरक्षा करारावर सही केली नव्हती आणि म्हणून पाकिस्तान हा अमेरिकेचा नेहमी लाडका देश राहिलेला आहे. १९७१ च्या युद्धात कहर झाला. पाकिस्तानी लोकशाही तोडून टाकण्यासाठी मुजीबर रहमान याला सहकार्य केले नाही, म्हणून त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानने बांग्लादेश निर्माण केला व १९७१ च्या युद्धामध्ये अमेरिकेने आपल्या पाणबुड्या व आपल्या नेव्हीला पाकिस्तानच्या मदत करण्यासाठी बांग्लादेशकडे कुच केलं व इंग्लंडने आपला ईगल स्कॉर्डन कराचीकडे पाठवला. पण रशियाच्या पाणबुड्यांनी मध्येच येऊन अमेरिकन नेव्हीला आणि ब्रिटिश नेव्हीला अडवले आणि माघारी पाठवले. म्हणून पाकिस्तानला उघडपणे अमेरिकेने १९७१ च्या युद्धामध्ये पूर्ण मदत केली आहे व भारताला पूर्णविरोध केला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून आपण पुढे नीट गेले पाहिजे.

पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात हत्याराची मदत आणि आर्थिक सहाय्य अमेरिकने नेहमीच केले आहे. आणि ज्या देशाचे संबंध ७५ वर्षाचे आहेत, त्याला सहज दुसऱ्या कोणाला तोडता येत नाही हे सत्य आहे. म्हणून अमेरिका हे पाकिस्तानला मदत करत राहणारच आहे आणि या काळी काही युद्ध प्रसंग आला तिथे अमेरिकेला आणि भारताला भूमिका घ्यावी लागेल.  तर ती भूमिका भारताविरोधात असेल. अशा परिस्थितीत युद्ध सुरू झाले, त्याला कारणीभूत अमेरिकेची दादागिरीच आहे. युक्रेन मध्ये विवादित भाग आहे,  जसे क्रिमिया. हा भाग युक्रेनमध्ये होता. पण तेथील रशियन जनतेने रशियाबरोबर जाण्यासाठी मतदान केले आणि क्रिमिया हा भाग रशियामध्ये गेला. अशाच प्रकारे युक्रेनचा पूर्वीचा भाग ज्याला डॉनबास म्हणतात. तेथील बहुतेक जनता ही रशियन बोलते. म्हणून या भागातल्या लोकांनी निर्णय घेतला की आपला स्वतंत्र प्रांत निर्माण करायचा आणि रशियाला जाऊन सामील व्हायचं. म्हणून या भागांमध्ये अनेक वर्ष विवाद चालू आहे.  त्या भागातील लोकांना चिडवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.  रशियन स्पिकिंग भागामध्ये आता प्रचंड संघर्ष सुरू झाला आहे. त्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न लोक सुचवतात आणि करतात पण खरं हे आहे ही अमेरिकेला युक्रेनचा उपयोग स्वतःसाठी करायचा होता.  म्हणून त्यांनी म्हणजे अमेरिकेने युक्रेनला नॅटो करार करायला सांगितला होता व करायचा प्रयत्न सुरू केला.

तो करायचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी नॅटो  मध्ये असणारा सर्व देशांनी युक्रेनला स्वीकारण्याची गरज असते. नॅटो  म्हणजे नोर्थ अटलांटिक प्रिटी ऑर्गनायझेशन. ही संघटना शीत युद्धामध्ये अमेरिकेने आणि युरोपने बनवली होती. त्या माध्यमातून जास्तीत जास्त देश आपल्याकडे ओढून रशिया विरुद्ध उभे करायचे, अशाप्रकारे हे युद्ध १९९१ ला संपल्यानंतर पूर्वाश्रमीचे रशिया बरोबर असणारे देश हे मोठ्या प्रमाणात नॅटो मध्ये जाण्याचा प्रयत्न केला व अनेक देशानी नॅटो मध्ये सामील होऊन त्यांनी संघर्ष करावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

शीत युद्ध काळात नॅटो हा मर्यादीत होता.  त्यावेळी फक्त निवडक देश नॅटो मध्ये होते. पण १९९१ नंतर मोठ्या प्रमाणात रशियाबरोबर असणारे देश नॅटो मध्ये गेले.  त्यामुळे रशियाला प्रचंड धोका उत्पन्न झाला.  म्हणून रशिया आपल्या सीमेवरील देशांना नॅटो मध्ये जाण्याबद्दल विरोध करते.  त्यामुळे युक्रेन जेव्हा नॅटो  मध्ये जायला लागला, त्यावेळी रशियाने विरोध केला आणि खर्‍या अर्थाने त्याचा परिणाम युद्धात झाला.  हेच मूळ कारण रशिया – युक्रेनच्या युद्धाचे आहे.  पण युद्ध झाल्यावर रशियाने बराच प्रांत कब्जा केला आहे व युद्धामुळे युक्रेनचे लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार झाले.  त्यातील अनेक लोक शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले व आता हे युद्ध चालू आहे.  हे संपण्याचे चिन्ह दिसत नाही.  युक्रेनच्या राष्ट्रपतीने तर जाहीर केले की युक्रेन लढणार पण शेवटपर्यंत रशियाचा मास्कोपर्यंत जाण्यासाठी युद्ध करेल.  व आता हे युद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाही.

रशिया युक्रेनमधून जवळ जवळ ७० टक्के गहू पूर्ण जगाला पुरविला जातो.  तसेच तेल देखील पश्चिम युरोपला पुरविले जात होते.  आता हे सगळे बंद झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान हे अनेक देशांचे झाले आहे.  त्यात अमेरिका आणि यूरोपियन देशांनी रशियावर व्यापारची बंदी घातली आहे.  अर्थात याचा फायदा चीन आणि भारताला मोठ्या प्रमाणात  झाला आहे.  अमेरिकन आदेशाला धुडकावून आपण रशियाकडून अनेक गोष्टी घेत आहोत.  म्हणून दोन्ही देशाने मोठ्या प्रमाणात रशियाला मदत केली आहे.  तरी हा पेच सोडविण्यासाठी भारताला अहंम भूमिका घ्यावी लागणार आहे.  अन्यथा हे युद्ध सुरूच राहणार.  अमेरिकेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.  युक्रेनला हत्यारे आणि आर्थिक मदत केली जात आहे व पूर्ण जगामध्ये आता तणावाची परिस्थिती आहे. अणूअस्त्र न वापरण्याची भूमिका आता ठिसुळ होत चालली आहे.  कदाचित कुठल्याही देशांनी अणूअस्त्र वापरण्याचा निर्णय जर घेतला तर जगामध्ये कलह माजेल.  म्हणून सर्व देशांनी आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी व युद्धबंदी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS