इराणचे राष्ट्रपती रोहानीचा दुसऱ्यांदा प्रचंड विजय झाला. ५७% मते घेवून त्यांनी अयातुल्ला कामणीच्या कट्टरपंथी उमेद्वाराला पराजित केले. इराण हा भारतासाठी फारच महत्वाचा देश आहे. कारण इराण पाकच्या पश्चिम सीमेवर बलुचीस्तानला लागून आहे. इराण पाकला युद्धात खोली देतो. म्हणजेच पाठील बाजू सांभाळतो. इराणमध्ये पुर्वी शहाची राजवट होती. अमेरिकेचा शहा हा चमचा होता त्यामुळे १९७१ च्या भारत–पाक युद्धात इराणने पाकला मदत केली. म्हणून भारताने शहाला शह देण्यासाठी आयतुल्ला कामणीच्या क्रांतीला मदत केली.
१९८० च्या दशकात क्रांती झाली आणि शहाला पळता भुई थोडी झाली. अमेरिकेने शहाला आश्रय दिला. अयातुल्ला कामणीनी आधुनिक इराण निर्माण करण्यासाठी विज्ञानावर भर दिला. ते स्वत: धार्मिक गुरु असून देखील गणित तज्ञ होते. हळूहळू पाक धार्जिण्या इराण भारताजवळ सरकू लागला. त्यावेळी अमेरिकेने पाकला पुढे करून भारतावर दहशतवादी आक्रमण सुरु केले होते. म्हणून आम्ही इराण बरोबर भारताने मैत्री करावी हा प्रस्ताव राजीव गांधीना दिला होता. राजीव गांधीनी तो स्विकारला. सुरुवातीला विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनात इराणला भारत मदत करू लागला. हळूहळू मैत्री पक्की होत गेली. अमेरिका पाक सौदी आघाडीला विरोध करण्यासाठी भारत–रशिया–इराण अशी युती निर्माण झाली. १९८० च्या दशकात अमेरिकेने पाकला समोर करून अफगाणीस्तानमध्ये मुजाहिदीन व अलकायदा सारखे दहशतवादी घुसवले. त्यातील मोठा भाग भारताविरुद्ध उभा केला. ९० च्या दशकात इराण–भारत मैत्रीचे नविन पर्व सुरु झाले ते आता पर्यंत द्रुढ झाले. मोदिनी सुद्धा इराण बरोबर मैत्रीचे पर्व चालू ठेवले. त्यामुळे पाकला दोन्ही बाजूने शह बसला आहे. अफगाणीस्तान पण पाक विरोधी आहे आणि भारताबरोबर आहे. म्हणूनच रोहानीची निवड ही भारत–इराण मैत्रिसाठी अतिमहत्वाची आहे. कारण इराण आता पाकविरुद्ध आक्रमक आहे. बलुच बंडखोरांना मदत करत आहे. याच संधीचा उपयोग करून पाकला कायमचा नष्ट करता येईल. पण कारगिल युद्धाप्रमाणेच भारत सरकारवर अमेरीकेचा प्रचंड दबाव आहे. कारगिल युद्धात सुद्धा वाजपेयीना अमेरिकेने सीमापार युद्ध नेऊ दिले नाही. म्हणूनच अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिला परदेशी दौरा सौदी अरबला झाला ही बाब साधी नाही. १४ मुस्लिम राष्ट्रांच्या संमेलनाला ट्रम्पने संबोधित केले, त्यात पाकला प्रचंड महत्व दिले. ट्रम्पने एक विनोद केला कि मुस्लिम राष्ट्रांनी दहशतवादाला विरोध केला पाहिजे. आता पाकिस्तान हे मुख्य दहशतवादी राष्ट्र आहे हे त्यांना चांगले माहित आहे. हाच दुटप्पीपणा भारताला धोकादायक आहे, पण असे असून देखील आपले सरकार अमेरिकेच्या पाया पडते ही खरी शोकांतिका आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आहे.
