लढाऊ महिला_27.12.2018

नुकतेच  सैन्यदल मुख्यालयात संरक्षण राज्यमंत्री सुभाष  भामरे यांना भेटायला गेलो तेव्हा  जुन्या आठवणीना उजाळा आला.  मी अनेक वर्ष संरक्षण मंत्रालयाच्या वास्तूत काम केले. ब्रिटीश कालीन भव्य इमारतीत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालय स्थित आहे.  आमच्या काळातील  सैन्य आणि आताच्या सैन्यातील फरक प्रदर्शित होत होता.

संरक्षण उत्पादनातील काळा बाजार 15-11-2018 (Bhag 3)

राफले घोटाळा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. आजच दि.१५ नोव्हेंबरच्या सर्व वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत कि, सर्वोच्च न्यायालयात राफेल करार दोन सरकार मधील नाही आणि ह्या अति महत्वाच्या कराराला फ्रांस सरकारची हमी देखील नाही. त्यासाठी सरक्षण संदर्भातील ऑफसेट भागीदारीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये बदल केल्याची बाब…

संरक्षणातील भ्रष्टाचार_8.11.2018

संरक्षण खात्याचा हिस्सा अर्थसंकल्पाच्या प्रचंड असतो. त्यात राफेल ची किंमत प्रत्येक विमानासाठी रु ९०० कोटीने वाढली. म्हणजे ३६ विमानाचा ३२००० कोटी खर्च वाढला. तर शेती, आरोग्य, पाणी, वीज अशा लोकोपयोगी खात्याचा पैसा कमी होतो आणि कष्टकार्‍यांचे प्रचंड हाल होतात. संरक्षण खात्यावरील खर्चामुळे विकासावर कमी खर्च…

संरक्षण उत्पादनातील काळाबाजार (भाग-१)

१९९१ ला जग बदलले अमेरिका – सोविएत संघ (रशिया) मधील शीत युद्धाचा अंत झाला आणि अमेरिका विश्वविजेती झाली. साहजिक आपले विचार, आपली संस्कृती आणि आपली अर्थनीती जगावर लादण्यात यशस्वी झाली. आता तर ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून ‘अमेरिका प्रथम’ हा नारा देवून जगाचे शोषण करायला उघडपणे सुरुवात…

कारगिल योध्यांना माझा सलाम

कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यासाठी एक भयानक आव्हान होते. १५००० पासून १८००० फूटावरील असंख्य गगनचुंबी शिखरांचा कब्जा करायचा होता.  वर वाजपेयी सरकारने निर्बंध लावले होते. एल.ओ.सी. पार करायची नाही, वायु दलाचा वापर करायचा नाही.  ही खंत तत्कालीन वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली की, वायुदलाला पाक एल.ओ.सी. वर देखिल हल्ला करू…

राष्ट्रीय धोखा- 21 July 2017

२५ डिसेंबर २००३ ला रावळपिंडीत एक मिलेटरी काफिला चालला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ आपल्या वेगाने जाणाऱ्या मर्सिडिस गाडीतून पाहत होते. एक व्हॅन त्यांच्या काफिल्याकडे विरुद्ध दिशेने जोराने येत होती. एक पोलीस या गाडीला  थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याला चिरडून ती व्हॅन  काफिलाच्या शेवटच्या सुरक्षा गाडीला धडकली….

भारताचा शत्रू कोण.. १५ जून २०१७

भारताचा शत्रू कोण हे अचूकपणे ठरल्याशिवाय आपण आपले सरंक्षण कसे करू शकतो. १९९१ पर्यंत या बाबतीत भारतामध्ये कुठलाच गोंधळ नव्हता. अमेरिका, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे त्रिकुट भारताविरुद्ध उघडपणे उभे होते. सौदी अरेबियाच्या पैशावर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्यांचा एक समूह निर्माण केला. उघडपणे हे रशियाच्या…