Dear Volunteers and Friends,
I write to you, to tell you how fortunate I am to be your colleague and your friend. On 12th January, our leader Arvind Kejriwal crowned me with the Aam Aadmi cap and I became a part of a great experiment of hope.
AAP government in Delhi achieved those heights in development in 3 years which BJP and Congress could not do for many years.
we will give our everything to destroy the forces of evil and eradicate crime, corruption and communalism from the face of India. We will make India a land of joy and abundance, where Aam Aadmi will get a good quality of life. I wish you all a new year of success, joy and happiness.
Best wishes,
Brigadier Sudhir Sawant
31st December is a sad day as all the days of the year become a part of your past never to return again. This year, I started afresh and toured through every nook and corner of Maharashtra. In this process, I met many ex colleagues and influenced them to start working with me. I quit the Congress by resigning from the MLC post in 2007 . I condemned the then Manmohan Singh's corrupt governance. Our very own cultured Manmohan. Media’s darling Manmohan, was infact ruining the country but people were deceived by his politeness and simplicity. Due to Manmohan Singh’s presence, the Congress was decimated and merely won 40 Lok sabha seats.
Uptill 1991, India was a welfare state. The concept of a welfare state is defined in the Indian Constitution. Manmohan Singh amended that. The welfare state was relegated to oblivion. He went forward and encouraged Privatization. Hospitals, Railways, schools, buses etc were all privatized. If Railways will be completely privatized, they will charge exorbitantly. If the ST is privatised, No one will provide transportation to remote corners of the country. Private school education will be extremely expensive. Even now, the idea of free education only exits in theory. After looking at the shabby school provided by the government, people are forced to send their children to expensive private schools. In the health sector there is no sign of development. Fadnavis and his government have gobbled all the money allotted for medicines and other medical facilities. Nothing is left over for the common man. Modi is a carbon copy of Manmohan Singh.
We had profusely protested against implementation of these western policies in India. I had directly confronted Manmohan Singh and Narsimha Rao. I emphatically stated that I had quit my role as a Soldier to join politics only to make the life of my fellow farmers better. Not to impoverish them.They destroyed the rural economy, Manmohan again was responsible for this. Modi stepped into his shoes, and followed suit.
1991 is the year that destroyed India. From there on our country’s focus shifted from its poor citizens onto the American ideology. Manmohan Singh is a agent of western philosophy. As a employee of world bank which is owned by the US, He brought in American capitalism in India. His privatisation , globalisation and liberalisation {PGL) transformed Indian economy for the advantage of the urban rich. Whereas the Constitution guaranteed equality of status and opportunity. Manmohan and then modi overturned this to bring in inequality in all the spheres. This new. System of governance generated wealth but for a few. 1% of population holds 74% of the wealth.the failure of this new economic model is reflected by human trauma. Lakhs committed suicide.
Due to introduction of privatization in 1991, the common man All services became extremely expensive and inaccessible such as travel, health etc . Secondly, restrictions on industry were removed due to liberalization. Permanent labor was replaced by Contractual workers. Privatization forced many government businesses to shut down. Government jobs went down by 50 lakhs. Reservation too went down. Employee rights disappeared due to contractual worker. People’s salary was cut down by 50%. All those large industry players benefitted from liberalization. people like Ambani got the contract to produce Raphael jets.
Third issue is of globalization. The Indian government welcomed companies like McDonalds and Burger kings Walmart on a red carpet. Foreign traders and investors started investing in India. Major companies of fertilizers and pesticides launched their company in India. This made the Indian soil poisonous as these fertilizers had lethal chemicals. As we consume this food grown of this poisonous soil, the poison began to enter the body, diseases like diabetes, heart diseases etc increased. Common people started dying. Overall, as a result of liberalization and globalization, the Indian public became poor and big businessmen became richer.
Manmohan Singh said that due to the liberalization and globalization, corruption would be reduced considerably, but it grew exponentially. This is why Aam Aadmi party was formed, to fight corruption. All these cruel businessmen and rich people can easily put all their black money into foreign accounts. Both Congress and BJP support this loot. This is undemocratic and will destroy our country soon. The BJP has unconstitutionally kept its hold on all government institutions to support their own malicious cause. The government controls independent institutions like RBI, CBI and even the Supreme Court. It is shocking that a Supreme Court Judge openly started speaking against the system in a press conference. Even the media has been sold out to the BJP. There is not free press anymore. Instead of empowering and uplifting people, this government is shamelessly promoting HINDUTVA. Which essentially mean manusmriti. A religion based on caste. If one speaks against their system, he will either be killed or be enslaved for life. In the past these activities were undercover, now they are unabashedly and unapologetically going forward with it Openly. Earlier, Their communalism and fanaticism was hidden. now it’s out there in the open. Even if Nagnath BJP leaves, Sapnath Congress will take over. Congress after coming back to power will resurrect all that BJP has done. None of these parties miss a chance to throw their weight around to abuse power. No party dilutes the stranglehold on power developed by previous regime. We see during elections, all their energy goes into proving the criminalities of the other party instead of focusing on their developmental plans for the country. The congress does not say that they will roll back steps taken by the BJP to destroy institutions.