मोदी सरकारने तर अमेरिकन सैन्यादलाला आपली बंदरे व विमानतळे वापरायला देवून टाकली आणि कोणी विरोध केला नाही. १००% संरक्षण खात्यात उत्पादन करण्याची परवानगी अमेरिकन कंपन्यांना देवून टाकली. ह्याच अमेरिकन कंपन्यांची हत्यारे पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना दिली जातात. खरे राजकारण तर हेच आहे. ट्रम्पचा अमेरिका पहिला नारा आहे. त्याला जगाची काही पडली नाही. तो गोऱ्यांच्या प्रभुत्वाचा पुरस्कर्ता आहे. म्हणूनच तो राष्ट्रपती झाल्यापासून अमेरिकेत भारतीय लोकांचे खून पडले जात आहेत. तुम्ही तुमच्या देशात परत जा. आम्हाला आमच्या नोकऱ्या परत पाहिजेत ही मोहीम अमेरिकेत गोऱ्या कट्टरवाद्यांनी हातात घेतली आहे. सौदी अरब हे श्रीमंत राष्ट्र आहे. त्यावर राजाची राजवट आहे. त्या राजघराण्याचे संरक्षण अमेरिका करते. पाकिस्तानचे सैनिक हे त्यांचे अंगरक्षक आहेत. नुकतेच सौदी अरबच्या इस्लामिक सैन्याचा प्रमुख म्हणून पाकिस्तानचा सरसेनापती नियुक्त करण्यात आला. हे सैन्य सध्या येमेनमध्ये शिय्या गटांविरुद्ध लढत आहे. इराण शिय्या गटाना मदत करत आहे. सिरियामध्ये देखील सौदी आणि अमेरिका तेथील सरकार विरुद्ध बंडखोरांना साथ देत आहे. तर इराण आणि रशिया सिरीया सरकारला मदत करत आहे. अर्थात सौदी अरब जिथे आला तिथे सर्व सैनिकी कामगिरी पाकिस्तान सैन्य करते. ह्या यादवीत सर्वात प्रचंड फायदा कोणाचा होत असेल तर अमेरिकन सैनिकी–औद्योगिक वसाहतींचा. ट्रम्पचा पहिला परदेशी दौरा सौदी अरबला म्हणूनच होता. त्यात त्याने सौदी ला ७ लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे विकण्याचा करार केला. जवळ जवळ भारताच्या अर्थसंकल्पाचा अर्धा हिस्सा. हा खरा अमेरिकेचा डाव आहे. आता तर पाकलाही अमेरिकाच शस्त्र पुरवते आणि भारताला पण. जगात सगळीकडे भांडणे लावून स्वत: मालामाल होणे हे ब्रिटीश काळापासून आलेले तंत्र आहे, ज्याला आपण सातत्याने बळी पडत आहोत.
इराणचा मुख्य शत्रु सौदी अरब आहे. सौदी अरब हा पाकचा खंदा समर्थक आहे व अमेरिकेचा गुलाम आहे. सौदी अरब एक अतीश्रीमंत देश आहे पण लोक गरिबीत जगत आहेत. अरब गटाचे नेतृत्व आपल्याकडे रहावे ह्यासाठी सौदीचा प्रयत्न आहे. त्यात अमेरिका त्यांना पूर्ण शक्ती देत आहे. मक्का मदिना सौदीत आहे, पण सौदी राजा अमेरिकेच्या ताब्यात आहे. दुसरीकडे ट्रम्प मुसलमाना विरुध्द असल्याचे सोंग करतो आणि पाक ह्या दहशतवादी राष्ट्राला सर्व शक्ती पुरवतो. अखातीतील देश व उत्तर आफ्रिकेतील देश सौदीच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. ते इराणला शत्रु मानतात. अमेरिका सौदी राजाचे संरक्षण करते आणि देशाला लुटते. रोहानी निवडणूक जिंकली त्याच दिवशी ट्रम्प सौदी अरबला गेला हा काही योगायोग नाही, तर त्याने सौदी–पाकला पूर्ण पाठींबा दिला.
हे सत्य समोर दिसत असताना आपण अमेरिकेचेच पाय धरत आहोत. त्या नादात चीनला पाकच्या गोटात ढकलत आहोत. अमेरिकेसाठी आपले शत्रु वाढवत आहोत. उगाच भारत–अमेरिका–इस्राईल आघाडीचे स्वप्नरंजन वाजपेयीचे सुरक्षा सल्लागार करत होते. मनमोहन सिंघ आणि मोदीने तेंच राजकारण चालविले आणि १९८७ ला चीन इराणबरोबर मैत्री करण्याचे राजीव गांधींचे धोरण नष्ट करण्यात आले. मोदिजीनी तरी चीनशी वेगळे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण नुकत्याच झालेल्या सिल्क रोड व्यापारी परिषदेवर बहिष्कार घालून सर्व प्रयत्नावर पाणी फेरले.
एकंदरीत भारताला आपले परराष्ट्र धोरण स्पष्ट केले पाहिजे. अमेरिकन मैत्रीच्या मृगजळापाठी पळत आपणच आपल्या अनेक वर्षाच्या मित्रांना दूर लोटत आहोत. ५० वर्षाच्या भारत रशिया मैत्रीत रशियाने आता पाकला हत्यारे देण्याची सुरुवात केली. हे भारताला धोकादायक आहे. भारताला स्पष्टपणे भूमिका घ्यावी लागेल. भारतीय लोकांचा अमेरिकेतील छळ. पाकिस्तानचे लाड. मुंबईवरील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख डेविड हेडलीला अमेरिकेत आश्रय. ह्या बाबींवर मोदी गप्प का? अमेरिकेच्या ह्या कारस्थानावर RSS च्या दिक्षितनेच प्रहार केला होता. स्वदेशी जागरण मंच हे केवळ एक बुजगावणे संघाने उभे केले आहे का? भारताला रशिया, इराण, चीन बरोबर मैत्रीचे नाही तरी किमान चांगले संबंध ठेवावे लागतीलच. अमेरिकन सेक्स आणि शराबच्या संस्कृतीत भारतीय जनता बुडून जात