नागनाथ गेले सापनाथ आले आणि जनतेला काय मिळाले?_13.12.2018

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मी ‘फोकनाड मोदी’ लेख लिहिला होता, त्यात म्हटले होते कि मोदी पंतप्रधान होणार पण तो जे बेधुंदपणे आश्वासने देत आहे, ते कधीच पाळणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ ह्या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले

संकटात भारत_6.12.2018

भारतात चोहीकडे अराजकता नांदत आहे. महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक गुन्हेगारी, माफिया राज, महागाई.  सामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. माझ्या देशाची ही अवस्था कुणी केली आणि का झाली? ह्याचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९९२च्या बॉम्बस्फोट आणि दंगली नंतर मी १००…

आर्थिक समतेशीवाय राजकीय समता शक्य नाही_22.11.2018

भारतीय संविधानाने ठामपणे नमूद केले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. तेथील लोकांना सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी आहे. पण हे स्वप्न विरले, प्रत्येक क्षेत्रात, भारत विध्वंसक भविष्याकडे गटांगळ्या खात झपाट्याने चालला आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अस्थिरता प्रकट होत आहे. ग्रामीण भारतात दुष्काळ, आत्महत्या वाढल्या…

दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात_25.10.2018

‘पहिला पैसा फिर भगवान |’ म्हणतात ते काही खोटे नाही. अंबानी अडाणी, टाटा ,बिर्ला हे १९९१ नंतर एवढे श्रीमंत झाले की आज सरकार त्यांनी विकत घेतले. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर मालक तोच. आज भाजपचा मंत्री असो की खासदार असो मोदींना सहज भेटू शकत नाही. पण अंबानी सरळ कुठेही घुसतो आणि भेटतो.

माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत (भाग २)

माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधीच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला.  भारताच्या इतिहासातील हे एक…

माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत

माझा राजकारणात प्रवेश हा एक अपघात होता. १९९१ साली, मध्यावधी निवडणूक लागल्या व राजीव गांधीनी कॉंग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. माझे वडील हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, नंतर आमच्या आग्रहाखातर १९८० साली शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे आम्ही कोणी शरद पवार यांचे विरोधक होतो असे नाही,पण…

गटबंधन

 कर्नाटक मध्ये कुमारस्वामीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कॉंग्रेस जनता दल सरकार स्थापन झाले. देशातून प्रत्येक राज्यातून सर्व पक्षाचे नेते बंगलोरमध्ये अवतरले. विरोधी पक्षाची एक अद्भूतपूर्व एकी स्थापन होताना दिसली. एकमेकाचे शत्रू एकमेकाच्या गळ्यात पडताना दिसले. मायावती आणि अखिलेश यादव, ममता, कॉंग्रेस आणि साम्यवादी  हे बेंगालमधील मुख्य शत्रू…

साम दाम दंड भेद

कर्नाटक हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. साधारणत: कायद्याला धरून तेथील नागरिक व राजकारणी लोक वावरत असत, पण आता सर्व बदलले आहे. साम दाम दंड भेद हे राजकारणाचे मुख्य तंत्र झाले आहे. नितीमत्ता राजकारणापासून दूर गेली आहे आणि तिची जागा विकृती आणि धोकादडीने घेतली आहे. तेथेच येदुराप्पा…

नविन राजकीय व्यवस्था

सामान्य माणूस स्वतःला सामान्य करतो. तो विसरतो कि सरकार उलटून काढू शकतो.  नविन पर्याय निर्माण करू शकतो.  सरकारच्या धोरणांना संघटीत विरोध करू शकतो. जगातील सर्वात मोठी शक्ती ही जनशक्ती आहे.  या जनशक्तीने राजेराजावाडे मोठमोठे हुकुमशहा यांना जमीनदोस्त केले.  साम्राज्य नष्ट केले

सापनाथ नागनाथा पासून देशाला मुक्त करा

सापनाथ नागनाथा पासून देशाला मुक्त करा जागतिक इतिहासातील सर्वात क्रांतिकारी परिवर्तन म्हणजे मानवी हक्काचे मुलभूत अधिकारात परिवर्तन. एरवी राजेशाही व धर्मगुरूंच्या सापळ्यात मानव कैद होता. प्रत्यक्षात ही देन इंग्लंडमधील क्रांतीतून निर्माण झाली. ऑलिवर क्रॉमवेलच्या राजाविरुद्ध बंडातून इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही विरुद्ध राजेशाहीच्या  युद्धातून; इंग्लंडचा राजा जेम्स…