This is the challenge of 2019. To restore democratic norms of conduct. To re-establish the rule of law meaning the Constitution. To remove fear from the minds of people and press. This is not easy. Change is always opposed. It is only in Delhi that AAP government could achieve transformation in the basic needs like education health and in non corrupt governance. The Delhi model of Development has. Given hope to the people of India.AAP did in 3 years what BJP could not do in 22 years in Gujrat.This is the model we will implement in Maharashtra and entire India. This is the challenge before us.
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वाना आनंदाचे आणि समृद्धीचे जावो.अण्णा हजारे यांच्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या लोकचलवलिटी एक प्रचंड आंदोलन उभे राहिले. भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि जातीयवाद देशाला लागलेली किड आहे.तिला नष्ट करण्यामध्ये तुम्हा सर्वाना यश येवो अशी आशा करतो.त्यासाठी 2019 हे वर्ष आपल्या समोर प्रचंड आव्हान उभे करत आहे.त्यात एकजुटिने काम करुन
तन मन धन लावून काम करावे लागेल. त्यासाठी तुमच्यामधे सामर्थ्य प्राप्त होवो ही शुभकामना !!
31 डिसेंबर हा दुःखाचा दिवस. कारण आपण ज्या वर्षात वावरतो हसतो, खेळतो, ते आपल्या आयुष्यातील दिवस कायम चे निघून जातात. मला हे वर्ष अत्यंत लाभदायक राहिले आहे. 12 जानेवारी 2018 ला केजरीवाल यांनी सिंदखेड राजाला भेट दिली. जिजामातेला अभिवादन करून मला पक्षात सामील केले. नव्या जोमाने मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो जुने नवीन सहकारी भेटले, माझ्याबरोबर कामाला लागले.
2007 ला आमदारकीचा राजीनामा देऊन मी काँग्रेस सोडली होती, ती मनमोहन सिंगच्या भ्रष्ट शासना मुळे. मितभाषी आणि सभ्य सुसंस्कृत मनमोहन भारताचा घात करत होता आणि आपण त्याच्या नम्र स्वभावाला भाळून त्याची स्तुतिच करत होतो. मनमोहन सिंगचा प्रभाव म्हणजे काँग्रेस केवळ 40 लोकसभा सीट जिंकु शकत होता.
1991 पर्यंत भारत कल्याणकारी राज्याची भूमिका निभावत होता. सरकारने लोकांचे कल्याण करायचे असते ही संकल्पना भारतीय संविधानात अटळ आहे. मनमोहन सिंग ने ती बदलून टाकली. सरकारने हि जबाबदारीने न घेता खाजगी व्यक्तींनी ती घ्यावी असे धोरण ठरविले. हॉस्पिटल, रेल्वे, शाळा, एस टी, बस सर्वकाही खाजगी क्षेत्राने करावे असे सरकारचे धोरण बनले. जसे रेल्वे आणि एसटी खाजगी क्षेत्रात चालवली तर मनाला लागेल ते भाडे खाजगी कंपन्या घेतात. नुकसानीत दुर्गम क्षेत्रात कोण बस नेईल? खाजगी शाळा म्हणजे भली मोठी फी सामान्य माणसाला द्यावी लागते . आता नावाला मोफत शिक्षण आहे. इतक्या घाणेरड्या सरकारी शाळा बघितल्यावर सामान्य माणसे आपल्या मुलाना इंग्रजी शाळेत घालतात.
महाराष्ट्रात फडणविसनी सर्व सरकारी दवाखान्यातील औषध खाऊन टाकले. गरिबाला काहीच उरलेला नाही . खाजगीकरणाच्या बडग्याखाली पूर्ण भारत आणला. मोदी म्हणजे मनमोहन सिंगची कार्बन कॉपीच.
