नागनाथ गेले सापनाथ आले आणि जनतेला काय मिळाले?_13.12.2018

  • २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मी ‘फोकनाड मोदी’ लेख लिहिला होता, त्यात म्हटले होते कि मोदी पंतप्रधान होणार पण तो जे बेधुंदपणे आश्वासने देत आहे, ते कधीच पाळणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ ह्या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यात नागनाथ भाजपाला जनतेने रोखले .
    मोदींनी भ्रष्टाचार बंद करू म्हटले होते. १५ लाख रुपये जनतेच्या खात्यात टाकण्याचा वादा केला होता मात्र ती फेकू आश्वासने होती. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या वल्गना  कधी विरल्या हे जनतेला कळालेच नाही. राफेलमध्ये  प्रथम दर्शनी दिसणारा भ्रष्टाचार किती भयानक आहे हे आपण पाहतच आहोत. हिंदुस्तान एरोनेटीक्स (HAL) ह्या सरकारी म्हणजेच जनतेच्या मालकीच्या कंपनीला वगळून अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट द्यावे हे किती दुर्दैव आहे. सरळ सरळ भारताची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी करण्याचे काम ह्या कराराद्वारे केले आहे. तसेच भारताला लुटणा-या १८००  लोकांची नावे  प्यारडाईस आणि पनामा पेपर्स, एच  एस  बी सी बँक घोटाळ्यात उघड झाले आहे . पण मोदीने ५ वर्षे हि प्रकरणे दाबून टाकली. ह्या सगळ्या १८०० लोकांनी भारताचा पैसा लुटून मल्ल्याप्रमाणेच विदेशात खोटया कंपन्यांमध्ये लपवला आहे .
    ह्या सर्व प्रकरणामुळे जनतेला कळू लागले की, भाजपा हा खरोखर नागनाथ आहे आणि त्यांनी वरील तीन राज्यात सापनाथ  कॉंग्रेस यांना निवडून दिले आहे. सत्ता बदल ह्यात झाला हे मान्य आहे मात्र ह्या सत्ता बदलातून जनतेला सामाजिक आर्थिक काय फायदा झाला किंवा होणार आहे . हा खरा प्रश्न आहे . कारण एक सत्ताधारी गेला व दुसरा आला. मात्र सत्ताधारी वर्ग सतत तोच राहतो. आलटून पालटून हे सत्ताधारी खेळाडू प्रमाणे भिडू बदलतात किंवा जागा बदलतात. सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या  जीवनात काय परिवर्तन घडते असा विचार केल्यास काहीच उत्तर नाही; असे आहे .
    १९९१ साली भारताने स्विकारलेले आर्थिक धोरण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा ) कॉंग्रेस पक्षाने आणले तेव्हा मी कॉंग्रेस पक्षाचा खासदार असताना संसदेत कडाडून विरोध केला होता जेव्हा ह्या धोरणाविरोधात जनमत तयार होत होते, तेव्हा जनतेने संघटीत होवू नये म्हणून बाबरी मशीद पाडण्यात आली. ही बाब तेव्हाचे आयबी (IB) चे प्रमुख मलय कृष्ण धर यांनी २००५ साली ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाद्वारे जगासमोर आणली आहे. हे पुस्तक वाचले असता समजून येते कि मलय कृष्ण धर यांच्या घरात ह्या कटाचे नियोजन झाले आहे. म्हणजे  देशातल्या कष्टकरी जनतेने (खाऊजा) आर्थिक धोरणाविरोधात आंदोलन करू नये म्हणून हे कारस्थान घडवले आहे.
    बाबरी मशीद पाडून खोटे हिंदुत्व भाजपा ने पुढे आणले. ह्या जाळ्यात भावनिक आवाहन करून लोकांच्या मनात बुद्धी भेद केला गेला. त्यामुळे सत्तेवर आले. आताही मोदी यांनी गाय व बैल हे विषय अजेंड्यावर आणले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम द्वेष फैलावला व  जनतेचे मूळ प्रश्न बाजूला राहिले.  अशी नीती सत्ताधारी वर्गाची असते हे लक्षात घ्यावे. हे सगळ कारस्थान  सुरु असताना मात्र हिंदू शेतकरी, हिंदू कामगार व मराठी माणूस त्याची काय स्थिती आहे याचा विचार आपण केला आहे? खाऊजा धोरणामुळे हाच हिंदू शेतकरी, कामगार यांचे कंबरडे मोडले . अनेक कामगार कायद्यात बदल केला. कंत्राटी कामगार निर्माण झाला.
    खाजगी कंपन्यांना हवे ते बदल कॉंग्रेस आणि भाजपा यांनी केले. त्याचे परिणाम शेतकरी जो अवघ्या जनतेला पोसतो तो आत्महत्या करण्यास मजबूर झाला,  कारण हे धोरण आणि त्याचे फळ म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांनी कीटकनाशक आणि बी बियाणेद्वारे  शेती नासवली. त्याला मदत तर दूर त्याचे शोषण वाढले. त्यामुळे अर्थ व्यवस्थेचा महत्वाचा भाग  कृषी व्यवस्था संकटात आली. कंत्राटीकरण केले गेले सगळ्या उत्पादन साधनाची मालकी ही केवळ टाटा, अंबानी, बिर्ला आणि अशा अनेक उद्योगपती यांच्याकडे जमा झाली आणि  संपत्ती वाढली मात्र शेतकरी, शेतमजूर  कामगार खाईत ढकलले गेले. ग्रामीण अर्थव्यवस्था नष्ट झाली.
    भांडवलशाहीचा स्वतःचा नियम आहे कि मुठभर लोक बहुसंख्य जनतेचे रक्त शोषून जगतात. ही व्यवस्था  कोसळू नये म्हणून जागतिक प्रभाव देखील काम करीत असतात. अमेरिका सारखे देश त्यात आघाडीवर आहेत. काल्पनिक मुद्य्यावर जनतेला झुलत ठेवले जाते. एकीकडे जनतेला मोफत, शिक्षण, आरोग्य नाकारून त्यांचे शोषण करायचे  आणि ते जागे होवू नये म्हणून राज्य यंत्रणाद्वारे दमन करायचे. ह्या खाऊजा धोरण विरोधात शेतकरी, कामगार विद्यार्थी सर्व प्रकरचे लोक पेटून उठत आहेत.  त्याचाच  एक भाग म्हणजे “एकच मिशन जुनी पेन्शन” हा मुद्दा स्पष्टपणे समोर येतो. ह्या मागणीसाठी देशभर आंदोलन होत आहे .
    अरविंद केजरीवाल यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. अशा विविध  आंदोलनातून म्हणजे लोक चळवळीतून एक नवीन पर्याय देशा समोर आपणाला निर्माण करायचा आहे. नागनाथ गेले सापनाथ आले तरी हे प्रश्न सुटणार नाही.  खरे गुणात्मक परिवर्तन जेव्हा तुम्ही आम्ही एकजुटीने संघर्ष करू तेव्हाच  संविधानाला अभिप्रेत समतेचा पर्याय निर्माण होईल तो पर्यंत बदल होतील समग्र परिवर्तन नाही हे लक्षात घ्यावे .
    लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
    वेबसाइट : www.sudhirsawant.com
    मोबा. नं. ९९८७७१४९२९
Please follow and like us:

Author: Brigadier SS