अमेरिकेत काय चालले आहे ते कळेनासे झाले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एके फोर्टी सेवन घेऊन आपल्याच विद्यार्थ्यांचे खून पाडले असे अनेक शाळेत झाले. हे लोन आता पासून युरोपमध्ये गेले. कालच सरबियामध्ये एका तेरा वर्षाच्या मुलाने आठ विद्यार्थ्यांना एके फोर्टी सेवन घेऊन मारले. त्या अगोदर त्यांनी एका गार्डचा खून केला. त्यानंतर तो शाळेच्या आत गेला व तीन विद्यार्थ्यांना मारले. मग तो इतिहासाच्या वर्गात गेला आणि परत गोळीबार केला आणि मग त्यांनी स्वतः पोलिसांना बोलवले. विद्यार्थ्यांच्या वडिलांनी असं सांगितले की तो आपल्या मुलीच्या क्लास रूममध्ये गेला आणि टीचरवर फायरिंग केली आणि तेथील क्लासमेट खाली बॅचखाली लपले. बरेच विद्यार्थी मागच्या दाराने पळून गेले. अशाप्रकारे ही मोठी हानी झाली. बेलग्रेडमध्ये सर्वांनी तीन दिवसाचा शोक पाळण्याचे ठरवलेले आहे. हा शूटर गोष्ट नावाचा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांने आपल्या वडीलांच्या दोन बंदुका बरोबर घेतल्या, त्यातली एक पिस्टल होती आणि चार मोलोटोव कॉकटेल हे बॉम्ब होते. ही हत्यारे सगळी लायसन्स होती आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. पण त्या विद्यार्थ्याला त्याचे कोड वगैरे सगळं माहित होतं आणि म्हणून तो आत जाऊ शकला. जेव्हा सगळ्या गोळ्या संपल्या, तेव्हा त्या विद्यार्थ्यांने बंदुकीला रिलोड केल आणि पुन्हा गोळीबार केला. त्या विद्यार्थ्यांने एक क्लासरूमचे चित्र काढले होते आणि ज्या विद्यार्थ्यांना मारायचे होते त्यांची यादी पण त्यांनी बनवली होती. त्यांने हा प्लॅन जवळ जवळ एक महिनाभर केला होता. जे नऊ लोक मारण्यात आले होते, त्याशिवाय आणखी सहा लोकांना जखमा झाल्या आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सर्वांनी असे सांगितले की अनेक ठिकाणी अशाप्रकारे हल्ले झाले आहेत.
२०२३ मध्ये नॅशील अमेरिकेतल्या शाळेमध्ये तीन विद्यार्थ्यांना मारण्यात आले. नंतर थायलंड व अमेरिकेमध्ये सहा ठिकाणी मारण्यात आले व युरोपमध्ये इतर ठिकाणी मुलांनी मुलाला मारण्याच्या घटना अनेक आहेत. अशाप्रकारे शाळेमध्ये मुसक घटना अमेरिका आणि युरोपमध्ये घडताना दिसतात. त्याचे कारण काय आहे? हे मात्र अजून तेथील सरकारला व लोकांना कळले नाही. अलिकडे अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत, चित्रपट आणि टीव्हीच्या मध्यमातून प्रचंड हिंसाचार चित्रित केला जातो. ज्याच्यामध्ये हत्याराचा वापर मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. त्यामुळे बालवयामध्ये एकमेकावरच्या रागाचा परिणाम म्हणून बंदुकीचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना मारण्याच्या घटना या घडतच आहेत. याचे प्राथमिक कारण स्पष्टपणे दिसते, ते म्हणजे अमेरिकेमध्ये हत्याराला लायसन्स लागत नाही. तिथल्या बंदुकीच्या कायद्यामध्ये अशी सूट आहे की कोणीही हत्यार घेऊ शकतो आणि वापरू शकतो. म्हणून ग्रामीण अमेरिकेमध्ये पूर्वीपासून एक प्रकारची संस्कृती निर्माण झाली आहे. जिथे आपलं संरक्षण करण्याची जबाबदारी लोक स्वतःवरच घेत आहेत. त्यामुळे सरास चार-चार ते पाच-पाच बंदुकी प्रत्येकाच्या घरात असतात. पुढे जाऊन या स्वयंचलित बंदुकासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.