1991 ला जाहीर केलेल्या खाजगिकरण
उदारीकरण ,जागतिकीकरणला (खाऊजा) धोरणाला आम्ही खासदारांनी प्रचंड विरोध केला. मी तर मनमोहन सिंग , नरसिम्हा राव समोर बोललो होतो. की ,मी सैन्य सोडून खासदार झालो ते माझे माय बाप शेतकऱ्याच्या खून पाडायला नव्हे. जरी आमच्या आग्रहामुळे पंचायत राज विधेयक आणले तरी , मनमोहन सिंगने ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त केली होती. ती मोदीने पार गाडून टाकली.
1991 हे भारताच्या अधोगतीचे वर्ष आहे. तेव्हापासून कोणतेही सरकार गरीबांचे वाली राहिले नाही. अमेरिकेचे गुलाम झाले. कारण व्हिलन मनमोहन हा त्यांनी पाळलेला साप होता. तो जागतिक बँकेचा नोकर होता. ही बँक अमेरिकेच्या मालकीची आहे.
सम्पूर्ण जगावर अमेरिका अधिकार गाजवते त्यात जागतिक बैंक देखील आहे. खाजगीकारण करण्यात ह्या बँकेचा वाटा मोठा आहे.
खाजगीकिकरणामुळे सामान्य माणसाची 1991 पासून ससेहोलपट सुरू झाली. सहज मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा लोकांना दुरापास्त झाल्या. जसे प्रवास आरोग्य इत्यादी.. शाळा, रेशन, एसटी, सरकारी रुग्णालये सर्व खाजगी होत आहेत . परिणामतः गरीबाच्या खिशावर प्रचंड बोजा आला आहे. कर्ज घेऊन जगतात आणि परत फेड करता येत नाही म्हणून मरतात. ही पाळी खाजगिकरणामुळे
आली आहे. है ध्यानात घ्यावे.
दुसरी गोष्ट उदारीकरणामुळे उद्योग क्षेत्रावरील निर्बंध काढण्यात आले. कामगार कायदे बदलून कंत्राटी कामगार निर्माण करण्यात आले. खाजगीकरणामुळे असंख्य सरकारी उद्योग बंद करण्यात आले. जेणेकरून सरकारी नोकऱ्या 50 लाखाने कमी झाल्या. त्यामुळे आरक्षण देखील कमी झाले. कंत्राटी कारणामुळे कामगारांचे हक्क नाहीसे झाले. 20 हजार पगार मिळणाऱ्याला 10 हजार पगार मिळू लागला. त्याचा एक हिस्सा कंत्राटदाराला दलाली म्हणून मिळत आहे. मोठ्या उद्योगपतींना उदारीकरणामुळे फायदा होत आहे. परिणाम स्वरूप अंबानी सारख्या दिवाळखोर माणसाला राफेल बनविण्याचे कंत्राट मिळाले.
3 रा मुद्दा जागतिकीकरण
परदेशी कंपन्याना सरकार लाल गालीचा अंथरून स्वागत करू लागले. परिणाम स्वरूप भारतात मॅक डोनाल्ड, बर्गर किंग सारखे मोठं मोठे उद्योग आलेत. परदेशातील शेतीमाल भारतात येवू लागला. खताच्या बियाणाच्या कीटकनाशकांच्या महाकाय बहुराष्ट्र कंपन्या भारतात आल्या. व भारताच्या जमिनी रासायनिक खतांमुळे विषारी झाल्या.
याच पिका द्वारे विषयुक्त अन्न मनुष्याच्या शरीरात जाऊ लागले. त्यातून त्यांला डायबिटीस, हृदय विकार सारखे रोग वाढत गेले. सामान्य माणसे मरू लागली. एकंदरीत खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) मुळे भारतीय जनता दरिद्री झाली. आणि मोठे उद्योगपती अती श्रीमंत झाले.
खाऊजा मुळे भ्रष्टाचार कमी होईल असे मनमोहन सिंगांनी सांगितले पण झाले उलटेच. भ्रष्टाचार प्रचंड वाढला त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल यांची आम आदमी पार्टी निर्माण झाली. तिला प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिले. लुटारू लोक आपला पैसा जागतिकीकरणामुळे जग भर कुठेही लपवू शकतात. काँग्रेस असो की भाजप या लुटीला साथ देतात. यामूळे लोकशाही नष्ट होत चालली आहे. भाजप सरकारच्या प्रशासनात सर्व संस्थांना आपल्या ताब्यात ठेवणे हे सरकार चालवण्याचे सर्वात महत्त्वाचे शास्त्र झाले आहे. विरोध खपवून घ्यायचा नाही हे तत्व सर्वोच्च न्यायालय व आरबीआय आणि सीबीआय यांच्यावर पूर्णपणे राजकीय नियंत्रण करण्यासाठी सरकारने या संस्थाच उध्वस्त केल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उघडपणे पत्रकार परिषद घेवून व्यवस्थे विरुद्ध बोलायला लागले ही धक्कादायक बाब आहे. मोदी सरकार ने इतकी भीती निर्माण केली की प्रसार माध्यमे त्यांची चमचेगिरी करू लागले. लोकांचे कल्याण करायचे सोडून हे सरकार बेशरम पणे हिंदुत्त्वाच्या नावाखाली मनुस्मृती लागू करत आहे. त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना एक तर ठार तरी मारतात किंवा आपले गुलाम करतात. पूर्वी हे सर्व लपून करण्यात येत होते, पण आता हे नंगे झाले आहेत. पूर्वी कमीत कमी धार्मिक कट्टरवाद करतांना सभ्यतेचा मुखवटा तरी घालायचे, पण आता असा मुखवटा घालायची गरज सुद्धा वाटत नाही. नागनाथ भाजप जाऊन सापनाथ काँग्रेस जरी आले तरी यात काहीच बदल होणार नाही. कारण सत्तेचा गैरवापर करण्यासाठी भाजप ने ज्या संस्था उध्वस्त केल्या त्यांची पुनर्बांधणी काँग्रेस करणार नाही. तर भाजपच्या दोन पाऊले पुढे जाऊन आणखी दुरुपयोग करतील. कारण कुठलाही राजकीय पक्ष सत्तेचा दुरुपयोग करण्याचा कुठलीही संधी सोडत नाही.
निवडणुकांमध्ये प्रचाराची सारी भिस्त , आपण सुधारणा कशी करणार यावर नसून दुसऱ्याने किती भयानक गुन्हे केले हे सांगण्यावर आहे. म्हणून सुधारणा कोणीच करत नाही . हे सर्व पाहता आजच्या निवडणुका परिवर्तनासाठी तर मुळीच नाहीत. सुधारणा करण्याचे कुणी ढोंग सुद्धा कोणी करत नाही. जनतेने यावर विचार करून नवीन पर्याय निर्माण केला पाहिजे. पुन्हा सापनाथ काँग्रेस आणि नागनाथ भाजप ला उखडून नवीन पर्याय आणला पाहीजे संघर्ष अटळ आहे.
महत्वाचे आप राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद 28 डिसेम्बर 2018 दिल्ली चे महत्वाचे निर्णय-
बैठकीचे अध्यक्ष
मा. अरविंद जी राष्ट्रीय संयोजक
1)मुख्य लक्ष्य भाजपा ला सत्ते मधून बाहेर करणे.
2)बूथ स्तरावर पक्की संघटनात्मक बांधणी केली पाहिजे.
3)जिथे जिंकु शकतो तेव्हाच तिथे निवडणुका लढवणार.
4)10% मतदारांची बांधणी स्थानिक कार्यकर्त्यांनी
केंद्रीय नेतृत्वसाठी म्हणून करावी.
5)स्थानिक यूनिटला विविध पातळीवर मद्त करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व राज्यात भेटी देतील.
6)पक्ष लोकसभा निवडणुका दिल्ली हरियाणा आणि पंजाब येथे लढवणार.
7)उर्वारित देशात जिथे जिंकु शकतो तिथेच पक्ष निवडणुका लढवणार.
8)विधानसभा निवडणुका संदर्भात जिथे 10 टक्के मत पक्के आहेत त्याठिकाणी आपण निवडणूक लढवणार.
याच प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बाबत काम केले जाईल.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा स्वयंसेवकांशी संवाद
काही निरीक्षणे, काही मार्गदर्शक तत्वे
गेल्या सात-आठ महिन्यात आम आदमी पार्टीच्या अनेक स्वयंसेवकांशी माझा संपर्क झाला, अनेक बैठकांमध्ये काही वेळा अनेकांशी वैयक्तिक संवाद झाला, पार्टीत तन-मन-धन अर्पण करून ताकदीने समर्पण वृत्तीने काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, हा संघटनेचा मोठा ठेवा (asset) आहे, अशा आम आदमी पार्टीने माझ्यावर संयोजक पदाची जबाबदारी टाकणे हा माझा सन्मान आहे. वास्तव आहे की असे स्वयंसेवक कार्यकर्ते अन्य पक्षात अभावाने सापडतील त्यामुळे या कार्यकर्त्यांमुळे मला अभिमान वाटतो.
अरविंद केजरीवाल यांनी देशातील नागरिकांना एक उज्जवल नेतृत्त्व दिले, संपन्न व आनंदमयी भारत हे मिशन दिले. हे स्वप्न साकार करण्याची दिशा दिली पण या
देशात सापनाथ व नागनाथ पक्ष आणि जातीयवादी शक्ती कार्यरत आहेत, त्यांना अरबी समुद्रात बुडवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य आणायचे आहे, आम आदमीचे राज्य स्थापन करायचे आहे.