बंदुकीच्या कायद्यावरून अमेरिकेचे राजकारण चालते. तिथे ट्रम्पचा रिपब्लिकन पक्ष बंदूक धारण करायला, विकत घ्यायला परवानगी असावी, अशी बाजू धरतो. त्याउलट डेमोक्लेटिक पक्ष बंदुकीला विरोध करतो, यावर प्रचंड राजकारण चालले असते. महिला वर्ग बंदुकीच्या वापराला मोठा विरोध करतो. असे जे विरोध आहेत ते महिलांकडून जास्त प्रमाणात आहेत. जसा रिपब्लिकन पक्ष महिलांच्या अबोर्शनला मोठ्या प्रमाणात विरोध करतो. हे सगळे राजकारणाचे मुख्य विषय झालेले आहेत. ओबामाचा डेमोक्लेटिक पक्ष हा उदारमतवादी आहे आणि ट्रम्पचा रिपब्लिकन पक्ष हा ख्रिचन कट्टर पक्ष आहे. हीच मंडळी भारतीय विद्यार्थ्यांना म्हणतात आपल्या देशात परत जा. अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. पण हीच श्रीमंती मूठभर लोकांच्या हातात आहे. म्हणूनच अमेरिका मुक्त अर्थव्यवस्थेला पाठींबा देते. त्या उलट रशिया आणि चीन हे देश समाजवादाचे पाठीराखे आहेत. सर्वांना समान न्याय आणि समान संधी मिळावी असे त्यांचे धोरण होते. हा मूलभूत विरोध या देशमध्ये असल्यामुळे अमेरिकेने रशियाला संपविले. म्हणूनच १९४५ पासून १९९१ पर्यंत जगामध्ये शीतयुद्ध चालले होते. बंदूक बाळगणे हा अमेरिकेत सांस्कृतिक भाग निर्माण झाला. या अशा संस्कृतीमुळे अमेरिकेमध्ये वर्णभेद आहे. काळ्या आणि गोर्या लोकांमध्ये कायम संघर्ष आहे. तो अमेरिकन निवडणुकीमध्ये दिसतो. जसे भारतामध्ये हिंदू – मुसलमांनामध्ये कायम संघर्ष आहे. तसाच संघर्ष राजकीय पक्ष करतात. त्यामुळे निवडणुकीत प्रचंड हिंसाचार होतो. जसा अमेरिकेत मागच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. गोर्या लोकांनी तेथील संसदेवर हल्ला केला आणि खासदारांना पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे अमेरिकन लोकशाही ही जगातील पहिली लोकशाही असून देखील तिथे लोकशाहीला काळिमा फासणारे अनेक लोक आहेत. अमेरिकेत प्रचंड द्वेष भावना आहे. ती भारतात ही दिसते. अमेरिका पूर्ण श्रीमंताचा देश आहे, तेथे गरीब तिसरी जात आहे. म्हणून अमेरिका पुढारलेला देश आहे, ही कल्पनाच चुकीची आहे. तिथे मानवतेला काळिमा फासणार्या प्रचंड घटना घडत आहेत. म्हणूनच जगजेता अमेरिकेने जगावर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गलिच्छ संस्कृतीला अमेरिकेमध्ये प्रचंड वाव आहे. पूर्ण जगामध्ये देशा-देशामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. अनेक देशामध्ये युद्ध होत आहेत, त्याचे कारण अमेरिकेत आहे. जसे रशिया युक्रेनमध्ये युद्ध आहे. पाकिस्तानला अमेरिका पूर्ण मदत करत आहे. त्याचे परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. जगभर दहशतवाद अमेरिकेमुळे चालू आहे.
भारतात सुद्धा अमेरिकन संस्कृती मोठ्या प्रमाणात वावरत आहे. सेक्स आणि शराब फोफावत आहे. ड्रग्सच्या वापराने जगातील तरुणाईला बरबाद केले आहे. कुटुंब व्यवस्था बिघडली आहे. तरुणपणीच मुलं आपलं घर सोडून जातात व आई-वडिलांच्या प्रेमाला मुकतात आणि अनेक प्रवाह निर्माण झाले आहेत. जसे समलैंगिक विवाहाचा प्रसार अमेरिकेत झाला आणि तो जगात फोफावत आहे. घटस्फोट तर साधारण विषय झाला आहे. पैशासाठी लोक वाटेल ते करायला तयार आहेत. बंदुकीच्या वापरामुळे मुलांमध्ये सुद्धा प्रचंड हिंसाचार फोफावत आहे. त्यामुळे अमेरिकन संस्कृती ही हिंसाचाराला पुष्टी देते आणि त्याचे प्रतिबिंब पूर्ण जगात आपल्याला बघायला मिळते. अशा परिस्थितीत भारतातील संस्कृती देखील हिंसक, चारित्र्यहीन आणि अमानवी बनताना दिसत आहे. म्हणून आपण वेळीच अशा प्रवृतींना नष्ट केल्याशिवाय भारत महान राष्ट बनू शकत नाही. याकडे राजकर्ते कितपत लक्ष देतात हे आपल्या सर्वांना दिसतच आहे. या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आपल्या सरकारला सांस्कृतिक बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पहिले. या अशा विध्वंसक समाजाला दुरुस्त करण्यासाठी एक जबरदस्त सांस्कृतिक चळवळ उभी करावी लागणार आहे. त्यासाठी राजकर्त्यांची आणि समाजाची सांस्कृतिक शक्ती वाढविण्याची गरज आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९