स्वयंसेवकांना सल्ला
दिल्लीत जनतेच्या प्रश्नांवर खूप उत्तम आदर्श काम झाले, महाराष्ट्रात देखील आपण हे सहज साध्य करू शकतो,
त्यासाठी उपलब्ध स्वयंसेवक शक्ती एकत्र होणे गरजेचे आहे, आपले स्वयंसेवक कार्यकर्ते खूप चांगले आहेत पण चांगली माणसे स्वाभिमानी आणि अहंकारी असतात, त्यामुळे संघटनेचया प्रवासात, वाटचालीत, जडण-घडणीत असंख्य अडथळे येतात. चांगल्या लोकांमध्ये एकी होत नाही असा विचित्र पण वास्तव अनुभव येतो संघभावना कमी असते आणि त्यामुळे शत्रू पक्ष चांगल्या लोकांच्या संघटनेत सहज फुट पाडू शकतो.
यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक आपण कराव्यात...
1. एकमेकांचा पूर्ण आदर आणि सन्मान
2 समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतरच मग आपण बोलणे
3 चर्चेने कोणताही बिकट प्रश्न सुटू शकतो, मतभेद दूर होऊ शकतात, तेंव्हा मतभेद झाल्यास बंद खोलीत चर्चा करणे, निर्णय घेणे हाच योग्य मार्ग आहे.
4 दुसऱ्या व्यक्तीवर बिनबुडाचे आरोप करू नये
5 दुसरा काय करतो, यापेक्षा स्वत: काय केले याचा अहवाल वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांना द्यावा
माझे निरीक्षण
सध्या माझ्या असे निदर्शनास आले आहे की - काही लोक अकारण गटबाजी करत आहेत, फक्त whatsapp वर active असतात, आपला वार्ड संघटीत करीत नाहीत..
माझी सूचना अशी आहे की यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याने महिन्याचा अहवाल द्यावा, त्यात खालील बाबी असाव्यात...
अ मी सभासद नोंदणी किती केली ?
ब मी नवीन कार्यकर्ते किती जोडले ?
क मी माझ्या वार्डात, बूथ कमिटीमध्ये किती काम केले, कार्यकर्ते जोडले ?
ड किती लोकांना मदत केली ?
कोणत्या आंदोलनात सहभागी झालो, मीटिंगला उपस्थित राहिलो हे अहवालात नको
कार्यकर्त्यांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट
आपले कान हलके ठेऊ नये, हलक्या कानाचा व्यक्ती चांगला स्वयंसेवक होऊच शकत नाही, राजकारणात अफवांचे पिक उठविले जाते, जाणीवपूर्वक भांडणे लावली जातात, काम न करणारे लोक हे प्रयत्न करतात, हलक्या कानांच्या कार्यकर्त्यांमुळे भांडणे वाढतात, राजकारणी लोकांचे फावते. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीबद्दल कॉम्मेन्ट करू नये, उदा तुळजापूरच्या कार्यकर्त्याबद्दल नागपूरच्या माणसाने लिहू नये , पुराव्याशिवाय वाईट बोलू नये.
जबाबदारी नेतृत्त्व जोपासनेची आणि संघशक्ती (Teamwork)
आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता-नेतृत्त्व विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, आपल्या नेत्यांना जिल्हा व तालुका स्तरावरील नेत्यांना आपल्यालाच मोठे करावे लागेल. सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला एक दुसऱ्यांना मोठे करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
त्यासाठी काय करावे ?
महितीपेक्षा ज्ञान गोळा करावे, मिळवावे - लोकांशी थेट संपर्क वाढवावा - वैयक्तिक पातळीवर चांगली जीवनशैली राखावी - कौटुंबिक स्वास्थ्य वाढवावे -
भांडण झाल्यास चर्चेस बसावे - सरकारी यंत्रणेत अधिकारी व जनतेमधील दुवा आपण बनले पाहिजे - नेतृत्त्वाशी बोलून शंका निरसन लगेच करावे - संघ शक्ती महत्वाची म्हणून आपण एकसंघ असणे हे यशाचे एकमेव सूत्र आहे, आपल्याला हिरो नको आहेत, संघशक्ती हवी आहे असे मला वाटते. पक्ष वाढण्यासाठी विस्तार व विस्तारासाठी संख्येची गरज आहे त्यासाठी संघशक्ती (teamwork) हाच एक उपाय आहे